Cat Meaning Information in Marathi मांजर

बरेच लोक मांजरीला मनोरंजनासाठी पाळतात. मांजर Cat Meaning Information in Marathi जरी पाळीव प्राणी असली तरी कुत्र्या एवढी इमानदार नाही. मांजरीच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. मांजर विषयी आज आपण मनोरंजक तथ्य पाहूया.

1) मांजरीच्या बोलण्याचा प्रकारांमध्ये म्याऊ म्याऊ करणे, गुरगुरणे, कंपयुक्त आवाज करणे, फूसफूसने, कल्लोळ करणे तसेच मांजरीच्या विशिष्ट शारीरिक भाषेचा समावेश आहे.

2) मांजर ही सामाजिक प्रजाती असली तरी शिकार नेहमी एकटीच करते व आपली शिकार दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. मांजर ही एक सामाजिक प्रजाती आहे.

3) मांजरीचे कान सूक्ष्म आवाज सुद्धा ऐकू शकते. त्यामुळे उंदीर किंवा लहान संस्थन प्राणी यांनी केलेले आवाज ते अतिशय सहजपणे ऐकू शकतात.

4) मांजर Cat Meaning Information in Marathi हा असा शिकारी आहे जो पहाटे आणि संध्याकाळी सर्वात जास्त सक्रिय असतो.

5) मांजरीचे मजबूत लवचिक शरीर, तीक्ष्ण दात आणि मागे घेतले लहानपणजे शिकार मारण्यासाठी उपयुक्त असते.
मांजरीची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता चांगली असते.

6) काही मांजरीच्या डोळ्यातील बाहुल्या उभ्या तर काही जातींमध्ये वाटोळ्या असतात.

7) वाघ, सिंह, चित्ता हे मांजरीच्या कुळातील वन्य प्राणी आहेत. व त्याच प्रमाणे मांजर जात मासाहारी आहे. शिवाय मांजरीला वाघाची मावशी देखील म्हणतात.

8) चार कोटी वर्षांपूर्वी ऑलिगोसीन काळाच्या शेवटी मांजराच्या कुलातील प्राणी अस्तित्वात होते. असे त्या काळातील सापडलेल्या जीवाश्मावरून लक्षात येते.

9) मांजराच्या कुळातील हल्लीची प्राणी व जीवाश्म यात फरक आढळून आला आहे. त्यावेळेच्या प्राण्यांच्या जबड्यातील सुळे हल्लीच्या मानाने बरेच लांब होते.

10) त्याकाळात आढळणारे प्राणी हल्ली सिंहाच्या एवढे होते. गेल्या काही हजार वर्षात हे प्राणी नामशेष झाले आहेत.

11) युरोप, आशिया, आफ्रिका या भागातील रान मांजररापासून घरमांजराची उत्पत्ती झाली असावी असे सूचित करण्यात आले आहे.

12) घर माणसं कुठे व केव्हा माणसे गेली हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी, इजिप्तमध्ये प्रथमता 3500 वर्षांपूर्वी माणसाळले असावे असे मानले जाते.

See also  Heart Attack Symptoms in Marathi हृदयासंबंधी माहिती

13) जगाच्या पाठीवर अजूनही काही रानमांजरे आढळतात व त्यांच्या शरीराची ठेवण गुणविशेष घर मांजरा प्रमाणेच असते.

14) 2500 ते 2200 या काळातील पाचव्या व सहाव्या इजिप्शियन राजवंश आणि मांजर हा प्राणी पवित्र असल्याची घोषणा केली, असली तरी त्या वेळी ती माणस आलेली असतीलच असे नाही.

15) ग्रीस व चीन देशामध्ये पाचव्या शतकाच्या सुमारास घर मांजराची अस्तित्व होते. शंभर वर्षापूर्वीच्या संस्कृत वाढण्यात मांजराचा उल्लेख केला आहे.

16) अरब, जपानी लोकांना सहाव्या शतकापर्यंत मांजर माहित नव्हते.Cat Meaning Information in Marathi

17) दक्षिण मध्य वेल्समधील होबेलदा या राजपुत्राने 936 मध्ये मांजरांच्या संरक्षणाचा कायदा केला. ही ग्रेट ब्रिटनमधील मांजराच्या विषयीचे सर्वात जुनी नोंद आहे.

18) अमेरिकेत 1750 च्या सुमारास घरमांजरे प्रथमता पाळण्यात आली.

19) धर्म व चेटूक विद्या या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनेक देशात मांजराचा संबंध आलेला आहे. मांजराचे डोके असलेली बसतो. नावाची ईजिप्शियन लोकांची देवी होती व ब्यूबॅस्तिस शहरात तिचे पूजास्थान होते.

20) पाचव्या शतकात हिरॉडोटस यांच्या लिखाणावरून त्या देशात मांजर मारणाऱ्याला देहांताची शिक्षा होती असे दिसते.

21) त्या काळात मांजर मेल्यावर त्याच्या शवाची मम्मी करून ठेवीत. तेलबस्ता या गावी अशा अनेक ममी उत्खननात मिळाल्या आहेत. तसेच या मम्मीच्या शेजारी मांजरांना खाद्य म्हणून ठेवलेल्या उंदराच्या ममी पण आढळून आल्या आहेत.

22) रोमन लोकांच्या देवळात माणसाशिवाय फक्त मांजर या प्राण्यालाच मंदिरात प्रवेश असे.

23) गेल्या दोनशे वर्षात मात्र लोकांचा मांजर आणि बद्दलचा आदर नाहीसा होऊन त्यांची बरीच निर्भत्सना व छळ करण्यात आला आहे.

24) ख्रिश्चन जगतामध्ये मांजर विशेषत काळी मांजर व गूढविद्या यांचा संबंध लावून मांजराचे हाल केले गेले. जर्मनीमध्ये काही प्रसंगी मांजराचे दर्शन संकटाला आमंत्रण समजतात.

25) लहान मुलांच्या पाळन्याशेजारी मांजरांना जाऊ देत नाहीत. आजारी माणसाच्या बिछान्यावर काळा मांजर बसलेले दिसली, म्हणजे त्या माणसाचा मृत्यू जवळ आहे असं समजतात.

See also  हरीण माहिती मराठी Harin in Marathi

26) महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना मांजर आडवी गेल्यास कार्य सिद्धी होणार नाही, अशी भारतामध्ये समज आहे.

27) मांजराला Cat Meaning Information in Marathi ठार मारणे हे महापाप समजतात आणि त्याबाबत प्रायचित्त म्हणून काशी यात्रा करावी किंवा सोन्याचे मांजर दान करावे असे सांगतात.

28) अठराव्या शतकाच्या मध्यापासून मांजर हा प्राणी पुन्हा लोक उपयोग होऊ लागला व कुरतडुन खाणाऱ्या गणातील प्राण्यांच्या संहारासाठी ती कित्येक शहरातून पाळली जाऊ लागली.

29) अमेरिकेत मांजर Cat Meaning Information in Marathi लोकप्रिय ठरून लागलीये. तेथील घरांमध्ये जो 24% मांजरे पाळली जातात. व त्यांची एकूण संख्या 3 कोटी 40 लक्ष आहे.

30) अमेरिकेत मांजरासाठी खास पर्यटन, स्थळे,आराम गृहे, मांजर भाड्याने देणाऱ्या संस्था अस्तित्व आहे.

31) घर मांजराचे सर्वसाधारण वजन 2.5-5 किलोग्रामच्या असते. त्यांचा बांधा रेखीव असून स्नायू बळकट असतात. त्यामुळे मांजर चपळ असून त्यांची चाल ऐटदार असते. मांजरीला माडीवरून किंवा उंचावरून खाली पडल्यास टाकल्यास ते चार पायावरच सुरक्षित उभी राहते.

