Cow Information in Marathi 2021 गायची माहिती

Cow Information in Marathi गायची माहिती.  हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय स्थान आहे. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे, असे म्हटले जाते. कामधेनु म्हणून गाईचा उल्लेख केलेला आहे. तर गाईबद्दल आपण माहिती पाहूया. याव्यतिरिक्त आपण wikipedia वर माहित बघू शकता

Cow Information in Marathi 2021 गायची माहिती

भगवान श्रीकृष्णाने गाईला महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. श्रीकृष्णाने गौशाला निर्माण केल्या आणि त्यांनी त्यांच्या लहानपणी गायी चारण्याची सुरुवात गोपाष्टमीला केली. गाईपासून मिळालेले गोमित्र हे पवित्र मानले जाते तसेच दूध, दही आणि गोबर सुद्धा मानव उपयोगी वस्तू आहेत. यांपासून औषधी सुद्धा बनू शकतात.

शास्त्रज्ञांच्या मते गाय Cow Information in Marathi असा एक प्राणी आहे जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन सोडतो इतर प्राणी मात्र ऑक्सिजन घेतात व कार्बन डायऑक्साइड सोडतात. दहा ग्रॅम गाईच्या तुपापासून यज्ञ केल्यास एक टन ऑक्सीजन बनते. गायीच्या पाठीवरील हाडात आढळणारे सूर्यकेतु स्नायू हानिकारक किरणांना थांबवून वातावरण निर्मळ करतात.

सूर्यकेतु नाडी सूर्याच्या संपर्कात आल्यावर सोनं उत्पन्न करते. गायी -च्या शरीरातून उत्पन्न हे सोनं गायीच्या दूध, मुत्र व शेण या रूपाने प्राप्त होते. म्हणून बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून हे औषध रूपात देण्यात येतं. देशी गायीच्या एक ग्राम शेणात कमीत कमी 300 कोटी जिवाणू असतात.

हिंदू धर्मातील गायीचे महत्व Cow Information in Marathi

गायीच्या Cow Information in Marathi दूध, दही, तूप, मुत्र आणि शेणाद्वारे पंचगव्य निर्मित केलं जात असून याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.  हिंदू धर्माप्रमाणे गायीत 33 कोटी देवी-देवता वास करतात. पण येथे कोटीचा अर्थ प्रकार आहे. अर्थात गायीत 33 प्रकाराचे देवता वास करतात. हे देव आहे- 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्‍विन कुमार आहे.

See also  हरीण माहिती मराठी Harin in Marathi

गाय हे स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील बोव्हिनी उप कुळातील आहे . हे प्राणी रवंथ करणारे आणि पोकळ शिंगे असलेला शाकाहारी प्राणी आहे. गाय, बैल या प्राण्याची दूध व दुग्धजन्य पदार्थासाठी, मास मिळवण्यासाठी तसेच शेतीकाम आणि वाहतुकीसाठी किंवा पशुधन म्हणून जोपासना केली जाते.

गाईच्या मलमूत्र पासून इंधन आणि खत अशी उत्पादने मिळतात तसेच मृत प्राण्यांपासून कातडे सुद्धा कमावले जाते. 2009 खाली जगभरात पशुधनाच्या मोजणी नुसार गाईंची संख्या 130 कोटी आढळली आहे. एकट्या भारतात गाईची संख्या 28 कोटी पेक्षा अधिक असून जगात भारताचे पहिला नंबर लागतो.

गायीचा जनुक-नकाशाही 2009 साली तयार करण्यात आलेला आहे. गाय-बैलांचे वशिंडधारी आणि वशिंडरहित असे दोन प्रकार असून त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे बॉस इंडिकस आणि बॉस टॉरस अशी आहेत. वशिंडधारी गाय भारतीय उपखंडात निर्माण झाली आणि तेथून खुष्कीच्या मार्गाने तिचा प्रसार आफ्रिकेपर्यंत झाला.

वशिंडरहित गायींचा प्रसार प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात झाला. भारतात दोन्ही प्रकारच्या गायी आढळतात. गाईच्या तोंडात वरच्या आणि खालच्या जबड्यांत प्रत्येकी 12 दाढा असतात. तिच्या जबड्यांत पटाशीचे दात नसतात. म्हणून गाय डोके हलवून गवत उपटते आणि नंतर दाढांनी चर्वण करते. दाढांवर उंचवटे असल्यामुळे चर्वण करण्या -साठी त्यांचा उपयोग होतो.

गायीच्या Cow Information in Marathi मागील पायांच्या मध्यभागी परंतु पुढे लोंबणारे एक इंद्रिय असते. या इंद्रियाला कास म्हणतात. या कासेतच दुधाच्या ग्रंथी असतात. कासेचे चार भाग असून त्यांना सड म्हणतात. शेतकरी दूध काढतात तेव्हा सडांच्या स्तनांमधून दुधाच्या चिळकांड्या बाहेर पडतात.

गायीच्या शेण व दुधाचे महत्व

गाय हा रवंथ करणारा प्राणी आहे तसेच या प्राण्याचे जठर चार कप्प्यांचे असते. या कप्प्यांना रोमांथीका, जालिका, भंजिका आणि जठरीका अशी नावे आहेत. अशा प्रकारच्या जठरामुळे गिळलेले अन्न चर्वण करण्यासाठी पुन्हा त्यांना तोंडात आणता येते आणि नंतर गिळता येते.

भारतात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गाय डेअरी शॉर्टहॉर्न, आयर्शर व होल्स्टीन फ्रिजियन, जर्सी, ब्राऊन स्विस व रेड डॅनिश या पाश्चात्त्य जाती आयात करण्यात आल्या. रवंथ करणार्‍या जनावरांच्या पोटात जीवाणूंमार्फत होणार्‍या क्रियेतून मिथेन वायू निर्माण होतो. त्यांच्या हंबरण्यामुळे मिथेन वायू वातावरणात मिसळतो.

See also  Dog Information in Marathi कुत्रा

गोबर वायू आणि खत तयार करण्यासाठी त्यांच्या मलमूत्राचा वापर होतो. महाराष्ट्र राज्यातील जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यांत नेमाळी अभिजाती -ची जनावरे आढळतात. ह्या जनावरांचा रंग तांबडा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे अथवा मोठाले ठिपके असतात.

नेमाळी जातीच्या गाईचे शरीर फुगीर कपाळ व शिंगे गीर अभिजाती प्रमाणे मागे झुकलेली असतात. ही जनावरे आकाराने मध्यम असून गरीब व शेतकामास उपयुक्त असतात. नेमाडी गायी एका दुग्धकालात सरासरीने 900 लिटर दूध देतात.

गायीची रक्षा करणे हे देशातील सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच गाय प्रसन्नता आणि उन्नती निर्माण करणारी जननी आहे. गाय ही जननी पेक्षाही श्रेष्ठ आहे असे महात्मा गांधीजींचे म्हणणे होते.

करणस्विस,सुनंदिनी,करनफ्रिज, या फुले त्रिवेणी या भारतीय संकरीत गायी आहेत. या गायी भारतीय वंशांच्या गायीशी संकर घडवून तयार करण्यात आलेल्या आहेत.

हिंदू, जैन, पारशी धर्मात गाईला Cow Information in Marathi पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते. हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.

गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गाईचे शेण गोमूत्र गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे. माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||

या मंत्रात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना कधीच मारू नका. नाही निर्दोष व निरपराध आहे.गायीची स्तुती गाणारा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो. हिंदू धर्मात गाईची हत्या निषिद्ध म्हणजेच अपराध मानली गेली आहे.

See also  सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे. असे काही हिंदूंची समजूत आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.

गायी विषयी कायदे Cow Information in Marathi

सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगलबादशाह शहाजहखान पर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदर अली, शहा, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.

भारतातील महाराष्ट्र राज्यात 1976 पासून गोहत्याबंदीचा कायदा आहे. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गायीच्या नव्हे, तर बैलांच्या म्हणजेच गोवंशाच्या हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला.

या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती. पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात गौवध अपवादात्मक स्वरूपात होत होता. जास्तच जास्त शासकांना हिंदुंना खूश करून आपलं शासन त्यांना मजबूत करायचं होतं.

इंग्रजांनी भारतात गोहत्यावाढीला वाव दिला, गोहत्या आपण करत नसल्याचा दिखावा करण्यासाठी त्यांनी कत्तलखान्यात मुस्लिम कसायांची नियुक्ती केली.

गुरू वशिष्ठ यांनी गायीच्या कुळाचा विस्तार केला आणि गाईच्या नवीन जाती देखील शोधून काढल्या, तेव्हा गाईच्या फक्त 8-10 जाती होत्या. ज्याचं नाव कामधेनू, कपिला, देवनी, नंदनी, भौमा अशी होती.

आपण आम्हाला comment करून सांगू शकता की आपणास कसली माहिती हवी आहे, आम्ही त्याबद्दल अवश्य लेख लिहून तो आपणास वाचायाला देऊ.

“तुम्हाला आमचा लेख गायी विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

आपणास हे माहिती आहे का?

 

 

 

सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *