20 Unseen Unknown Places in India या स्थळांबद्दल आपणास माहिती आहे का?

भारतच नाही तर सर्व जग विविध रहस्यमय गोष्टींनी भरलेल आहे. तर चला आपण पाहूया, जगातील काही रहस्यमय गोष्टी Unseen Unknown Places in India ज्या विज्ञानालाही मागे टाकतात. रिसर्च करून सुद्धा त्याचा शोध लागलेला नाही. या रहस्यमय ठिकाणांना पाहण्यासाठी देश-विदेशातून विविध पर्यटक येत असतात.

या स्थळांबद्दल आपणास माहिती आहे का ? Unseen Unknown Places in India

1) करणी माता मंदिर, हे मंदिर राजस्थानच्या बीकानेर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 हजार उंदरांचं घर आहे. हे मंदिर “करणी माता मंदिर” या नावाने प्रसिद्ध आहे. येथे उंदरांना देवीचा दर्जा दिला जातो. एवढे उंदीर या मंदिरात कुठून आले अजूनही याचा पत्ता लागलेला नाही. म्हणून वैज्ञानिकांसाठी हे एक रहस्य आहे.

2) उत्तराखंडात हिमालयाच्या पायथ्याशी रूपकुंड या नावाचा एक कुंड आहे. तेथील हवामान एवढे थंड आहे, की तेथे एकही माणूस किंवा लोकवस्ती अस्तित्वात नाही. तरीही ते नवव्या शतकातील या 600 मानवी सापडे आढळून आलेले आहेत. हे इथे कुठून आले हे अजूनही कुणाला माहिती नाही.

3) मणिपूरचा लोकलेक हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक बेट आहेत, की जे बेट तरंगत राहतात. या तरंगत्या बेटांवर तेथील लोक शेतीसुद्धा करतात. तसेच या बेटांवर जगातील काही दुर्मिळ प्राणी देखील आढळून आलेले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देण्यासाठी येत असतात.

4) केरळमधील कोंडीन्ही या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. या गावात अवघे 350 जुळ्यांचा जन्म झालेला आहे. दर हजारी लोकांमागे 42 जुळ्यानंचा जन्म या गावात होतो. येथे संशोधन करण्यात आले परंतु अजूनही शोध लागला नाही, की इथं जुळ्या मुलांचा जन्म कसा होतो.Unseen Unknown Places in India

5) आंध्र प्रदेशामध्ये लेपाक्षी मंदिरातील 70 खांबा पैकी एक खांब अशा अवस्थेत आहे, की त्या खालून ओढणी किंवा साडी आरपार जाऊ शकते. म्हणजेच तो लटकलेल्या अवस्थेत आहे.

6) भारतातील लडाखची चुंबकीय टेकडी रहस्य पेक्षा कमी नाही या टेकडीवर कार जर उभी केली तर ती स्वतःहून फिरताना किंवा बंद अवस्थेत असली तरीसुद्धा ती फिरत असल्याचे दिसून आलेले आहे या मागचे कारण तिथे असलेले चुंबकीय शक्ती हे आहे.

See also  Amazing Facts About Indian Kings | राजे-महाराजे

7) रामायणातील कथेत श्रीलंकेत पोहोचण्यासाठी राम प्रभूंनी दगडांनी बांधलेला तरंगता एक पूल तयार केला त्याला सेतू असे म्हटले जाते. हे एक रहस्यमय गोष्ट आहे त्याचे पुरावे आजही आपल्याला पाहायला मिळतात. तसेच रामेश्वरम मध्ये या दगडांवर अजूनही श्रीराम लिहिलेलं आपल्याला दिसून येते. हे एक गुपित सत्य आहे. या सेतूवर देखील अनेक वैज्ञानिकांनी रिसर्च केले आहेत. परंतु ही एक सर्वांसाठी आश्चर्यकारक रहस्यमय आहे.

8) मध्यप्रदेशातील वानखंडेश्वर महादेव मंदिराबाबत असे म्हटले जाते की, रात्री भुतांनी वानखडेशहराच्या सभोवती 99 मंदिरे बांधीली. आणि पहाड झाल्यामुळे शंभरावे मंदिर त्यांना बनता आले नाही. जर त्यांनी शंभर मंदिर बांधून काम पूर्ण केले असते, तर हे शहर एक धार्मिक शहर म्हणून ओळखले गेले असते. राजा पृथ्वीराज चव्हाण यांनी वानखंडेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. असे म्हटले जाते की, ते दिल्लीला जात असताना येथे थांबले होते. तेथे त्यांना स्वप्नात शिवलिंग दिसला आणि त्यांनी तेथे खोदकाम सुरू केले व शिवलिंग प्रकट केले.

9) लडाखच्या हिमाच्छादित टेकड्यांवर बांधलेल्या पुगल मठाची रचना ही मधमाशांच्या घरांच्या आकाराच्या आहेत. एका गुहेत असलेले हे मत 2500 वर्ष जुनी आहेत. त्या गुहेत बांधलेल्या मठापुढे एक खोल खंदक आहे, या मठात पोहोचणे फार कठीण आहे. बाराव्या शतकात हा मठ कसा बनवला असेल, याची कल्पनाही एक रहस्यमय आहे. आणि इथला मार्ग सुद्धा खूपच अवघड आहे.

10) महाबलीपुरमचा एक विशाल खडक देखील एका रहस्यापेक्षा कमी नाही. येथे 250 टन आणि पाच मीटर व्यासाचा हा खडक न फिरता गोल आकाराचा असला तरी तो उतारा वर ठेवला आहे. ज्यामुळे ते महाबलीपुरम मध्ये पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. त्याचा आकार गोल असल्यामुळे त्याला ‘कृष्णाची लेणी बॉल’ म्हणून ओळखली जाते. या मोठ्या खडका खाली बसायला खूप भीती वाटते. बसणाऱ्यांना खूप धैर्यवान समजले जाते.

See also  भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India

11) महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेल यांच्या मध्ये स्थित असलेला, कलावंती दुर्ग एक आश्चर्यकारक रहस्यमय आहे. हा भारतातील खूपच खतरनाक प्रदेश मानला जातो. येथे इमारतींचे दडल्याची रहस्य आहे. 23 फूट उंचीचा हा दुर्गम प्रदेश चढण्यासाठी अतिशय खडतर प्रवासाचा आहे. कलावंती दुर्गला प्रबलगड या नावाने देखील ओळखले जाते.

12) कर्नाटक मधले श्रावण बेळ गोळ येथे वसलेल्या जैन मंदिरांमध्ये प्रथम तीर्थकार गोमटेश्वराच्या 18 मीटर उंचीची काळ्या ग्रॅनाईटची मोठी मूर्ती आहे. आणि प्रत्येक बाराव्या वर्षी भाविक महामस्तकाभिषेक या महत्त्वाच्या जैन उत्सवा करिता या पर्वतावर मोठ्या संख्येने एकत्र येतात. यावेळी मूर्तीला स्नान घातले जाते आणि दूध केसरचा लेप व हळद चंदन खाने अभिषेक केला जातो.

13) हिमाचल प्रदेशामधील कांगडा जिल्ह्यातील माता दुर्गाचं एक मंदिर आहे. ज्वाला ज्वाला जी मंदिर अथवा ज्वालामुखी मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराच्या एका केंद्रात एक दिवा जळतो या दिव्या बाबत सांगितले जाते की, हा दिवा अनादी काळापासून पेटलेला असून नेहमी जळतच राहतो. या ज्योतीमधून निळा प्रकाश निघतो, हे देखील एक रहस्यच आहे.

14) कर्नाटकच्या हम्पी येथील विरुपाक्ष मंदिर हे देखील एक रहस्य आहे. सांगण्यात येते की या मंदिरामध्ये काही असे स्तंभ आहेत, ज्यातून संगीत निघते. त्यांना म्यूजिकल पिलर्स म्हटले जाते. या स्तंभाबाबत सांगण्यात येते की, यातून संगीत कसं निघते हे पाहण्यासाठी इंग्रजांनी काही खांब तोडून पहिले. मात्र संगीत वाजण्यासारखे आत काहीच नव्हते. Unseen Unknown Places in India

15) उज्जैनच्या कालभैरव मंदिरात, कालभैरव मूर्ती मदिरापान करते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आजपर्यंत एकही शास्त्रज्ञ सांगू शकला नाही कि, हि मधिरा कुठे लुप्त होते. असे म्हटले जाते की, कालभैरव त्या गावाचा रक्षक आहे आणि तिथे बारा महिने चोवीस तास दारू देवाला चढवण्यात येते व प्रसादाच्या स्वरुपात देखील भक्तांना वाटण्यात येते.

See also  Taj Mahal Information In Marathi | ताजमहाल माहिती मराठी

16) ब्राझीलचा किनारपट्टीपासून सुमारे तीनशे किलोमीटर लांब अंतरावर असलेले एक ठिकाण याचे क्षेत्रफळ 13 ते 14 लाख चौरस किलोमीटर आहे. आतापर्यंत येथे मोठ्या प्रमाणावर विमाने, जहाजे गायब झालेली आहेत. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की रेडिएशनचा विसंगतीने असे होत आहे. हा प्रदेश बर्मुडा ट्रँगल या नावाने ओळखला जातो.

17) एंगिकुनी लेक हे ठिकाण कॅनडातील कैजान नदी जवळ आहे. हे एक मोठे सरोवराचे ठिकाण आहे. या ठिकाणा बाबत बोलल्या जाते की, 1930 मध्ये या या सरोवराच्या किनारी वसलेल्या गावातील, दोन हजारहून अधिक लोक अचानक गायब झाले होते.

18) मेक्सिकोच्या ‘आयलँड ऑफ डॉल्स’ या बेटावर जागोजागी बाहुल्या लटकलेल्या पहावयास मिळतात. त्या बाहुल्या तिथं जाणाऱ्या लोकांकडे एक टक लावून पाहतात असा भास होतो. एक माणूस आपल्या पत्नीसोबत या सुंदर टापूवर राहण्यासाठी आले होता. तेव्हा त्यांना नदीत वाहत येताना एक डॉल दिसली.

19) एडिनबर्गचा राजवाडा स्कॉटलंडच्या राजवाड्याची कहाणी, अत्यंत भीतीदायक आहे. हा राजवाडा दिसायला सुंदर असला, तरी येथे अनेकांना भयानक आवाज, किंकाळ्या ऐकू येतात. लेख आणि अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामात मारल्या गेलेल्या लोकांच्या आत्मा येथे भटकतात, असे मानले जाते.

20) कानपूर जिल्ह्यातील घाटमपुर तहसीलच्या बेहटा गावामध्ये भगवान जगन्नाथजीचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाबतीत असं बोलले जाते की, हे पाच हजार वर्ष जुन मंदिर आहे आणि मंदिराचे रहस्य गोष्ट म्हणजे अशी आहे की, जेव्हा मान्सून येतो. तेव्हा पंधरा दिवस अगोदरच मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब पाझरू लागतात.

त्यावरून लोकांना कळते की पावसाळा सुरू होणार आहे. येथील लोकांचे मानने आहे. भगवान जगन्नाथ बलदाऊ आणि बहीण सुभद्रा सोबत त्यांची मूर्ती विराजमान आहे. काहीवेळा वैज्ञानिकांनी देखील येथे रीसर्च केले परंतु त्यांना काहीही समजले नाही. म्हणून आजपर्यंत ही एक रहस्यमय घटना आहे.

“तुम्हाला आमचा लेख पृथ्वीवरील रहस्यमय ठिकाण कसा Unseen Unknown Places in India वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा”.

आपण आमच्या अन्य ब्लॉग ला visit करू शकता

शेतकरी 

योगाटीप्स 

Leave a Comment