Playing Card Secrets | पत्त्यांमधील 4 राज्यांपैकी बदाम राज्याला मिशा नसतात यामागील रोचक कारण

Playing Card Secrets – पत्त्यांमधील 4 राज्यांपैकी बदाम राज्याला मिशा नसतात यामागील रोचक कारण…पत्त्यातील तीन राज्यांना मिश्या मात्र एका राजाला मिशीच नाही. याचं नेमकं कारण काय आहे? ते आपण या लेखात जाणून घेऊया. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना पत्ता, जुगार खेळता येतो तर बरेच जणांना जुगार खेळता येत नाही. बरेच जण आवडीने टाईमपास म्हणूनही हा खेळ खेळत असतात. 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये चौकट, किल्वर, इस्पिक, बदाम ही चार चिन्ह आणि त्याच रंगाचे चार राजा असतात.

असे सांगितले जाते की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजालाही मिशी होती. पण जेव्हा या पानांची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा डिझायनर बदामच्या राजाची मिशी बनवायला विसरला. आश्‍चर्य म्हणजे चूक कळल्यानंतरही त्याने ती सुधारली नाही आणि मग या चारपैकी एक राजा मिशीशिवाय राहिला. ही चूक न सुधारण्याचे एक कारण असेही मानले जाते की ‘बदाम राजा’ हा ‘शार्लेमेन’ या फ्रेंच राजा चे चित्र आहे, तो दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या. या राजावर एक हॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे, त्यातही राजाला मिशी नव्हती.

पत्ते आणि राजांचे कनेक्शन पत्त्यांमधले 4 राजे इतिहासामधील काही महान राजांचे प्रतिनिधीत्व करतात. पहिला हुकुमाचा बादशहा हा प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिडचे, किल्वर या कार्डावर मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आहे. तिसरा चौकट हा रोमन राजा सीझर ऑगस्टसचे तर चौथा बदाम हा फ्रान्सचा राजा शारलेमेन आहे, जो रोमन साम्राज्याचा पहिला राजा होता.

याविषयी सांगितली जाणारी दुसरी कथा मात्र अधिक रोचक आहे. या कथेनुसार बदाम राजा हा किंग शारलेमेनवरून चितारला गेला. हा राजा दिलदारपणासाठी आणि त्याच्या देखणेपणासाठी प्रसिध्द होता. इतरांहून आपण वेळे दिसायाला हवे या विचारातून या राजाने स्वत:च्या मिशा छाटून टाकल्या होत्या.

See also  38 Koli (Spider) in Marathi कोळी किटकांविषयी मनोरंजक तथ्य

त्याकाळात बिनमिशीचा पुरुष अपवादाने असे. उलट दाढी मिशांचं जंगल असणारे पुरुषी चेहरे सर्वत्र दिसत. किंग शारलेमेननं मिशा काढून चेहरा स्वच्छ केला आणि त्याच्या देखणेपणात भर पडली. म्हणूनच या देखण्या आणि लोकप्रिय राजाच्या आठवणीत बदाम राजा बनविला गेला. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की बदाम राजाला मिशा का नसतात.

Playing Card Secrets ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment