हत्ती चिखलात लोळला इन हिंदी Elephant Information in Marathi

Elephant Information in Marathi आपला आवडता प्राणी ज्याला आपण प्रेमाने गजपती म्हणतो.चला तर मग आपण प्राणी जगतात फिरायला जाऊ आणि हत्तीविषयी काही रोचक तथ्ये पाहू. आपण wikipedia वर अधिक माहिती वाचू शकता. लोळला हिंदीत सांगा. याकरिता आपण vokal.in ला भेट द्या

Table of Contents

हत्ती चिखलात लोळला इन हिंदी Elephant Information in Marathi

आपण जंगलात बरीच प्राणी पाहतो त्यामध्ये सर्वात महाकाय प्राणी म्हणजे हत्ती होय. आपल्या जंगलातून दिसणारा एक वैशिष्टयपूर्ण प्राणी म्हणजे हत्ती.

 1) हत्ती हा प्राणी कोठे कोठे आढळतो

१)भारतात उत्तरप्रदेश,
२)बिहार,
३)ओरिसा,
४)कर्नाटक,
५)आसाम,
६) केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.

२) हत्तीची शरीर यष्टी

१)हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटपर्यंत असते.

२)काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती सहज ओळखता येतो.

३)भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात.

४)मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नराला सुळे नसतात.

५)सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणा-या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात.

६) भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते.

७) हत्तीचं शरीर अवाढव्य असतं. त्याचं वजन पाच ते सहा टन असतं. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

इतर जनावरांबाबतीत याची तुलना

१)इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते.

२)त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामं करवून घेता येतात.

३) याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावं लागतं.

४)जंगलात लाकडं कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडं कापून लाकडाचे ओंडके बनवतात.

५) शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात.

६)वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किना-यावरून दुस-या किना-यावर किंवा खाली वाहत जातात.

७) शिकवलेले हत्ती गाडय़ा ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. अगोदरच्या काळात। हत्तींवर बसून लढाया करत.

८)हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत.

९)तसंच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामं करवून घेतात.

१०)ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामं करतात.Elephant Information in Marathi

११)हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते.

हत्तीच्या हस्तिदंताच्या वस्तू  Elephant Information in Marathi

१)वेगवेगळ्या प्रकारचे दागिने,
२) दागिने ठेवण्याच्या पेटया,
३)शोभेच्या वस्तू,
४)पेपरवेट,
५) फुलदाण्या,
६) बांगडया, बटनं इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

१२)हत्ती जंगलात कळपानं राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात.

१३) कळपात प्रामुख्यानं दोन-तीन मोठय़ा माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात.

१४) कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात.

१५)कळपाचं नेतृत्व म्हाता-या अनुभवी मादीकडे असतं. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो.

१६)केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात.Elephant Information in Marathi

१७)वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघंही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात.

१८)मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात.

१९)माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात.

२०)माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.

हत्तींनी बद्दल थोडे Elephant Information in Marathi

१)हत्तीण २२ महिन्यांपर्यंत गाभण राहते.

२)एका वेळेस तिला एकच पिल्लू होतं. क्वचित दोनदेखील होतात.

३)नुकत्याच जन्मलेल्या पिलाचं वजन 90 किलोग्रॅमच्या आसपास असून त्याची उंची सुमारे एक मीटर असते.

४)पिलू जन्मल्याबरोबर लगेचच चालू लागते आणि कळपात सामील होते. हत्ती मुख्यत: गवत, झाडपाला, पानं, फळं, फुलं खातात.

५) ऊस हे हत्तीचं आवडीचं खाद्य. त्याचबरोबर नारळ, केळीदेखील त्याला आवडतात.

६)हत्ती सर्व खाद्यपदार्थ सोंडेनं उचलून तोंडात धरतो.

७)या लांब सोंडेचा त्याला हातासारखा उपयोग होतो.Elephant Information in Marathi

८)हत्तींना पाण्यात डुंबायला फार आवडतं. पाण्यात असतानादेखील ते सोंडेत पाणी घेऊन फवा-यासारखे डोक्यावर सोडतात.

९) हत्तीची छोटी पिलं कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर फवारण्याचा खेळ खेळतात.

१०)सोंड हे हत्तीचं नाक आहे. ते सोंडेनं श्वासोच्छवास करतात.

११)हत्तीची सोंड आणि कान फारच मोठे असतात. त्यामुळे हत्तीला त्याच्या शत्रूच्या अंगाचा वास लांबूनच येतो.

१२)तसंच शत्रूच्या हालचालीमुळे झालेला आवाजही दुरूनच ऐकू येतो. त्यामुळे शत्रू दूर असला तरी त्याची चाहूल हत्तीला लागते.

१३)हत्ती 70-80 वर्ष जगतो.Elephant Information in Marathi

हत्तीविषयी आता आपण थोडे खोल जाऊया

हत्तीची वैशिष्ट्य

१)हा जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. एकूण प्राणिसृष्टीत फक्त काही देवमासे हत्तीपेक्षा मोठे आहेत.

२)तसेच तो प्राणिसृष्टीमधील जिराफानंतरचा सर्वांत उंच प्राणी आहे.

See also  माकडांविषयी 44 सत्य Monkey in Marathi

३)लांब सोंड हे त्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य असून तो तिचा हातासारखा उपयोग करतो, म्हणून त्याला संस्कृतमध्ये हस्तिन् असे म्हणतात.

४)वरचा ओठ व नाक पुष्कळ लांब होऊन सोंड बनली आहे. त्याचे सुपासारखे सपाट कान सर्व प्राण्यांत मोठे आहेत.

५) त्याचे सुळे सर्व प्राण्यांच्या दातांच्या तुलनेत सर्वाधिक लांब आहेत. शरीराचे प्रचंड वजन पेलणारे त्याचेे पाय जाड खांबांसारखे असतात.

६)त्याचे डोके प्रचंड मोठे असून शरीराच्यामानाने त्याचा मेंदू लहान असतो.

७) त्याचा रंग करडा, तपकिरी व काळपट असून शरीरावरील केस विरळ व राठ असतात.

७) थायलंड व म्यानमार येथे क्वचित पांढरे हत्ती आढळतात.

९)या हत्तींचा रंग भुरकट पांढरा असूनकान व त्वचा फिकट गुलाबी असते.

१०) हत्ती पुष्कळ वेळा वने, गवताळप्रदेश व रुक्षवने (सॅव्हाना) येथे आढळतात.

११)मात्र त्यांचे अधिवास( स्वाभाविक निवास) वाळवंटे, दलदली तसेच आशिया आणि आफ्रिका खंडांमधील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील डोंगराळ प्रदेश अशा विविधप्रकारचे आहेत.

आता आपण बघूया आफ्रिकेच्या जंगलातील हत्ती

 अ) आफ्रिकी हत्ती (लोक्झोडोंटा आफ्रिकाना) :या हत्तीची

(१) मध्यभागी उतरती पाठ असते,
(२) खांदे आच्छादणारे कान असतात,
(३) बाकदार कपाळ असते ,
(४) सोंडेच्या टोकावरील बोटांसारख्या
दोन मांसल संरचना असते,
(५) चार किंवा पाच बोटे असतात,
(६) तीन बोटे असतात,
(७) त्वचेची सैलसर घडी असते.

ब) आशियाई हत्ती (एलिफस मॅक्झिमस) :यस हत्तीचे Elephant Information in Marathi 

(१) कपाळावरील दोन उंचवटे असते, (२) कान खांदे झाकत नाहीत ,
(३) कमानदार पाठ असते,
(४) चार बोटे असतात,
(५) पाच बोटे असतात,
(६) सोंडेच्या टोकावरील बोटासारखी एकच मांसल संरचना असते.

प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलामधील तीन जातींतील प्राण्यांना हत्ती हे सामान्य नाव आहे. या गणातील उरलेल्या कुलांमध्ये निर्वंश झालेले प्राणी येतात
उदा.,
मॅमथ.

आफ्रिकी हत्ती फक्त आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस आढळतात तर आशियाई किंवा भारतीय हत्ती भारताच्या काही भागांत आणि आग्नेय आशियात आढळतात. आफ्रिकी झुडपी (बुश) हत्ती व आफ्रिकी वन्य( वाइल्ड) हत्ती या उपजाती मानतात.

आपण आता आफ्रिकी हत्तीबद्दल थोडे सारांश रुप बघूया Elephant Information in Marathi

१) हे आशियाई हत्तींपेक्षा मोठे असून या दोन्हींची खांदा व त्याच्या मागील भाग येथील उंची जवळजवळ सारखी असते.

२)आफ्रिकी हत्तीची पाठ मध्यभागी किंचित उतरती असते.

३)प्रौढ आफ्रिकी नराचीखांद्याजवळ उंची सु. ३.४ मी. असून वजन सु. ५,४०० कि.गॅ्. असते तर मादीची खांद्याजवळ उंची सु. २.८ मी. व वजन सु. ३,६०० कि.ग्रॅ. असते.

४)१९५५ मध्ये अंगोला येथे मारलेल्या एका आफ्रिकी वन्य हत्तीची खांद्याजवळ उंची ३.९० मी. व वजन ६,६०० कि .ग्रॅ. होते. त्याचे .

५)बहुतेक आफ्रिकी हत्तींचा रंग गडद करडा व कपाळ बाकदारअसते.

६)त्यांचे कान सु. १.२ मी. रुंद असून ते खांदे झाकण्याइतपतमोठे असतात.

७) नर आणि मादी दोघांनाही सुळे असतात. नराचे सुळे१.८-२.४ मी. लांब असून त्यांचे वजन प्रत्येकी २३-४५ कि.ग्रॅ. असते.

८)बहुतेक माद्यांच्या सुळ्यांचे वजन प्रत्येकी ७-९ किग्रॅ. असते.

९) सर्वांत लांब सुळा ३.५ मी. आणि सर्वांत वजनदार सुळा ३३ किग्रॅ. वजनाचा होता.

१०)सोंडेच्या टोकावर बोटांसारख्या दोन मांसल संरचना असून त्यांच्या मदतीने हत्ती टाचणीसारख्या अगदी बारीक वस्तूही उचलू शकतो.

११) सोंडेच्या त्वचेवर खोलगट सुरकुत्या असतात.

१२)पुढील पायांवर ४ किंवा ५ बोटे असतात तर मागील प्रत्येक पायाला तीन बोटे असतात.

१३) त्वचेची सैलसर घडी मागील पायांशी व शरीराच्या बाजूंशी जुळलेली असते.

१४) आशियाई हत्तींत ही घडी नसते.आफ्रिकी हत्ती फक्त सहाराच्या दक्षिणेस राहतात.

१५)त्यांचे वन्य व झुडपी (सॅव्हाना) हत्ती हे दोन प्रकार वा उपजाती आहेत.

१६)सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील बहुतेक देशांत आ ढ ळ णा रे झुडपी हत्ती अधिकमोठे असून त्यांचे सुळे अधिक वजनदार असतात.

१७)कॅमेरून, काँगो (ब्राझव्हिले), काँगो (किन्शासा ), तसेच मध्य व पश्चिम आ फ्रि के ती ल इतर देशांत वन्य हत्ती आढळतात.

१८)या दोन्ही उपजाती वने, गवताळ प्रदेश, पर्वत, दलदली व झुडपांच्या प्रदेशांत राहतात.

१९)अनेक शास्त्रज्ञांच्या मते या दोन वेगळ्या जाती आहेत, तर काहींच्या मते पश्चिम आफ्रिकेतील वने व झुडपांचे प्रदेश येथे रा ह णा री पश्चिम आ फ्रि की ही तिसरी जाती आहे.

२०) लो. आफ्रिकाना सायक्लॉटिस ही स्वतंत्र उपजाती सन२००० मध्ये जाहीर झाली असून ती झुडपी हत्तींपेक्षा लहान, बारीक व सुळे खालील दिशेत असलेली आहे.

२१)त्यांची खांद्याजवळ उंचीसु. २ मी. व वजन सु. १,३०० कि.ग्रॅ. असते. त्यांचे सुळे सु. ३ मी.पर्यंत लांब असतात.

२२) आफ्रिकी हत्ती मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, झाडाची पाने व मुळ्या खातात ते क्वचितच गवत खातात.

२३) ते मुकेन झाडाची फळे खातात.त्यांतून त्यांना आवश्यक औषधी द्रव्ये मिळतात. बहुतेक वेळा ते उभ्याने झोप घेतात.

आशियाई हततीविषयी माहिती Elephant Information in Marathi

१)हे दक्षिण व आग्नेय आशियातच आढळतात.Elephant Information in Marathi

२)ते भारत, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड व व्हिएटनाम येथील वनांत राहतात. त्याची पाठ कमानदार खांदा व पाठीमागील भाग यांपेक्षा अधिक उंच असते.

3) प्रौढ नराची खांद्याजवळ उंची २.७-३.२ मी. व वजन ३,६०० किग्रॅ.पर्यंत असते.

४) सर्वांत उंच आढळलेला हत्ती ३.३ मी. उंचीचा होता.

५)मादीची खांद्याजवळ उंची सु. २.४ मी., तर वजन सु. ३,००० कि.ग्रॅ. असते.

६)त्याचा रंग फिकट करडा असून त्यावर फिकट गुलाबी व पांढरे ठिपके असतात.

७)कपाळावर कानाच्या अगदी वर दोन उंचवटे असतात.