32) मांजर पायांच्या बोटांवर चालताना किंवा पळताना एकाच बाजूचा प्रथम पुढचा व नंतर मागचा पाय उचलते व मग दुसर्‍या बाजूचा पुढचा मागचा पाय उचलते मांजरांशिवाय उंट, जिराफ हे प्राणी अशा तऱ्हेने चालतात.

33) मांजराच्या पुढच्या पंजाला पाच बोटे तर मागच्या पंजाला चार बोटे असतात. बोटाच्या शेवटच्या पेऱ्याच्या हाडांवर नख्या असतात चानक्या आज बाहेर काढणे त्यांना शक्य असते. मांजरीच्या पायाचा तळवा मऊ असल्यामुळे मांजराला आवाज न करता चालता येते.

34) मांजरीच्या नाकपुड्यावरील व तुरळकपणे जबड्यावरच्या असणारा स्पर्श दृढ रोमा मुळे अंधारातही स्पर्शामुळे वस्तूचे ज्ञान त्यांना होते.

35) मांजरीच्या डोळ्यामधील जाल पटलाच्या संवेदनाशील पेशींच्या मागे प्रकाश परीवर्तित करणाऱ्या उतकांचा थर असल्यामुळे प्रकाश जाल पटलावर दोन वेळा पडतो व त्यांना अंधारात सुद्धा स्पष्ट दिसते.

36) मांजराचा स्वभाव हा चोरटा असून ते दबा धरून आपल्या भक्षावर चपळाईने झटपट घालते. म्हणून पक्षांची शिकार करण्यात पटाईत असते.

See also  मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य Fact about our Psychodram, Morology

37) मांजरीला कितीही प्रेमाने वागवले तरी मांजर कुत्र्याप्रमाणे इमानी होऊ शकत नाही.

38) मांजर Cat Meaning Information in Marathi बुद्धिमान स्वातंत्र्य प्रिय प्राणी आहे तिला एके जागी बांधून किंवा कोंडून ठेवणे आवडत नाही.

39) ती दुसऱ्या मांजरांना पाहून, रागावली असता गुरगुरते व आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यांवर देखील त्वेषाने हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाही.

40) कधीकधी मांजर गवत देखील खातांना आढळते. परंतु असे आचरण साधारणता तिचे पोट दुखले तर मांजरी गवत खाऊन आपल्या पोटातील अपायकारक पदार्थ बाहेर फेकतात. कारण मांजरांमध्ये पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसते.

41) मांजर हा प्राणी आहे, जो दिशा लक्षात ठेवून घरी परत येतो.

42) माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. परंतु मांजरीचा शरीरात 280 हाडे असतात.

43) मांजर आपल्या उंचीच्या तीन पट उंचीवरून उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येते.

44) मांजर हे प्राणी जन्मता पासून भांडखोर वृत्तीचे असतात. मांजरी एका वेळेस तीन ते पाच पिल्लांना जन्म देतात.

45) वाळवंटी मांजर हा मांजर कुळातील प्राणी आहे. हे प्राणी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी राहतात. हे सहसा दिवसा सावली किंवा छोट्या गुहांमध्ये असतात आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडते.

46) एक मांजर दिवसाला साधारणपणे सोळा तास झोपते. म्हणजे नऊ वर्षाची मांजर तिच्या आयुष्यात फक्त तिच्या आयुष्याचे फक्त तीन वर्षे जागी असते.

47) मांजरांच्या चेहऱ्यावर आणि शेपटाच्या भागात विशिष्ट प्रकारचा गंध सोडणाऱ्या ग्रंथी असतात. त्यामार्फत मांजर आपली जागा निश्चित करते.

48) फेलिसिटी नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 1963 मध्ये फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.

“तुम्हाला आमचा लेख मांजरी विषयी Cat Meaning Information in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment