Why do ants walk in a straight line? | मुंग्या सरळ रेषेत का बरं चालतात?

मुंग्या सरळ रेषेत का बरं चालतात?

नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास गोष्टीवर चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्ही कधी मुंग्यांना चालताना बघितले का ? हो बघितलेच असेल कारण मुंग्या सर्वीकडेच असतात . तर मित्रांनो मुंग्याच्या चालण्यामागे ही खूप मोठं कारण आहे कारण मुंग्या हे सरळ रेषेत चालतात तर आज आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत की मुंग्या सरळ का चालतात ?

मुंग्या आहे आपल्याला आपल्या आजूबाजूला कायम दिसतात मग ते आपल्या घरात असो वा अंगणात असो किंवा कुठेही. मुंग्याच्या कलर बद्दल विचार केला तर आपल्याला मुंग्या कळ्या किंवा लाल कलरच्या आढळतात.

मित्रांनो मुंगी आहे सरळ रेषेमध्ये चालतात त्यामागे खूप मोठे रहस्यमय कारण आहे आज आपण तेच पाहणार आहोत.

मित्रांनो चालताना मुंग्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर असते तरीही त्या एका रेषेमध्ये चालतात . यातून हे लक्षात येते की त्यांच्यामध्ये किती शिस्त आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की मुंग्यांच्या एकूण 12000 पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला आपल्या धरतीवर पाहायला मिळतात. मुंगी ही मोठ्या प्रमाणावर वजनही उचलू शकते. तिच्या वजनानुसार ती जास्त वजन उचलू शकते.

मित्रांनो मुंग्यांचे मोठ्या प्रमाणावर ग्रुप पाहायला मिळतात आणि या ग्रुपची एक राणी असते आणि राणी मुंगीच्या आयुष्य तब्बल 30 वर्ष असते .

मित्रांनो मुंग्या सरळ रेषेमध्ये चालण्याचे एक मोठे कारण आहे चला तर पुढे पाहूया काय आहे ते कारण ?

मित्रांनो मुंग्या चालताना सरळ रेषेमध्ये चालतात याला कारण त्यांच्या शरीरामध्ये एक रसायन आहे . या रसायनाचे नाव फरमन्स आहे .

या रसायनामुळे मुंग्या एकमेकांसोबत जुळतात म्हणजेच बोलतात आणि त्यामुळे त्यांना समजते की रंगीच्या पुढे काही अडचण आहे किंवा नाही तर त्यासाठीच ते एका सरळ रेषेमध्ये चालतात. जेव्हा मुंग्या अन्नाच्या शोधासाठी फिरतात तेव्हा अन्न मिळाले नाही तर त्यांना पुन्हा पहिल्या जागी जाण्यासाठी या सरळ रेषेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत होते तर अशा पद्धतीने मुंग्या एका रांगे मध्ये चालून स्वतःच्या गरजा पूर्ण करतात आणि हेच कारण आहे.

See also  These 5 kitchen items never expire | किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर

Leave a Comment