Indian Constitution in Marathi भारतीय संविधानाविषयी माहिती

आज आपण या लेखात भारतीय संविधानाविषयी Indian Constitution in Marathi काही न वाचलेली न ऐकलेली माहिती अभ्यासणार आहोत.

Indian Constitution in Marathi भारतीय संविधानाविषयी माहिती

1 ) भारताचे संविधान लिहून झाल्यानंतर भारतामध्ये दोन दिवस खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950.

2) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधानाचा स्वीकार केला तर 26 जानेवारी 1949 रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक दिन म्हणून अस्तित्वात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

3) राज्यघटनेचा प्रवास हा अत्यंत खडतर, कठीण स्वरूपाचा झाला ब्रिटीश पंतप्रधानांनी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारतासाठी घटना असायला हवी याचा पुढाकार घेतला.

4) 9 डिसेंबर 1946 रोजी घटना संघटित करण्यात आले सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. त्यावेळी समितीमध्ये 389 सदस्य होते. फाळणीनंतर 292 सदस्यसंख्या झाली.

5) घटना समितीच्या अकरा बैठका झाल्या त्या 165 दिवस चालल्यात व एकोणवीस उपसमित्या जलद कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यरत होत्या. घटनेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस अध्यक्ष होते. या घटना समितीच्या त्यावेळेस 44 सभा झाल्या होत्या. 13 फेब्रुवारी 1947 रोजी हा घटना मसुदा अध्यक्षांना सादर केला आणि हा मसुदा जनतेच्या विचारार्थ खुला करण्यात आला.

6) भारतीय जनतेने घटना समितीला पाच हजार 435 सूचना सादर केल्या त्यातील काही सूचना रद्द करून 2, 473 सूचना वर चर्चा घडविण्यात आली व त्यातील योग्य सूचना स्वीकारण्यात आल्या. ही चर्चा 144 दिवस चालली. व घटनेचा सुधारित मसुदा 25 नोव्हेंबर सादर केला. त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समिती समारोपाचे भाषण झाले.

7) 26 नोव्हेंबरला घटना समितीने या सुधारित घटना मसुद्याला मान्यता दिली. व तो स्वीकारण्यात आला 26 जानेवारी 1949 रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र अस्तित्वात आले संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष , 11 महीने, 18 दिवस एवढा कालावधी लागला.

See also  Rainbow Colours in Marathi इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य

top 5 Best Mahabaleshwar Points in Marathi – महाबळेश्वर हिल स्टेशन

भारतीय संविधानाविषयी माहिती

8) भारताचे संविधान तयार होत होते परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा अशी होती, की हे संविधान हस्तलिखित असावे. म्हणून बिहारी नारायण रायजादा यांना कॅलिग्राफी ची कला अवगत असल्याने, लिहिण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. तसेच संविधान लिहिण्यासाठी त्यांना संविधान हॉल मधील एक खोली देण्यात आली.

9) संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी त्यांना सहा महिने लागले परंतु संविधान लिहिण्यासाठी मानधन किती घेणार ? अशी त्यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला. संविधानाच्या प्रत्येक पानावर स्वतःचे नाव आणि संविधानाच्या शेवटच्या पानावर त्यांच्या आजोबाचे नाव अशी अट ठेवली होती.

10) शांतिनिकेतन मधील कलाकारांनी आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानातील हस्तकला पूर्ण केली होती. तसेच प्रस्ताविका च्या व इतर पानावरील नक्षीकाम व सजावट राम मनोहर सिन्हा यांनी केली होती.

11) भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वतंत्र व न्याय तसेच प्रज्ञा, शील, मैत्री, करुणा या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारतीय संविधानाची रचना करण्यात आली.

12) सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी शासनावर आहे आणि ही जबाबदारी राजकीय स्वरूपाची आहे. ही तत्त्वे खालीलप्रमाणे : सर्वांसाठी रोजगार हमीची तरतूद करणे, समान कामासाठी समान मोबदला, संपत्तीचे न्याय्य वितरण विनामूल्य व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सामाजिक सुरक्षितता व नशाबंदी.

13) भारतात विविध भाषा, धर्म संस्कृती प्रथा आणि परंपरा असूनही भारत देश हा एक संघाने राहण्याचे कारण म्हणजे संविधान होय. या संदर्भात सर्व जगाला आश्चर्य वाटते की, भारत देश एकजुटीने विविधतेत एकता असणारा देश आहे. देशाला एकजूट ठेवण्याचे काम खऱ्या भारतीय संविधानाने केले आहे.

14) संविधान लिहिणाऱ्या व प्रास्ताविक तर मांडणाऱ्या सर्वच टीमचे ध्येय भारताला एकत्र ठेवण्याचे होते. आणि ते त्यांनी पूर्ण केले.

15) भारताच्या राज्यघटनेत केंद्राकडे ती शक्ती आहे जी इतर देशांमध्ये पहावयास मिळत नाही. म्हणून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष येथे निर्माण होत नाही भारत हे संघराज्य आहे. युनियन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत वापरला आहे. युनियन म्हणजे संघराज्य.

See also  38 Koli (Spider) in Marathi कोळी किटकांविषयी मनोरंजक तथ्य

Indian Constitution in Marathi

16) डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व संविधान सभेचे चेअरमेन होते. आंबेडकरांना संविधानाचे पिता म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय संविधानामध्ये जगातल्या दहा देशांचा अभ्यास करून, नैतिक मूल्यांचा स्वीकार केलेला आहे.

17) पंचवार्षिक योजनांची कल्पना ही सोवियेत संघ येथून घेतले आहे. तर आर्थिक, सामाजिक अधिकाराची कल्पना आयर्लंड येथून घेतलेली आहे. व्यापार आणि कॉमर्स ही कल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतली आहे. तसेच आपत्कालीन घटनांविषयी जर्मन या देशातून घेतली आहे. भारतात सुप्रीम कोर्ट मध्ये जी कार्य केली जातात ती जपान या संविधाना मधून घेतलेली आहे.

18) संघ आणि राज्य यांच्यामधील शक्ती, वाटणी कॅनडा या देशातून घेतले आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात अमेरिकेच्या संविधानाच्या प्रेरणेने झाली आहे. आणि ती सुरुवात ”we the people” या शब्दांनी झाली आहे.

19) भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे. ज्यामध्ये सिंह, बैल, अशोक चक्र आणि घोडे आहे. हे राष्ट्रीय चीन्हाला 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकृती मिळाली.

20) भारताचे राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय प्राणी सिंह तसेच भारताचे चलन रुपया भारतामध्ये विविध भाषा बोलली जाते. तसेच राष्ट्रीय भाषा हिंदीला घोषित केले.

21) भारतीय संविधानात, भारतीय नागरिकांना काही मूलभूत अधिकार अधिकार आहेत. त्यातील 6 अधिकार हे अमेरिकेच्या संविधानातून घेतले आहे. समानतेचा अधिकार, स्वतंत्रतेचे अधिकार, शोषणाविरुद्धचा आधीकार, संस्कृती व शिक्षणाचा अधिकार धर्म स्वतंत्रता संविधानिक उपचारांचा अधिकार तसे पाहीले तर आधी संपत्तीचा अधिकार हा देखील मूलभूत अधिकारांमध्ये समावेशित आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 31 मध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्ती पासून वंचित ठेवता येत नाही. म्हटले होते परंतु अनुच्छेद 44 च्या संशोधनानंतर 1978 मधील हा अधिकार रद्द करण्यात आला.

22) सदेच्या दोन्ही सभागृहांतील एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश सभासदांचा पाठिंबा लागतो. उच्चतम न्यायालयाचा उच्च न्यायाधीश ६५ वर्षे वयापर्यंत, तर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ६२ वर्षे वयापर्यंत न्यायाधीश म्हणून काम करू शकतात. त्यानंतर त्यांना इतर शासकीय सेवकांप्रमाणे निवृत्तिवेतन मिळते.

See also  Bigboss Marathi - Big Boss Marathi

23) भारतात प्रथम १९३५ च्या कायद्याने संघराज्य पद्धती आली पण प्रत्यक्षात ती १९४६ पर्यंत कार्यवाहीत नव्हतीच. विस्तीर्ण भूप्रदेश, सास्कृतिक वैविध्य आणि बहुभाषिकता ह्यांमुळे संघराज्य पद्धती भारताला सोयीची आहे, हे तत्त्व संविधानाने मानले.

24) संघराज्य पद्धतीत एकाच वेळी दोन शासनयंत्रणा कार्य करीत असतात. एक केंद्र शासन व दुसरे राज्य शासन. त्यांच्या अधिकारक्षेत्रांची विभागणी संविधानाने केलेली असून दोन्ही शासने आपापल्या क्षेत्रात सार्वभौम असतात.

आई मराठी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या 

संविधान म्हणजे भारताचा आत्मा 

25) संघराज्याचे तत्त्व जसेच्या तसे कार्यवाहीत आणणे कधीच शक्य नसते. व्यावहारिक पातळीवर व देशाच्या, समाजाच्या गरजानुरूप त्यात बदल होत राहतात. भारताच्या संविधानाची जुळवाजुळव ज्या वेळी सुरू झाली, त्या वेळी मुसलमानांचे मताधिक्य असलेल्या प्रांतांना जास्तीतजास्त स्वायत्तता मिळावी, ह्या हेतूने रचना करण्यात आली होती परंतु फाळणीचे तत्त्व मान्य झाल्यानंतर भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली आणि ही मूळ योजना बाजूला ठेवणे क्रमप्राप्त झाले.

26) भारताचे अखंडत्व टिकवण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तन व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रबल अशा केंद्र शासनाची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे सत्तेचे वाटप करताना तीन सूची आखण्यात आल्या.

27) भारतीय संविधानात इतर राज्याच्या तुलनेत जम्मू-काश्मीर या राज्याला वेगळा दर्जा देण्यात आलेला आहे कलम 370 प्रमाणे जम्मू काश्मीर या राज्याला संसदेला इतर राज्याच्या तुलनेत संकुचित अधिकार आहेत. मात्र आता 370 कलम ही हटविण्यात आलेली आहे.

“तुम्हाला आमचा लेख भारतीय संविधान Indian Constitution in Marathi रोचक तथ्य कसा वाटला, आम्हाला जरूर कमेंट करून सांगा”आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका. तुमचे आमच्या वेगवेगळ्या लेखांबद्दल काही मत असल्यास किंवा आमच्याकडून काही माहिती कमी किंवा चुकीची वाटत असल्यास आम्हाला comment करून जरूर सांगा.

हे आपल्याला माहिती आहे का?

गरुड पक्षाबद्दल 39 अद्भुत सत्य, Amazing Fact about Egle/Garuda

कासवाबद्दल रोचक तथ्य Amazing Fact About Tortoise,कासवाबद्दल सत्य माहिती

हिंदू धर्माविषयी अद्भुत तथ्य, Amazing Fact About Hindu Religion

हत्तीविषयी अद्भुत सत्य Amazing Fact About Elephant

 

Leave a Comment