८)त्याचे कान आफ्रिकी हत्तींपेक्षा जवळ-जवळ निम्म्या आकारमानाचे असतात, त्यामुळे खांदे झाकले जात नाहीत.

बहुतेक नरांचे सुळे १.२-१.५ मी. लांब असतात. काही हत्तींना (उदा., श्रीलंकेतील हत्ती) सुळे नसतात, त्यांना ‘मकना’ म्हणतात.

९) अनेक माद्यांना सुळे नसतात तर काही माद्यांचे सुळे आखूड असतात.
१०)हत्तीला प्रत्येक जबड्यात एकूण सहा दाढा येतात.

११) एका वेळेस दोनच दाढा येतात. यांपैकी एक पूर्ण वाढलेली व दुसरी अर्धवट हिरडीवर आलेली असते.

११)नवीन येणारी दाढ पहिल्या दाढेमागे व पहिलीपेक्षा आकारमानाने मोठी असते.

१२) दुधाच्या दाढा दुसऱ्या वर्षी पडतात. दुसऱ्या दाढांचा संच सहाव्या वर्षी, तिसरा संच नवव्या वर्षी, चवथा संच २०-२५ वर्षांदरम्यान म्हणजे हत्ती पूर्ण वयात येतो तेव्हा आणि पाचवा संच ६० व्या वर्षी येतो आणि सहावा संच शेवटपर्यंत राहतो.

See also  सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

१३)सहाव्यांदा येणाऱ्या दाढेला २७ पन्हळी असतात.

१४)आफ्रिकी हत्तीच्या दाढेला ११ पन्हळी असतात.

१५)आशियाई हत्तींची सोंड आफ्रिकी हत्तींपेक्षा अधिक मऊ त्वचेची असून तिच्या टोकावर बोटासारखी एकच संरचना असते.

१६) बहुतेक हत्तीच्या पुढील पायांना प्रत्येकी पाच, तर मागील पायांना चार बोटे असतात.

आशियाई हत्तींच्या पुढील तीन उपजाती आहेत

१)भारतीय किंवा
२)मुख्य भूमीवरील हत्ती
३)सुमात्रन आणि
४)श्रीलंकन हत्ती.

शरीराचे वर्णन Elephant Information in Marathi

१) हत्तीची डोके ते शेपूट (वा त्याच्या पाठीची) लांबीही जवळजवळ प्रौढ हत्तीच्या उंचीएवढी असते (शेपटीची लांबी त्याच्या लांबीत धरीत नाहीत).

२)त्याची मान आखूड व स्नायुमय असते. त्याचे डोके प्रचंड मोठे असून कान मोठे व त्रिकोणी असतात.

३) सोंड वरील जबड्यापासून पुढे आलेली असून तिच्या तळापासून जबड्याच्या प्रत्येक बाजूला एकेक सुळा वाढलेला असू शकतो.

४) त्याच्या अवजड शरीराला चार जाडजूड पायांचा आधार असतो. शरीराच्या तुलनेत शेपटी लहान असून ती सु. १ मी. लांब असते.

५)हत्तीला सहसा कुठला रोग होत नाही, मात्र संपर्कातून त्याला इतर पाळीव प्राण्यांचे वा मनुष्यांचे रोग होऊ शकतात.

६) वन्य हत्तीची जखम व आजार लवकर बरे होतात.

७)त्याच्या त्वचेत सोंड खुपसून रक्त शोषणाऱ्या जंगलातील हॉर्स फ्लाय माश्या, बारीक पिसवा व अन्य कीटक यांचा हत्तीला फार त्रास होतो.

८) हा त्रास चुकविण्यासाठी तो सोंडेने माती अंगावर वरचेवर फवारतो.

९)बगळ्यासारखे पक्षी हे कीटक खाऊन त्याचा हा त्रास पुष्कळ कमी करतात.

१०) तो पोटातील पाणी सोंडेनेकाढून ते अंगावर फवारूनही आपला त्रास कमी करतो, अशी योजना इतर कोणत्याही प्राण्यांत नाही.

आपण आता आफ्रिकी हत्तीचे काही अंतर्गत अवयव व सांगाडा पाहूया

(१) मेंदू ,
(२) ग्रसिका,
(३) फुप्फुस,
(४) वृक्क,
(५) अंडाशय,
(६) मूत्राशय,
(७) मलाशय,
(८) जनन मार्ग,
(९) आतडी,
(१०) जठर,
(११) हृदय
, (१२) श्वासनाल.

अति महत्वाचे म्हणजे हत्तीचे अवयव इतर सस्तन प्राण्यांच्या अवयवांसारखे असले, तरी अधिक मोठे असतात.
उदा., हत्तीचे हृदय माणसाच्या हृदयाच्या पाचपट मोठे आणि पन्नासपटींहून अधिक जड असते .

या हत्तीचे केस व त्वचा Elephant Information in Marathi

१) हत्तीची त्वचा करडी, सुरकुत्या असलेली व सैलसर ठिकाणी लोंबत असते.

२) प्रौढ हत्तीची त्वचा ३ सेंमी.पर्यंत जाड असूशकते. तिचे वजन सु. ९०० किग्रॅ. असते.

३) जाड त्वचेमुळे हत्तीला ग्रीक शब्दांवरून ‘पॅचीडर्म’ असे नाव पडले आहे.

४) विशेष म्हणजे त्याची त्वचा स्पर्शासह्य वा दुखण्याजोगी नाजुक असते.
५) त्यामुळे माश्या, डास यांसारखे कीटक त्याला दंश करू शकतात.

६) हत्तीला स्वेद ग्रंथी नसतात. त्यामुळे त्याला इतर मार्गांनी शरीर थंड ठेवावे लागते. यासाठी तो कान फडफडवतो किंवा सोंडेने शरीरावरपाणी फवारून घेतो. शिवाय तो चिखलात लोळतो. चिखल शरीरावर सुकू देतो. त्यामुळे त्याचे उन्हापासून व त्रासदायक कीटकांपासून संरक्षण होते.

७) जन्मतः हत्तीच्या अंगावर विरळ, तपकिरी, काळे किंवा तांबूस तपकिरी केस असतात. वाढत्या वयाबरोबर केस हळूहळू कमी होतात.

८) प्रौढ हत्ती जवळजवळ केशहीन दिसतो. मात्र कान, नाक, डोळे व तोंड यांच्याभोवती रोम असतात. तसेच सोंड, पाय व इतर भागांवर विरळ केस असतात.

९) शेपटीच्या टोकाशी जाड केसांचा लांब झुपका असतो.

सोंडेची ओळख

१) वरचा ओठ व नाक यांच्या संयोगातून सोळा स्नायू असलेली सोंड तयार झालेली आहे.

२) ती लवचिक, बळकट, अस्थिहीन मांसाची बनलेली असते. प्रौढ हत्तीची सोंड सु. १.५ मी. लांब असून तिचे वजन सु. १४० किग्रॅ. असते.

सोंडेचा उपयोग Elephant Information in Marathi
१)श्वसन,वास घेणे,खाणे व पिणे या कामांकरिता होतो.

२)तो सोंडेने जवळजवळ नेहमीच हवा व जमीन हुंगत असतो.

३) तो सोंडेत पकडलेला झाडपाला प्रथम पायांवर आपटून त्यातील किडे व माती झटकून काढून टाकून नंतर मुखापर्यंत नेतो.

४)सोंडेनेशोषून घेतलेले पाणी त्याला फवाऱ्याप्रमाणे बाहेर सोडतायेते. प्रौढ हत्तीच्या सोंडेत सु. ६ लि. पाणी मावते.

५)हत्ती सोंडेचा वापर हाताप्रमाणे करतो. वस्तू धरणे व पकडणे, सोंडेच्या टोकावरील झडपेसारख्या संरचनेमार्फत नाण्याएवढी लहान वस्तू उचलणे, सु. २७५ किग्रॅ.पर्यंत वजनाचे ओंडके उचलून वाहून नेणे, तसेच इतर हत्तींशी संपर्क साधणे, पिलांना थोपटणे या कामांतही त्याला सोंडेची मदत होते.

६)दोन हत्ती परस्परांना शुभेच्छा देताना प्रत्येक हत्ती आपल्या सोंडेचे टोक दुसऱ्या हत्तीच्या मुखात ठेवतो.

७)तरुणनर सोंडेद्वारे कुस्ती खेळून लुटुपुटूची लढाई करतात. खऱ्या भांडणाच्या वेळी मात्र सोंड बहुधा हनुवटीखाली गुंडाळूनघेऊन तिचे रक्षण करतात.

८)अशी बहुकामी सोंड हे प्रोबॉसिडिया गणाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. संवेदन-शीलता व सहजपणे अनेक प्रकारे फिरणारी सोंड शरीरापासून जवळजवळ स्वतंत्र असल्यासारखी भासते.

त्याची सुळे व दात

१) वरचे लांब, बाकदार व कृंतक( कुरतडणारे) दात म्हणजे हत्तीचे सुळे होत.

२)त्यापासून हस्तिदंत मिळतात. प्रत्येक सुळ्यांचा ⅔ भाग वरच्या जबड्याबाहेर आलेला असून उरलेला कवटीत असतो.

३) हत्ती अन्न व पाणी खोदून काढणे, वृक्षाची साल सोलणे, संरक्षणआणि आक्रमण इ. कामांसाठी सुळे वापरतात.

४)सुळ्यांच्या साहाय्यानेते सु. ९०० किग्रॅ.पर्यंत भार उचलून वाहून नेऊ शकतात. सुळ्यांमुळेसोंडेचे संरक्षण होते.

५)हल्ला झाल्यावर सोंड दुमडून खोवली जाते.

६)पाण्यासाठी कोरड्या पात्रात छिद्रे पाडताना त्याला सुळे, पाय व सोंडयांचा उपयोग होतो.

७)भारतीय हत्तीचे सुळे १.७५-२.७ मी. लांब असून त्यांचे वजन २०-३५ किग्रॅ. असते.

८) पुष्कळ आशियाई माद्यांना व काही नरांना सुळे नसतात.

९) हत्तीला चार दाढा (चर्वणक) सुद्धा असतात. प्रौढपणी दाढांची लांबी सु. ३० सें.मी. व वजन सु. ४ कि.ग्रॅ. असते. दाढांच्या कडा दातेरी असल्याने अन्नाचे चर्वण चांगले होते.

१०) दोन्ही जबड्यांत प्रत्येक बाजूला एकेक दाढ असते व तोंडाच्या मागील भागात जादा दाढा असतात.

११) पुढील दाढा हळूहळू झिजून नष्ट होतात. मागील दाढा पुढे रेटल्या जाऊन त्यांची जागा घेतात. आयुष्यात प्रत्येकी चार दाढा असलेले सहा संच वाढतात.

१२)दातांचा आकार व आकारमान आनुवंशिकतेनुसार ठरते. दाढांचा अखेरचा संच झिजल्यावर हत्तीची उपासमार होऊन तो मृत्युपंथाला लागतो.

See also  मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य Fact about our Psychodram, Morology

याची पावलांची ओळख

१) हत्तीचे पाय खांबासारखे मजबूत असून त्याची पावले जवळजवळ वर्तुळाकार असतात.

२) टाच अंशतः उंच व तिच्या खाली ऊतकांची (समान रचना आणि कार्य असणाऱ्या कोशिकांच्या- पेशींच्या – समूहांची) चरबीसदृश तंतुमय पाचर व तिच्यावर जाड त्वचेचे गिरदीसारखे संरक्षक कवच असते.

३) जमिनीवर ठेवलेले पाऊल हत्तीच्या वजनाने प्रसरण पावते आणि पाय वर उचलल्यावर संकोच पावते.

४)त्यामुळे तो चिखलात खोलपर्यंत जाऊ शकतो व पाय सहजपणे बाहेर काढू शकतो.

५) कारण पाय उचलल्यावर पाऊल अधिक लहान होते.

६)हत्तीला खाली पडून झोपणे व उठणे अवघड असते.

७)रात्री तो खाली पडून तीन–चार तास झोपतो. उभ्या उभ्या तो लहान डुलक्या घेतो, परंतु गाढ झोपत नाही.

याच्या भावना व संवेदना

१) हत्तीचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते.

२) वास घेण्यासाठी त्याला सोंडेची फार मदत होते.

३) गंधाच्या संवेदनेवर तो इतर संवेदनांपेक्षा जास्त अवलंबून असतो. सोंड हवेत उंच धरून तो ती सतत हलवितो.

४)याद्वारे त्याला अन्न आणि शत्रू यांचा गंध लक्षात येतो.

५)सुमारे ६ किमी.हून अधिक दूर असलेल्या माणसाचा गंध त्याला कळू शकतो.

६) आसपास वाघ आल्यास त्याच्या गंधाने तो अस्वस्थ होतो व त्याचा श्वासोच्छ्वास जोराने होऊ लागतो आणि तो सोंडेचे टोक एकसारखे जमिनीवर आपटतो.

७)हत्तीला चांगले ऐकू येते.

८) माणसाला जाणवणाऱ्या ध्वनीच्या पल्ल्या-खालील ध्वनी (अवश्राव्य ध्वनी) हत्ती काढू व ऐकू शकतो.

९) हत्ती किमान ४ किमी. अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधू शकतात आणिअसा संपर्क याच्या दुप्पट अंतरावरून साधण्याची शक्यता वैज्ञानिकव्यक्त करतात.

१०) हत्तीचे स्पर्शज्ञान सोंडेत सर्वांत तीव्र असते.

११) विशेषतः सोंडेच्या टोकाने तो वस्तूचा आकार ओळखू शकतो.

१२) तसेच या रीतीने त्याला वस्तू मऊ किंवा खडबडीत आहे अथवा गरम वा थंड आहे, हेही कळू शकते.

१३)हत्तीची दृष्टी काहीशी अधू असते. त्याच्या प्रचंड डोक्याच्या तुलनेत डोळे बारीक असतात.

१४) तो आपले डोके पूर्णपणे वळवू शकत नाही. त्याला समोरचे व आजूबाजूचे दृश्य तेवढे दिसू शकते.

१५)मागील बाजूची कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी त्याला मागे वळावे लागते. थोड्याशा आवाजाने किंवा गडद रंगाने तो बुजतो.

हत्तीची बुद्धिमत्ता Elephant Information in Marathi

१) हत्तीचा मेंदू मोठा असून बुद्धिमत्तेच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या संदर्भात तो वरच्या पातळीवर आहे.

२)वन्य स्थितीतील हत्तीचे सामाजिक जीवन गुंतागुंतीचे असल्याने त्याला वर्तन व संवेदन यांविषयीची अनेक कौशल्ये शिकून घ्यावी लागतात.

३)आफ्रिकी हत्ती किमान २५ भिन्न प्रकारे साद घालू शकतात, असे अभ्यासावरून दिसून आले आहे.

४)या प्रत्येक सादीला विशिष्ट अर्थ असतो.

५) सामाजिक व्यवहारांत विस्तृत क्षेत्रातील भटकंतीमध्ये त्यांना या स्मृतींचा उपयोग होतो.

६) कळपातील कुटुंबप्रमुख मादीला (सत्ताधारी मातेला) संपूर्ण कळपाची माहितीअसते.

७) स्थलांतराचे मार्ग, फळझाडे असलेली ठिकाणे इ. गोष्टी तिलामाहीत असतात.

७)ही माहिती ती कळपातील तरुण माद्यांना देते. पुढे यातील एक मादी तिच्यानंतर कुटुंबप्रमुख होते.

८)बंदिस्त अवस्थेतील हत्ती विविध प्रकारची कामे, खेळ, कसरती इ. करायला शिकतात.

९) त्यांच्या प्रशिक्षणाच्या निरनिराळ्या पद्धती असून काही पद्धती निर्दय प्रकारच्या आहेत.

१०)त्यांमध्ये प्रशिक्षक धारदार साधनांनी हत्तीचे ताडन करतात व अखेरीस हत्तीची इच्छाशक्ती मोडून पडते.
११) तथापि, बहुतेक प्रशिक्षक सौम्य पद्धती वापरतात व त्याचे परिणामहीचांगले मिळतात.

१२) हत्ती जलदपणे शिकणारे प्राणी आहेत. चांगल्या प्रशिक्षित कर्तबगार हत्तीला आवाजाद्वारे दिल्या जाणाऱ्या चालीपर्यंत आज्ञा अवगत असते.

हत्तीची जीवन पद्धती Elephant Information in Marathi

१) प्रौढ नर व माद्या बहुतेक काळ वेगळ्या राहतात.

२) कुटुंबात माद्या व पिले असून कुटुंब सरासरी दहा हत्तींचे असते.

३) यात तीन-चार प्रकारचे नातेसंबंध असणाऱ्या माद्या व त्यांचीसंतती असते.

४)यांमध्ये नवजात ते १२ वर्षांपर्यंतची पिले असतात. प्रत्येक कुटुंबाचे नेतृत्व सत्ताधारी मादी करते.

५)नर प्रौढ झाल्यावर कुटुंबातूनबाहेर पडतात. प्रौढ नरांचे इतर नरांशी घट्ट बंध नसतात.

६)प्रौढ नर फक्त विशिष्ट प्रसंगी कुटुंबाला भेट देतात.

७)एका क्षेत्रात राहणारी कुटुंबे व स्वतंत्र प्रौढ नर यांचा अंतर्भाव हत्तींच्या समूहात असतो.

८) त्यांच्या समूहात काहीशेपासून हजारो हत्ती असतात. प्रत्येक समूह अन्नाच्या शोधात विशिष्ट क्षेत्रात पसरलेला असतो.

९) अर्धशुष्क क्षेत्रांत अन्नाच्या शोधार्थ त्यांना प्रचंड अंतरापर्यंत भटकंती करावी लागते.

१०भरपूर पाऊस व विपुल वनश्री असलेल्या क्षेत्रांत सु. २५० चौ.किमी. इतक्या मऱ्यादित क्षेत्रात समूहाचे वास्तव्य असते.

११)हत्ती दिवसभरात १६ तासांपर्यंत अन्न खात असतात.

१२) ते सरोवरांत व नद्यांमध्ये आंघोळ करतात. त्यांना चिखल असलेल्या पाण्यात लोळायला आवडते.

१३) चिखलात लोळल्यावर हत्ती आपले अंग धुळीने माखून घेतो

१४) या त्वचेवरील चिखलाच्या लेपामुळे ऊन व कीटक यांच्यापासून त्याच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.

१५)हत्ती विविध प्रकारे एकमेकांशी संपर्क साधतात .
उदा., हावभाव, अंगविक्षेप, आविर्भाव, गंध (वास) व विशेषतः आवाज.

१६) ते अनेक प्रकारचे गुरगुरण्याचे आवाज काढतात व प्रत्येक आवाजाला एक वेगळा अर्थ असतो.
उदा., घाबरलेले पिलू मोठा व घोगरा आवाज काढून गुरगुरते तर पिलाला शांत करण्यासाठी मादी गळ्यातल्या गळ्यात मंदपणे गुण-गुणल्यासारखा आवाज काढून त्याला प्रतिसाद देते.

१७) हत्ती संपर्क साधण्यासाठी किंकाळीसारखा कर्कश आवाज, चीची (वा कुईकुई) आवाज, कण्हणे, विव्हळणे, आक्रोश इ. आवाजही काढतात.

हत्तीचे अन्न Elephant Information in Marathi

१)गवत,
२)जलवनस्पती,
३) वृक्षांची पाने,
४) मुळे,
५)साली,
६) फांद्या व फळे,
७)झुडपे इ. हत्तीचे खाद्य आहे.

१८)आफ्रिकेतील हत्ती क्वचितच गवत खातात.

१९) ते मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, पाने, मुळ्या व मुकेन वृक्षाचीफळे खातात.

२०)डोक्याने धडका मारून सु. ९ मी. पर्यंत उंचीचा व सु. ६० सेंमी.पर्यंत घेराचा वृक्ष ते जमीनदोस्त करू शकतात.

२१)वृक्षाची सालसोलून काढण्यासाठी तसेच मुळे व झुडपे खणून बाहेर काढण्यासाठी ते सुळ्यांचा वापर करतात.

२२) विशेषतः बांबू , मृदुफळे, खजूर, मका, नारळ, अलुबुखार, ऊस इ. त्यांचे आवडते अन्न आहे. ते अन्य प्राण्यांचे मांसखात नाहीत.

२३)मोठा प्रौढ वन्य हत्ती दिवसभरात १४० किग्रॅ.पर्यंत खाद्य खातो व १५० लि.पर्यंत पाणी पितो.

२४) भुकेलेला हत्ती याहून बरेच अधिक खातो व पितो.

२५) तो पाण्याशिवाय सु. ३ दिवस राहू शकतो व ते शोधण्यासाठी ८० किमी. पर्यंत प्रवास करू शकतो.

२६) हत्तीच्या खाण्यापिण्याचा परिस्थिति वैज्ञानिक प्रणालीवर मोठ्या
प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. अन्नपाण्याच्या उपलब्धतेनुसार ते हंगामी स्थलांतर करतात.

२७) या काळात ते स्मृतीचा चांगला वापर करतात. त्यांनी स्थलांतरणाच्या मार्गावरील पाण्याचे स्रोत लक्षात ठेवलेले असतात.

२८) अशा स्रोताच्या छिद्रात ते सालीच्या चोथ्याचा गोळा (चेंडू) ठेवून त्यावर वाळू पसरतात. गरजेच्या वेळीवाळू व हा गोळा काढून पाणी पितात.

२९)दुष्काळात हत्तींना नाले, ओढे, नदी यांच्या पात्रांतील पाण्याच्या जागा कळतात. तेथे ते पायाने किंवा सोंडेने १ मी. पर्यंत जमीन उकरून पाणी मिळवितात. हे पाणी इतर प्राण्यांनाही उपलब्ध होते.

याची फिरण्याची पद्धत / भटकंती

१) विशेष आवाज न करता हत्ती हळू व जलदपणे चालू शकतो.

२) कारण त्याच्या पाऊलांवर गिरद्या असतात. सामान्यपणे ते ताशी ५-१० किमी. गतीने चालतात.

३) दूरवरच्या प्रवासात हत्तीचे कुटुंब ताशी १६ किमी. गतीने चालते. चवताळलेला वा घाबरलेला हत्ती ताशी ४० किमी धावतो.

अश्याप्रकारे आपण हत्ती विषयी माहिती Elephant Information in Marathi बघितली.

Leave a Comment