40 Hindu religion information in marathi हिंदू धर्म मराठी

Hindu religion information in marathi हिंदू धर्म मराठीहिंदू धर्मात काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितले गेलेले आहेत आणि हिंदू धर्म हा खूप प्राचीन धर्म मानला जातो. तर चला मग पाहूया हिंदू धर्माविषयी काही मनोरंजक तथ्य. आपण wikipedia वर अधिक माहिती मिळवू शकता

Hindu religion information in marathi हिंदू धर्म मराठी

1) हिंदू धर्म Hindu religion information in marathi जगातील तिसऱ्या नंबर चा सर्वात मोठा धर्म आहे. भारतात हिंदु धर्मातील लोकांची संख्या 90 टक्के आहे.
हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म आहे.

2) आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा सनातन हिंदू धर्म असा उल्लेख करतात.

3) संस्कृत भाषेत याचा अर्थ चिरंतन म्हणजेच कायमचा मार्ग असा होतो. .

4) एकेश्वरवाद निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकता आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात.

5) अनेक विद्वानांच्या मते हिंदू धर्म हा विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांंचे संमिश्रण आहे की ज्याला कोणी संस्थापक नाही.

6) हिंदू धर्माचे Hindu religion information in marathi संस्थापक कोण आहेत अध्यापन याचा कोणताही ठराव पुरावा नाही. त्यांचा संस्थापक तर त्याची किंवा मूळ तारखेची संबंधित कोणतीही माहिती नाही. परंतु हिंदुधर्माच्या प्रचारात ऋषीमुनी आणि लोकांच्या भूमिकेचा उल्लेख अजूनही हिंदुधर्माच्या पुस्तकात सापडतो.

7) जगातील लोकसंख्येपैकी 15 टक्के हिंदू आहेत. नेपाळमध्ये हिंदू लोकसंख्येचे प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे.

8) हिंदू धर्मात 108 हा पवित्र संख्या मानली जाते. त्यामुळे अनेकदा आपण पाहिले आहे की, 108 मण्यांच्या माळा आपल्याला दिसतात.

9) हिंदू धर्मात 108 ही पवित्र संख्या मानली जाते. कारण पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्राच्या अंतराचे प्रमाण 108 आहे

10) 3800 वर्षांपूर्वी लिहिलेले ऋग्वेद हे पुस्तक सर्वात प्राचीन पुस्तक मानले जाते.

11) भारतात सुमारे 108,000 मान्यवर हिंदू मंदिरे भारतात सापडलेली.

12) कामसूत्र हे जगातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पुस्तकांपैकी एक आहे. हिंदू धर्मात त्यातील एक लाखाहून अधिक देवदेवतांची पूजा केली जाते.

13) हिंदू धर्मातील नात्यांचे महत्त्व नीट समजले आहे. Hindu religion information in marathi

See also  Amazing Facts About Indian Kings | राजे-महाराजे

14) दुसऱ्या शतकापासून ते अगदी चौदाव्या शतकापर्यंत हिंदू तत्त्वज्ञानाने तत्त्व प्रतिपादनाची नवीन शैली स्वीकारली.

15) भगवद्गीता तयार झाली तोपर्यंत तत्त्वज्ञानाचे रूप सर्वबोधक होते. पण ग्रंथरचना सूत्रबद्ध होऊ लागल्यावर तत्त्वज्ञान क्लिष्ट व तार्किक पद्धतीने मांडले जाऊ लागले.

16) मूळचा सूत्रग्रंथ समजावून सांगायला त्या ग्रंथावर भाष्ये, वार्तिके मार्गदर्शक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. मूळ तत्त्वांचा विस्तार व निरूपण करण्याचीही पद्धती हिंदू धर्मात रूढ झाली.

17) हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासनापद्धती, मत, दर्शने आणि संप्रदायांचा समावेश आहे.

18) अनुयायांचा संख्येच्या आधारावर हिंदू धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे.

19) जगातील हिंदू धर्मियांची संख्या साधारण 1अब्ज 12 कोटी एवढी आहे.
बहुसंख्यांक हिंदू हे भारत , नेपाळ आणि मॉरिशस ह्या देशात राहतात.

20) द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या पुस्तकात जेम्स मिल ह्याने भारताच्या इतिहासाचे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश वसाहत असे संकुचित वर्गीकरण केले.

21) संकुचित वर्गीकरणामुळे पसरलेल्या गैरसमजुतीमुळे हे वर्गीकरण टीकेस पात्र ठरले.

22) हिंदू धर्माचे काळानुसार अजून एक वर्गीकरण आहे. वैदिकेतर जमाती या जातिरूपाने हिंदू समाजाचा, पण चातुर्वर्ण्याच्या बाहेरचा, भाग झाल्या होत्याच. आता वर्णही जन्मावर ठरू लागल्यावर चातुर्वर्ण्यही जातिजातींत विभागले जाऊन लोप पावले.

23) हिंदू समाज हा आता जातींचा समूह होऊन गेला. या सर्व परिवर्तनात निषादांचे काय झाले, हे पाहणे बोधप्रद आहे.

24) निषाद हे चातुर्वर्ण्याच्या बाहेर होते. आता समाज जातिबद्ध झाल्यावर निषाद ही निकृष्ट जाती ठरली.

25) ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्या संबंधातून ही निषाद जात निर्माण झाली, असे मनुस्मृती सांगते.

26) निषाद जातीला पारशव असे नाव मिळाले. आजही या नावाची जात केरळात आहे. हीच स्थिती इतर अवैदिक समाजांची झाली असावी.

27) सकृत्दर्शनी परस्पर विरोधी वाटणाऱ्या वेदवचनांची संगती बनविण्याचे शास्त्र म्हणजे पूर्व-मीमांसा, तर उपनिषदांचे तत्त्वज्ञान सुसंगत व संक्षिप्त रीतीने सांगण्यासाठी बादरायणाचार्यांनी वेदान्तसूत्र हा ग्रंथ रचला. त्यालाच उत्तरमीमांसा असे म्हणतात.

See also  Taj Mahal Information In Marathi | ताजमहाल माहिती मराठी

28) परंपरेने पुराणे अठरा असल्याचे मानले आहे. शिव, विष्णु, ब्रह्मदेव, शिवाचा पुत्र स्कंद, शिवाची पत्नी दुर्गा अशा अनेक देवतांचे पराक्रम, त्यांची उपासना करण्याच्या पद्धती, त्यांची वसतिस्थाने यांविषयीची माहिती त्या त्या देवाचे पुराण देते.

29) आपण पाहिले आहे की, एका देवालाच सर्वव्यापी परमेश्वर मानणारे एकेश्वरी धर्मपंथ या कालखंडात निर्माण झाले होते.

30) हिंदू धर्माचा Hindu religion information in marathi इतिहास म्हणजे निरनिराळ्या हिंदू धर्मपंथांचा इतिहासच होय. या धर्मपंथांव्यतिरिक्त हिंदू धर्माला निराळी अशी ओळखच उरली नाही.

31) तथापि हे धर्मपंथ परस्परांशी सहिष्णू वृत्तीने संबंध ठेवून असल्याने इतर धर्मांच्या अनुयायांत ज्याप्रमाणे सांप्रदायिक वाद व हिंसाचारही माजले, तशी गोष्ट या हिंदू धर्मपंथांमध्ये झाली नाही.

32) प्रत्येक पंथ आपापली पंथसंघटना बांधून आपल्या अनुयायांना एकत्र ठेवीत असल्याने व आपला विस्तार करीत असल्याने संपूर्ण हिंदू धर्मही विस्तारला.

33) बाराव्या शतकापासून हिंदू राज्यांचा अंत होऊ लागल्यावर मायावाद, भक्तिवाद व जातिभेदात्मक आचरण हाच खरा हिंदू धर्म बनला. तो मुसलमान व इंग्रज यांच्या राजवटीतून अव्याहत राहिला आहे.

34) प्राणिमात्र व वनस्पती यांच्यावरही मी दया दाखविली पाहिजे. ‘जो सहिष्णू, शांत, शुद्ध, निश्चल आणि चिंतनमग्न असतो’, तोच आदर्श पुरुष होय, असे विवेकानंद सांगतात.

35) या तत्त्वज्ञानाचे आणखी दोन विशेष असे की, मनुष्याचा आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे असे सांगून वेदान्ताने मनुष्याला फार मोठा दिलासा व उमेद दिली आहे.

