टायटॅनिक विषयी अद्भुत सत्य Amazing Facts About Titanic

आज आपण टायटॅनिक या जहाजा विषयी काही मनोरंजक तथ्य जाणून घेऊया. ज्या जहाजाविषयी आपण माहिती घेणार आहे ते जहाज टायटॅनिक या नावाने ओळखले जाते.

1) जेव्हा टायटॅनिक हे जहाज सफरीला निघाले, तेव्हा 10 एप्रिल 2012 या दिवशी इंग्लंड मधील साऊथ हैम्पटन येथून न्यूयार्क या शहरांमध्ये जायला निघाले होते.

2) जेव्हा ते जहाज समुद्रात बुडाले, त्यादिवशी 14 एप्रिल 1912 हा दिवस होता.

3) अटलांटिक महासागरात एका मोठ्या हिमनगाला या जहाजाची टक्कर झाली. दोन-तीन तासाच्या नंतर, पाहता पाहता हे जहाज अवघ्या 40 मिनिटाच्या आत समुद्रात बुडाले.

4) टायटॅनिक जहाज कधीच समुद्रात बुडू शकत नाही, असा टायटॅनिक जहाज बनवणाऱ्याचा दावा होता. परंतु निसर्गाचा प्रकोप कधी येईल हे सांगता येत नाही. एका हिमनगाला टकरुन हे जहाज समुद्रात बुडालेली आहे, हे सर्वांनाच माहित आहे.

5) टायटॅनिक एक स्पेशल जहाज होते आणि या जहाजावर हजारो प्रवाशी एकाच वेळी प्रवास करू शकत होते. तेव्हाच्या काळातील सर्वात मोठे जहाज म्हणून टायटॅनिक जहाजाला कीर्ती मिळाली होती.

6) या जहाजावर एकाच वेळी हजारो लोकांचे जेवण बनत असे, हे जहाज एवढे मजबूत होते की, या जहाजाला कोणीही टक्कर देऊ शकत नव्हते.

7) आताच्या पंच तारांकित हॉटेल्समध्ये ज्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध असतात त्याच प्रमाणे या जहाजात सर्व सुविधा उपलब्ध होत्या.

8) जवळपास शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी टायटॅनिक जहाज समुद्रात बुडण्यास झालेला आहे.

9) टायटॅनिक हे जहाज मानवनिर्मित पहिली सर्वात मोठी वस्तू होती. जे मानवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत होती.

10) टायटॅनिक हे त्याकाळचे सर्वात मोठे जहाज होते त्याची लांबी 289 मीटर होती. टायटॅनिक जहाजा ची निर्मिती करण्यासाठी 3 हजार पेक्षा जास्त मनुष्यबळांची संख्या तर लागलीच परंतु ते बनवण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला.

11) टायटॅनिकच्या पहिल्या वर्गाची किंमत आजचे हिशोबाने पाहिली तर 90,000 युरो इतकी महाग होती.

12) टायटॅनिक हे जहाज जेव्हा बुडाले त्यावेळेस अंदाजे जहाजात त्यात 1217 लोक प्रवासी होते, तर 908 लोक कर्मचारी होते. दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर एवढ्या लोकांपैकी केवळ 712 लोकांचा जीव वाचला.

See also  मध कधीच खराब होत नाही मग मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते | Honey never spoils so why is there an expiry date on the honey bottle

13) टायटॅनिक या जहाजात प्रवाशांची काळजी घेतल्या जात असे. त्यामध्ये 15,000 बियरच्या बाटल्या तर 10,000 वाइनच्या बाटल्या होत्या.

14) पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना जेवणात 11 प्रकारच्या पदार्थांचे मेनू दिल्या जात होते. मासे, मटन, वेगवेगळे गोड पदार्थ, चीज इत्यादी खाद्यपदार्थ समाविष्ट होते.

15) जेव्हा सर्वांना वाटले की टायटॅनिक जहाज आता बुडणार आहे, त्यावेळेस सर्वांनी मरणाला स्वीकृती दिली. काही लोकांनी नवीन कपडे परिधान केले, तर काही लोकांनी गाणे गाऊन, गिटार वाजून मरणाचे स्वागत केले. काहींनी सिगरेट ओढली तर काही बियर पिऊन एन्जॉय केला.

16) जे लोक या जहाजातून वाचलेले आहे, त्यांच्याकडून टायटॅनिक विषयी माहिती ऐकल्यास आजही मनाला भयभीत करून जाते.

17) 70 वर्षाच्या कालावधीनंतर ही टायटॅनिक जहाज समुद्रात तसेच पडून होते. त्या टायटॅनिकचे अवशेष समुद्रात पडून होते.

18) 70 वर्षानंतर  रॉबर्ट बलार्ड आणि त्यांच्या टीमने सर्वात आधी 1985 साली या जहाजाच्या अवशेषांना समुद्रात शोधून काढण्यात यश आले.

19) टायटॅनिक वरील अनेक लोकांना जहाजात दुर्घटना झाली, हे समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच अर्धवटच गेल्या. 

20) टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी कलाकारांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील विविध प्रकारची उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती, तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले. हे बातमी ऐकताच अनेक तज्ज्ञांना धक्का बसला. 

21) पहिल्या वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती, तर तिसऱ्या वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.

22) चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार 14 एप्रिल दुपारी 13.45 ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने या संदेश याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

See also  These 5 kitchen items never expire | किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर

23) संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री 11.40 वाजता टायटॅनिक किनाऱ्यापासुन 400 मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला.

24) सावधानतेचा संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने ताबडतोब जहाज डावीकडे वळविण्याचे आदेश दिले.

25) बऱ्याच प्रयत्नानंतर जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिक ची सरळ टक्कर टाळण्यात जरी यश आले असले, तरी जहाज पुर्णपणे बचावले नव्हते.

26) टायटॅनिक च्या उजव्या बाजुचा पाण्याखाली 20 फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला व जहाजाच्या त्या भागाला मोठ्या भेगा पडल्या. झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत शिरले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिक चा मागील भाग पाण्याखाली गेला.

27) टायटॅनिक मध्ये पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.

28) जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे दोन प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील. आणि दुसरे म्हणजे 1178 इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण − 2 °C इतके होते. ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.

29) अटलांटिक महासागरामध्ये 13 हजार 125 फूट खोलीवर ‘टायटॅनिक’चे अवशेष आहेत. या अवशेषांवर पाण्याचा तसेच इतर अनेक घटकांचा परिणाम होत आहे. या ठिकाणच्या पाण्याचे तापमान वर्षातील बराच काळ एक डिग्री सेल्सियस असते.

30) समुद्रातच्या पाण्यातील क्षारांचाही या जहाजाच्या अवशेषांवर परिणाम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे धातूवर परिणाम करणाऱ्या जिवाणूंमुळे जहाच्या अवशेषांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे.

31) कॅलॅडॅन ओशनिक या कंपनीच्या माध्यमातून ही पहाणी करण्यात आली आहे. 1997 साली प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या घडलेल्या वाईट प्रसंगावर ‘टायटॅनिक’ सिनेमा काढला. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. जगभरात या चित्रपटाला खूपच प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन या जहाजाबद्दल सर्वसामान्यांना असणारे आकर्षण अधिक वाढले होते. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या जहाजावरील अनेक जागांचे अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

See also  जगातील 35 मनोरंजक तथ्य, Amazing Facts in the World

32) टायटॅनिक जहाजाला खूप वर्षे उलटून गेल्यानंतर आता अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक करार निर्माण झालेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय करार होय.

33) आंतरराष्ट्रीय करारामुळे दोन्ही देशातील सरकारांना लायसन्स पास करणे किंवा रद्द करणे यांचे अधिकार प्राप्त झाले आहे. या जहाजावर कोणाला प्रवेश द्यायचा व तेथील कोणत्या कलात्मक गोष्टी किंवा वस्तू हटवायचे हे देखील त्यांना ठरविता येणार आहे.

34) टायटॅनिक या जहाजा विषयी सर्वांनाच आश्चर्य वाटते, अशा जगप्रसिद्ध असलेल्या, टायटॅनिक जहाजाचे अवशेष सुरक्षित ठेवण्यासाठी हा करार महत्वपूर्ण समजला जातो.

35) अटलांटिक जहाजांच्या अवशेषांत बाबत 1985 मध्ये माहिती मिळालेली होती. अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाल्याने तो भाग आंतरराष्ट्रीय भागात येत असल्याने, त्यावर लक्ष ठेवणे शक्य नव्हते. मात्र इंग्लंड व अमेरिका यांच्या- मध्ये करार झाल्यामुळे त्यावर लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे.

36) वीस -तीस वर्षात जहाज पूर्णपणे समुद्रात सामावून जाईल. जहाजाचा कोणताही अवशेष पुन्हा दिसणार सुध्दा नाही. यामागे असे कारण आहे, की समुद्राच्या पाण्यात असणारे जिवाणू जहाजाच्या लोखंडी आवरणाला कुर्तळून नष्ट करत आहेत.

37) प्रत्येक दिवसाला समुद्रातील जीव 180 किलो जहाजाचा भाग नष्ट करत आहेत. असे वैज्ञानिक लोकांचे असे मत आहे, की टायटॅनिक चे वय आता जास्त दिवस राहिले नाही. काही वर्षे उलटून गेल्यानंतर त्याचे अस्तित्व संपुष्टात येईल.

“तुम्हाला आमचा लेख टायटॅनिक विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका.

हे आपल्याला माहिती आहे का?

संविधानाविषयी अद्भुत सत्य Amazing Facts About Indian Constitution

श्रीमद भगवत गीतेबद्दल 32 सत्य Amazing Fact About Bhagwat Geeta/Gita

विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य Fact about our Psychodram, Morology

Leave a Comment