Rainbow Colours in Marathi इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य

आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलेला आणि पावसाळ्यात मन मोहून टाकणाऱ्या इंद्रधनुष्याबाबत ( Rainbow Colours in Marathi ) काही मनोरंजन तथ्य आपण पाहूया.

इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य, Facts of Rainbow

इंद्रधनुष्य Rainbow Colours in Marathi पूर्ण गोल असतो. परंतु जमिनीवरून पाहता तो आपल्याला अर्धाच दिसतो. जर तुम्ही उंचीवरून पाहायला तर तुम्हाला गोल आकाराचा इंद्रधनुष्य दिसते.

पावसाळ्यात सूर्य मावळण्याच्या शेवटच्या चार तासात इंद्रधनुष्य आपणास पहावयास मिळतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसायला लागला की, लहान-मोठे सर्वच आपलं काम सोडून, सर्वांच्या नजरा आकाशामध्ये इंद्रधनुष्याकडे लागलेल्या दिसतात. कारण हे एक निसर्गाचे सौंदर्य पाहून सर्वांचे मन उत्साही आणि आनंदमय होते.

इंद्रधनुष्याचा Fact about Rainbow जेवढा जवळचा संबंध विज्ञानाची आहे. तेवढाच जवळचा संबंध कला क्षेत्रशी देखील आहे इंद्रधनू मध्ये सात रंग असतात आणि या इंद्रधनूचा उल्लेख पृथ्वी वर असणाऱ्या विविध सांस्कृतिक, प्राचीन दंतकथा, पौरानिक गाथांमध्ये आपणास पहावयास मिळतो. इंद्रधनुष यामुळे अनेक कवी आणि चित्रकार यांना प्रेरणा मिळालेली आहे.

इंद्रधनुष्य केव्हा जास्त दिसतो? Rainbow Colours in Marathi

सूर्य मावळण्याच्या शेवटच्या चार तासांमध्ये इंद्रधनुष्य जास्तीत जास्त दिसतो. पृथ्वीवर सर्वात जास्त इंद्रधनुष्य अमेरिका या देशातील हवाई या राज्यांमध्ये दिसून येतात. त्यामुळे त्याला ‘द रेनबो स्टेट’ असे म्हटले जाते.

सूर्याचा प्रकाश हा पांढरा रंगाचा आपल्याला दिसतो, परंतु खरे तर त्यामध्ये सात रंगाचे मिश्रण असते. म्हणून इंद्रधनुष्यामधे हे रंग पाहायला मिळतात.

जेव्हा पावसाळ्यामध्ये सूर्याच्या प्रकाशात पावसांचे लाखो थेंब एकाच वेळेस परावर्तित आणि अपवर्तित होत असतात. पावसाच्या अनेक थेंबामध्ये आपल्याला हे दृश्य दिसून येतात, त्यामुळे सूर्याच्या नेहमी विरुद्ध दिशेलाच इंद्रधनुष्याची निर्मिती होत असते.

इंद्रधनुष्याच्या Rainbow Colours in Marathi बाबतीत अरिस्टोटल या शास्त्रज्ञाच्या लक्षात आले की, ऊन पाऊस आणि इंद्रधनुष्य यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा सूर्याची किरणे एखाद्या ढगावर पडतात, त्यावेळेस ते एका विशिष्ट कोना द्वारे परावर्तित होतात. त्यामुळे जमिनीवर असलेल्या व्यक्तीला ती किरणे गोलाकार स्वरूपात दिसतात.

See also  Playing Card Secrets | पत्त्यांमधील 4 राज्यांपैकी बदाम राज्याला मिशा नसतात यामागील रोचक कारण

इंद्रधनुष्यात किती रंग असतात ? Rainbow Colours in Marathi

इंद्रधनुष्याशी संबंधित काही प्रकाशीय गुणधर्म आपल्या सहज लक्षात येतात. ज्यावेळेस आकाशात इंद्रधनुष्य दिसेल, त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक पहा त्यामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा हे सात रंग आपल्याला दिसतात.

इंद्रधनुष्य Rainbow Colours in Marathi  सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला दिसून येतो. कधीकधी इंद्रधनुष्य फिकट रंगाचा असतो. तर कधी कधी हा गर्द रंगाचा आपल्याला दिसताना आढळून येतो.

कधीकधी आपल्याला एकसोबत 2 इंद्रधनुष्य एकाच वेळी पाहायला मिळतात. हे दोन इंद्रधनुष्य पाहण्याची मजाच खूप वेगळी राहते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा आनंद घेऊ शकाल तर पावसाळ्यात नक्कीच ही दृश्य आपणास दिसू शकतील.

अरिस्टोटल नंतर 500 वर्षाच्या कालावधीनंतर इंद्रधनुष्याची व्याख्या अलेक्जेनडर ऑफ डीफ्रोसियस नावाच्या वैज्ञानिकांनी केली.

सूर्याकडे पाठ करून तोंडाने पाण्याचा फवारा उडविला असता, तसेच धबधब्याच्या ठिकाणी उडणाऱ्या तुषारांमुळेही इंद्रधनुष्य दिसते. चंद्रप्रकाशामुळेही इंद्रधनुष्याचा आविष्कार दिसून शकतो.

इंद्रधनुष्ये अनेक प्रकारची असतात. ही सूर्य व निरीक्षकाचा डोळा यांना जोडणाऱ्या रेषेवर मध्यबिंदू असणाऱ्या सममध्य वर्तुळांच्या खंडांच्या रूपात दिसतात.

इंद्रधनुष्य वैशिष्ट्ये Rainbow Colours in Marathi

बहुतेक वेळा एकच इंद्रधनुष्य  Rainbow Colours in Marathi दिसते. या इंद्रधनुष्याच्या तांबड्या रंगाच्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या 420 असून यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूस व आतील बाजूस क्रमाने नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा व जांभळा हे रंग दिसतात. याला ‘प्राथमिक इंद्रधनुष्य’ म्हणतात.

काही वेळा या इंद्रधनुष्याच्या वरच्या बाजूंस दुसरे इंद्रधनुष्य दिसते, परंतु हे प्राथमिक इंद्रधनुष्यापेक्षा फिकट असून यात रंगांचा क्रम उलटा, म्हणजे बाहेरच्या बाजूस जांभळा व आतल्या बाजूस तांबडा असा असतो. याच्या बाहेरच्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या 540 असते. याला ‘दुय्यम इंद्रधनुष्य’ म्हणतात.

थेंबात प्रकाश किरणांचे तीन किंवा चार वेळा परावर्तन होऊनही इंद्रधनुष्ये तयार होतात. परंतु जास्त परावर्तनांनी प्रकाशतीव्रता कमी झाल्यामुळे व ही इंद्रधनुष्ये सूर्याच्या पुष्कळच जवळ 500 वर असल्यामुळे, प्रखर सूर्यप्रकाशात ती पहाणे जवळजवळ अशक्यच होते.

See also  Indian Constitution in Marathi भारतीय संविधानाविषयी माहिती

सूर्य पावसाने झाकला गेला म्हणजे ती सूर्याच्या दिशेतच पाहता येतात. इंद्रधनुष्यांचे काही दुर्मिळ प्रकार दृष्टीस पडतात. त्यांपैकी काहींचे स्पष्टीकरण अजून देता आलेले नाही. खऱ्या व अधिसंख्या या दोन्ही प्रकारच्या इंद्रधनुष्यांची संपूर्ण उपपत्ती मांडण्यात आली असून त्या उपपत्तीप्रमाणे प्राथमिक इंद्रधनुष्याची त्रिज्या लघुतम अपगमनावरून मिळणाऱ्या त्रिज्येपेक्षा थोडी कमी व दुय्यम इंद्रधनुष्याची त्रिज्या थोडी जास्त असावयास पाहिजे असे आढळले आहे.

इंद्रधनुष्या मध्ये Rainbow Colours in Marathi  पाच रंग होते तर त्यामध्ये दोन रंग ते म्हणजे नारंगी आणि जांभळा 1666 मध्ये आईजॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने जोडले तर चीनमध्ये अजूनही इंद्रधनुष्या मध्ये केवळ पाच रंग आहे असे मानले जाते. रणे डेकार्ड हा पहिला व्यक्ती होता ज्याने 1637 मध्ये शोध लावला पावसाचे थेंब सुर्याच्या किरणांना परावर्तित करतात.

जेव्हा दोन इंद्रधनुष्य एक सोबत दिसतात, तेव्हा पहिल्या इंद्रधनुष्याच्या रंगाच्या विरुद्ध क्रम दुसरा इंद्रधनुष्याचा असतो. जसे लाल रंगाच्या जागी जांभळा रंग दिसून येतो.

इंद्रधनुष्य पाहतांना जर दोन व्यक्ती वेगवेगळ्या अंतरावर उभे राहिले असतील, तर दोघांनाही इंद्रधनुष्य वेगवेगळ्या प्रकारात दिसतो. परंतु दोघांनाही असे वाटेल की, आपण दोघेही एकच इंद्रधनुष्य पाहत आहोत. कारण असे होते की पावसाचे थेंबापासून हा वेगवेगळ्या प्रकारे इंद्रधनुष्याची आकृती बनवत असतो. त्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या जागेवर आणि दुसरा थोड्या अंतरावर असल्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे इंद्रधनुष्य दिसतो.

तुम्ही इंद्रधनुष्याला स्पर्श करू शकत नाही

तुम्ही इंद्रधनुष्याला स्पर्श करू शकत नाही. केवळ डोळ्यांनी पाहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. प्राचीन काळात इंद्रधनुष्या विषयी लोकांच्या वेगवेगळ्या भावना होत्या पौराणिक कथांच्या नुसार इंद्रधनुष्य स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या मधला पूल आहे. तर साळवे या प्राचीन लोकांचं म्हणणं होतं की इंद्रधनुष्य तुफान भगवान एक धनुष्य नावाचं शस्त्र आहे.

आज पर्यंत सर्वात जास्त वेळ दिसणारा इंद्रधनुष्य Rainbow Colours in Marathi इंग्लंडच्या शेफील्ड या शहरात सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत दिसला. एखाद्यावेळी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे जांभळा बाहेरील बाजूस व तांबडा आतील बाजूस असणारे दुय्यम इंद्रधनुष्यही दिसते.

See also  Interesting Fact About Water पाण्याविषयी माहिती

इंद्रधनुष्याच्या कमानीचा कोन, सूर्यापासून उलट दिशेने सुरूवात केल्यापासून 420° आहे. याचे कारण हे आहे की वक्रीभवनाचा सामान्य कोन 420° आहे. चंद्राचा प्रकाश पावसाच्या थेंबातून प्रतिबिंबित होतो, तेव्हा चंद्र धनुष्य किंवा चंद्राचे इंद्रधनुष्य तयार होते. या प्रकारचे इंद्रधनुष्य दुर्मिळ आहे, कारण चंद्राचा  प्रकाश सहसा इंद्रधनुष्य तयार करण्याइतका पुरेसा तेजस्वी नसतो.

धनुष्याचे केंद्र निरीक्षकाच्या डोक्यावरील सावलीत असते आणि निरीक्षकाचे डोके व त्याच्या सावली दरम्यानच्या रेषेला 40-42° च्या कोनात एक वर्तुळ तयार करते. त्याचा परिणाम म्हणून, जर सूर्य 42° पेक्षा जास्त उंचीवर असेल तर, इंद्रधनुष्य क्षितीजाच्या खाली असेल आणि शक्‍यतो हे पहायला मिळत नाही. कारण इंद्रधनुष्य तयार करण्याइतके पुरेसे पावसाचे थेंब, आपल्या सभोवताली नसतात.

इंद्रधनुष्याला Rainbow Colours in Marathi त्याच्या आकारामुळे त्याचे हे नाव मिळाले, असे मानले जाते. इंद्रधनुष्याची कमान धनुष्यासारखी दिसते. ही रंगीत कमान फक्त पाऊस येतो, तेव्हाच तयार होते असे लोकांच्या लक्षात आले, त्यामुळे ते त्याला इंद्रधनुष्य म्हणतात.

आयझॅक न्यूटन इंद्रधनुष बाबत काय म्हणतात?

वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी इंद्रधनुष्य कसे तयार होते हे स्पष्ट केले. सूर्यप्रकाश इंद्रधनुष्याच्या रंगांनी बनलेला आहे. जेव्हा हे सर्व रंग एकत्र मिसळले  जातात, तेव्हा तो पांढरा दिसतो.

जेव्हा सूर्यप्रकाश एकाच दिशेने हवेच्या माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा आपण पांढरा प्रकाश पाहतो. पांढरा प्रकाश म्हणजे आपण प्रत्येक दिवशी पाहात असलेला प्रकाश आहे.

जेव्हा सूर्यप्रकाश एका पावसाच्या थेंबाच्या माध्यमातून प्रवेश करतो, तेव्हा पहिल्यांदा प्रकाशाचे त्या थेंबात परिवर्तित होते, त्यानंतर पावसाच्या थेंबामध्ये त्याचे संपूर्ण अंतर्गत प्रतिबिंब तयार होते.

इंद्रधनुष्य Rainbow Colours in Marathi तयार होणे एक परिवर्तनाचा प्रकार आहे. त्यानंतर या पावसाच्या थेंबात त्याचे प्रतिबिंब होत जाते आणि नंतर प्रकाश विरुद्ध पृष्ठभागाच्या माध्यमातून परिवर्तन होऊन, पावसाच्या थेंबातून  बाहेर पडतो.

“तुम्हाला आमचा लेख इंद्रधनुष्याविषयी Rainbow Colours in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

Leave a Comment