36) तत्त्वज्ञानामुळे मनुष्याला आत्मिक -बळाचा प्रत्यय मिळतो. आत्मा व परब्रह्म यांच्या ऐक्याची जाणीव कोणालाही होत नसते. ती जाणीव किंवा साक्षात्कार होतो, तेव्हा मनुष्य पुरा हादरून जातो.

37) खुद्द विवेकानंदांनी हा अनुभव घेतला होता. ‘नायमात्मा बलहीनेन लभ्यः।’ हे विवेकानंदांचे आवडते वचन होते.

38) शारीरिक, मानसिक बळाची उपासना ही देखील आध्यात्मिक उन्नतीला आवश्यक असते, हे स्वामी विवेकानंद वारंवार सांगत असत.

39) हिंदू समाजाचे जे जातिजातींत विभाजन झाले होते व दुष्ट अशा अस्पृश्यतेचा जो कलंक समाजाला चिकटला होता, त्याच्या विरुद्ध लोकमत जोर धरू लागले.

40) इंग्रजी राजवटीमुळे शिक्षण अगदी तळागाळातील जातींपर्यंत थोड्याफार प्रमाणात झिरपत गेले.

See also  Bhagwat Gita in Marathi श्रीमद भगवतगीता सार मराठी

41) आधुनिक हिंदू तत्त्ववेत्ते विशेषतः राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन्, विनोबा भावे प्रभृतींनी सर्वधर्मसमन्वयाचा सिद्धान्त भगवद्गीतेचीच तात्त्विक भूमिका घेऊन विस्ताराने प्रतिपादिला आहे.

42) त्यांनी समानतेचा सिद्धान्त मांडला. त्यामुळे अस्पृश्य जातींकडूनही अस्पृश्यतेच्या विरोधात मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या.

43) विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा-खाली तसेच दक्षिणेतील जस्टिस पार्टीने जातीयता व अस्पृश्यता यांना प्रखर विरोध केला.

44) स्पृश्य हिंदूंतील सुशिक्षितांनीही ही मागणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उचलून धरली. भारतीय घटनेने 1950 मध्ये अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरविला.

45) अस्पृश्यता दैनंदिन व्यवहारातून नाहीशी झाली, त्याप्रमाणे लौकिक व्यवहारात जातींचा अडथळाही विरत चालला आहे. तथापि विचारातून जातीयता व अस्पृश्यता नष्ट झाली.

46) हिंदू व्यक्तीचा आचारधर्म, तिची दैनंदिन कर्तव्ये व नैमित्तिक कर्तव्ये, तिचे समाजातील आचरण निरनिराळ्या जातींचे समाजातील स्थान, अधिकार व कर्तव्ये व्यक्तिगत व सामाजिक नीती आणि या नीतीचे उल्लंघन केल्यास भोगावयाची शिक्षा, थोडक्यात लोकस्थितीचे नियमन करणारे ग्रंथ आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत.

47) त्या काळात निर्माण झाले त्यांना स्मृतिग्रंथ असे म्हणतात. त्यांतील मनुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती या प्रसिद्ध आहेत. त्या काळातले पुराणिक म्हणजे आपल्या पंथातील देवांच्या कथा सांगणारे लोक व कीर्तनकार आपापल्या पंथाने ठरवून दिलेल्या तीर्थांच्या यात्रा करीत आणि प्रवचने, कीर्तने, पुराणकथांचे विवरणकरीत हिंदू धर्माचा संदेश हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रदेशांत पोहोचवीत होते.

48) धर्मप्रसारक हिंदुस्थानच्या बाहेरही–पूर्वेकडील ब्रह्मदेश आताचा म्यानमार, कंबोडिया, व्हिएटनाम, इंडोनेशिया या देशांत आणि पश्चिमेकडील काही देशांत जाऊन तेथे आपल्या धर्माची प्रतिष्ठापना करून आले.

49) पूजा व भक्तिमार्ग हा हिंदू धर्माचा गाभा असून पुराणांनी त्याचा प्रसार-प्रचार केला. त्यामुळे हिंदू धर्माचे धार्मिक अधिष्ठान पुराणेच होते.

“तुम्हाला आमचा लेख हिंदु धर्माविषयी Hindu religion information in marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.”

आमच्या खालील पोस्ट आपण वाचल्या नसतील तर जरूर वाचा. आपणास खूप साऱ्या गोष्टी कळतील

Leave a Comment