भारतीय संस्कृतीबद्दल अद्भुत सत्य Amazing Fact about Indian Culture

भारत हा देश विविध संस्कृतीने नटलेला आहे. तसेच येथील बोलीभाषा, राहणीमान, वेशभूषा यामध्ये भिन्नता आढळून येते. भारतीय संस्कृतीत परकियाच्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या संस्कृतींचा पाया रोवला गेला.
भारतात असलेल्या संस्कृतीबद्दल मनोरंजक तथ्य पाहूया.

1) भारतीय संस्कृती ही खूप जुनी संस्कृती आहे. तसेच आपल्या संस्कृतीवर परकीयांची अनेक आक्रमणे झालीत परंतु ती नष्ट झाली नाही.

2) भारतीय संस्कृती ही उपासना त्याग संयम सहिष्णुता इत्यादींचे मिश्रण आहे. तसेच ती अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेते.

3) साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता. भारतीय संस्कृतीने सत्याचा प्रयोग, भारतीय संस्कृती म्हणजे सारखे ज्ञानाचा मागोवा पुढे घेत जाणे.

4) जगात जे काही सुंदर, शिव व सत्य दिसले ते घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे.

5) भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीचा उदय व अस्त, आर्याचे स्थलांतरण, ग्रीक, पायशन शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण या प्रक्रियेमधून भारतीय संस्कृती समृद्ध झाली.

6) भारतीय सांस्कृतिक प्रवास हा राजकीय, सामाजिक, धार्मिक यामधून घडलेला आहे.

7) भारतीय संस्कृतीचा अभ्यास म्हणजे भाषा, साहित्य, वस्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यांसारख्या कला आविष्कारांचा समावेश यामध्ये होतो.

8) प्राचीन भारतात सिंधू संस्कृती वैदीक काळ, मौर्य पूर्व काळ, मौर्य काळ, गुप्त पूर्व काळ, गुप्तोत्तर काळ, मध्ययुगीन भारतामध्ये आद्य मध्ययुगीन काळ, चोल साम्राज्य, गुर्जर, प्रतीहार, राष्ट्रकूट पाल्यांचा संघर्ष. सुलतानशाही मुगल साम्राज्य, दक्षिणमध्ये विजयनगर व बहामनी राज्य, आधुनिक भारत, कंपनीचा काळ भारतीय राष्ट्रवादाचे उदयाचा काळ, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत यांच्या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती पहायला मिळतात.

9) सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये हेच भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. येथील महत्त्वाची शहरे राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था समाजव्यवस्था, धार्मिक धारणा लिपी मृतदेह पुराणाच्या पद्धती महत्त्वाचे अवशेष व पुरानाच्या पद्धती महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ या संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसत आहे.

See also  तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल काही रोचक तथ्य Amazing Fact About Dreams in Marathi

10) सिंधू संस्कृती व आर्यांचे आगमन यांच्याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.

11) सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण ऱ्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो. इतिहासकारांमधील वाद हा वाद म्हणूनच स्वीकारायचा असतो. वैदिक काळापासून पुढे मात्र भारतीय इतिहास एका विशिष्ट उत्क्रांतीची साखळी दर्शवतो.

12) भारतातील वेगवेगळ्या महात्म्यांनी भारतीय संस्कृतीत भर घालून गेले.
हे महात्मे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झाले होते त्यांच्यात सुद्धा मतभिन्नता होती
परंतु सर्वांचे ध्येय सारखेच होते.

13) या महात्म्याने मध्ये फुल्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले सर्वस्व वाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.

14) महर्शी कर्वेंनी विधवा विवाह चळवळी साठी हयात घालविली. सेवाव्रती बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची अविरत सेवा करून आनंदवन निर्माण केले. हे सर्व महात्मे भारतीय संस्कृतीला उच्च स्थानावर नेण्यासाठी झटले होते.

15) नविन विचारांसाठी भारतीय संस्कृतीची कावडी सतत उघडी आहे. याचे वर्तमान काळातले उत्तम उदाहरण म्हणजे कम्प्युटर क्षेत्रात भारताने केलेली प्रगती.

16) भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती या दोन संस्कृती मध्ये खूप फरक आहे.

17) ऋग्वेदिक काळातील भटकी अर्थव्यवस्था उत्तर वैदिक काळात शेतीप्रधान होते. ऋग्वेदिक काळातील धार्मिक धारणा या साध्या व सोप्या संस्कृती होती.

18) देवाची साधी गद्य स्तृती ही पूजा होती. बालविवाहाची प्रथा नव्हती तर विधवा पुनर्वविाहास संमती होती. स्त्रियांना शिक्षणाचा व सार्वजनिक सभांमध्ये सहभागाचा हक्क होता. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या काही ऋचा स्त्रियांनी रचल्या आहेत.

19) उत्तर वैदिक काळात देवाची पद्य स्तृती, मंत्रांचा वापर जादुई मंत्रांचा असा प्रवास दिसतो. याबरोबरच नंतरच्या वैदिक काळात यज्ञविधी व पशूबळी यांचे स्तोम वाढताना दिसते.

20) ब्राह्मण साहित्यप्रकारामध्ये विधींच्या शास्त्रांचा पगडा दिसून येतो. यज्ञविधी व पशूबळी यांच्या अतिरेकाला पहिली प्रतिक्रिया म्हणजे आरण्यक व उपनिषद ही साहित्यकृती होय.

See also  भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India

21) या दोन्ही साहित्यकृतींनी विधींच्या अतिरेकावर टीका केली. ही प्रतिक्रिया मात्र वैदिक धर्मातर्गत प्रतिक्रिया ठरते.
विधी व पशूबळी यांच्या अतिरेकाला मिळालेल्या प्रतिक्रियां पैकी वेदिक धर्माच्या अधिसत्तेला अमान्य करत वेगळे पर्याय निर्माण करणारी प्रतिक्रिया म्हणजे मौर्यपूर्व काळात 64 वेगवेगळ्या पंथांचा उदय झाला. या 64 पंथांपकी जैन व बौद्ध धर्मानी खऱ्या अर्थाने वैदिक धर्माला पर्याय निर्माण केला.

22) त्याहीपुढे जाऊन बौद्ध धर्माने नवे आव्हान निर्माण केले. या दोन्ही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास अत्यंत आवश्यक ठरतो. या तत्त्वज्ञानाने भारतामध्ये धार्मिक सुधारणेचा पाया रोवला आणि भारतीय समाज व संस्कृतीवर दूरगामी परिणाम केला.

23) विधी व पशूबळी यामध्ये ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णाचे हितसंबंध गुंतले होते. क्षत्रियांना त्यांच्या अधिसत्तेला अधिमान्यता हवी होती तर ब्राह्मणांना उपजीविका. पशूंचा बळी, पशूंची गरज असलेल्या वैश्य व शूद्रांच्या हितसंबंधा विरुद्ध गेला. परकीय आक्रमणे व त्यातून झालेली सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली.

24) भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासा मुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेतल्या.

25) भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृती दरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुग काळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतीं दरम्यान झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे.

26) भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

27) भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

28) देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती.

29) भारतीय संस्कृती प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे.

See also  भारत देशाच्या 40 आश्चर्यकारक गोष्टी, 40 Amazing Fact About India

30) वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ साधन ग्रंथ आहेत. भारतीय संस्कृती समजून घेताना या धार्मिक साहित्याचा उपयोग होतो. वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने वेद, उपनिषदांचा, आरण्यक ग्रंथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

31) वसाहतकाळात भारतामध्ये 1920 पर्यंत राजकीय सुधारणा झाल्या नव्हत्या आणि ज्या काही केल्या गेल्या त्यांतून काही थोडयांनाच स्थान मिळाल्याने व्यवस्थात्मक पातळीवर राजकीय क्षेत्राचे जमातवादीकरण केले गेले. यातून भारताची सार्वजनिक संस्कृती गोठविली गेली.

32) वसाहतवादातील भारतातील आरोग्याचा विचार केला, तर पारंपरिक वैदयकीय व्यवहारांना मोडीत काढले गेले. या क्षेत्रात आदिवासींचे जसे उद्योगीकरण झाले, तसे घरगुती औषधोपचारांच्या व्यवहारांमध्ये असणाऱ्या स्त्रियांनाही अडाणी ठरविले गेले. सर्वसामान्य माणसांची दैनंदिन जीवनात सुदृढता यायला लागली.

33) अभौतिक बाह्य विश्वास अन्वर संस्कार करून त्याला मानवाच्या उन्नतीसाठी उपायकारक बनविणे हा भारतीय संस्कृतीचा मुख्य विभाग आहे.

34) शेती, पशुपालन, स्थापत्य, धातुकाम, यंत्रनिर्मिती, नगररचना, औषधी संशोधन, अर्थ उत्पादनआणि वितरण या सर्व गोष्टी गोष्टींचा त्यात समावेश होतो.

35) आधिदैविक भाग्य अनुकूल व्हावे, प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची पूजा आणि प्रार्थना करणे, जपतपादी आचरणे, मंत्र तंत्र आणि टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्याद्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.

36) भारतीय संस्कृतीत अध्यात्मिक स्वतःच्या मन, बुद्धीवर संस्कार करून त्यांना योग्य आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे. आदर्श आध्यात्मिक विकास आहे.

37) धर्म, तत्वज्ञान, नीतीनियम, विद्या-कला, सद्गुण, शिष्टाचार, संस्कार सर्व गोष्टींचा अंतर्भाव भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक विभागात होत असतो.

” तुम्हाला आमचा लेख भारतीय संस्कृतीविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे आपण वाचले का?

हिंदू धर्माविषयी अद्भुत तथ्य, Amazing Fact About Hindu Religion

हत्तीविषयी अद्भुत सत्य Amazing Fact About Elephant

हृदयासंबंधी जाणून घ्या ह्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत Amazing Fact About Heart

Leave a Comment