विजेबद्दल 34 सत्य Amazing Facts about Electricity/Lightnings

पावसाळ्यात आपल्याला ढगांचा गडगडाट नेहमी ऐकायला येत असतो. गडगडाट ऐकू येण्यापूर्वी, आकाशामध्ये आपल्याला लख्ख प्रकाश पाहायला मिळतो. हा प्रकाश म्हणजेच वीज होय. तर चला मग आपण पाहूया विजेबद्दल काही मनोरंजक तथ्य.

1) वीज नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षाला वीज पडून 24,000 लोकांचा मृत्यू होत असतो. प्रत्येक सेकंदाला 40 वेळा आकाशामध्ये विजा चमकतात. म्हणजेच एका दिवसात 30 लाख वेळा विजा चमकतात. परंतु त्यातील काही पृथ्वीवर येतात, तर काही ढगांमध्येच लुप्त होतात.

2) आकाशातील एका विजेमध्ये एवढी पावर असते, की शंभर वॉट चा एक बल्प तीन महिने चालू शकतो.

3) आकाशातील विजेची उष्णता 30000°c असते. सूर्या पेक्षा पाच पटीने जास्त उष्णता या विजेचा झटका मध्ये असते.

4) 1902 मध्ये वीज पडून एफिल टावरचा वरचा भाग तुटून खाली पडला होता. ज्याला नंतर बनविण्यात आला.

5) आकाशात पडणारी वीज ही चार ते पाच किलोमीटर लांबीची असू शकते. विजेचा प्रकाश एक ते दोन इंच जाडा आणि त्यामध्ये 10 करोड वॉटच्या सोबत 10,000 Amps करंट असतो.

6) वीज पडून महिलांपेक्षा पुरुषांची मरण्याची संख्या पाच पटीने जास्त असते. अमेरिकी राज्य उत्तर येथे वीज पडून 1939 मध्ये 835 मेंढ्यांचा मृत्यू झाला.

7) 1998 मध्ये आफ्रिकेमधील कांगो या शहरात फुटबॉल मॅच चालू होता. त्यावेळेस अचानक तेथे वीज पडली आणि एका टीममधील 11 खेळाडू मृत्युमुखी पडले. मात्र दुसऱ्या टीम मध्ये असणाऱ्या खेळाडूंना काहीही झालेलं नव्हतं.

8) वीज पडण्याचे जास्तीत जास्त चान्स हे दुपारला असतात. ते मानवाचे डोकं, मान आणि खांदे यांच्यावर जास्त प्रभाव पाडते.

9) विजेच्या प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो, त्यामुळे प्रथम आपल्याला विजेचा प्रकाश दिसतो आणि नंतर ढगांचा गडगडाट ऐकू येतो. मात्र ढगांचा गडगडाट आणि विजेचा प्रकाश ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी होतात.

10) स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वर 300 वेळा वीज पडते, तेही प्रत्येक वर्षाला. जर या वीजा एकत्रित केले तर 600 वॅट वीज जमा होईल.

See also  Cricket Information in Marathi - About Cricket in Hindi

11) आफ्रिकेमधील बोंगो नावाचा प्राणी नेहमी वीज पडून, अर्धवट जळलेली लाकडे खात असतो.

12) वीज पडतांना दिसत नाही तर ती जेव्हा खाली पडून वरच्या मार्गाने जाते, तेव्हाच आपल्या दृष्टीस पडते. वीजेचा जो प्रकाश आपल्याला दिसतो, तिची गती 32 करोड फूट प्रति सेकंद असते. ध्वनीची गती 1100 फूट प्रति सेकंद एवढी असते. वीज पडण्याचा आणि गायब होण्याचा कालावधी 2 मायक्रो सेकंद एवढा असतो.

13) विजेच्या बाबतीत असं कधी घडत नाही. ते एकदा जिथे वीज पडली तिथे पुन्हा पडणार नाही. तर तिथे पुन्हा पुन्हा पडू शकते. असंच एक ठिकाण एम्पायर स्टेट बिल्डिंग वर दर वर्षी 23 वेळा वीज पडते. एकदा तर 24 मिनिटात आठ वेळा ही विज त्या बिल्डिंग वर पडलेली आढळून आली.

14) तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आवाज न होता वीज पडू शकते का? तर आवाज न येता वीज पडणं हे शक्य नाही. परंतु तुम्ही आकाशामध्ये वीज चमकली असताना तुम्हाला दिसेल आणि आवाज ऐकला नसेल तर असं समजा की ही वीज तुमच्या पासून खूप दूर पडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आवाज आलेला नाही. कारण वीज हे शंभर मैल दूर सुद्धा आपल्याला दिसते परंतु आवाज मात्र बारा मैल पर्यंतच ऐकू येतो.

15) वीज आकाशात उडणाऱ्या विमानावर सुद्धा पडू शकते परंतु त्याचा काहीच परिणाम विमानावर होत नाही. 1963 च्या नंतर विमानावर वीज पडण्याची दुर्घटना आजपर्यंत झालेली नाही. कारण विमानाला तशा प्रकारे डिझाईन केल्या जाते.

16) विमान बनवण्यासाठी ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग केला जातो आणि जेव्हा विमानावर वीज पडते, त्या वेळेस हा धातू विजेला सर्व विमानामध्ये पसरून त्याला आत मध्ये जाऊ न देण्याचे काम करतो. खतरनाक विजेपासून विमानाच्या इंधनाच्या टाकीला देखील संरक्षण दिले जाते.

17) तुम्हाला प्रश्न पडला असेल की आकाशामध्ये विजा का पडतात? वीजा पडण्याचे मुख्य तीन कारणे आहेत पाहूया. एकाच ढगतील  धन व ऋण प्रभारित विभागांदरम्यान  इलेकट्रीक डिस्चार्ज होऊन विज चमकते. ही प्रक्रिया ढगांतर्गत असल्यामुळे बरेचदा वीज पडताना न दिसता ढगातून लख्ख प्रकाश पडल्यासारखा दिसतो. 

See also  Cricket Information in Marathi - About Cricket in Hindi

18) दोन ढगांमधील विरुद्ध प्रभारित विभागात  इलेकट्रीक प्रभारित होऊन  हा मार्ग लख्ख प्रकाशाने उजळून निघतो. आपल्याला आकाशात वेडीवाकडी पळणारी वीज दिसते.

19) वीज पडणे ढगातील ऋण भरीत कणांमुळे जमिनीवरील वस्तूच्या टोकावर मनोरा, इमारत इ. धनभरीत कण तयार होतात. दोन्ही ठिकाणी यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे एक विद्युत मार्ग तयार होतो आणि वीज पडते.

20) जेव्हा दोन्ही दिशांनी येणारे ढग एकमेकांना घर्षण स्वरूपात एकमेकांना भिडतात, त्यावेळेस गडगडाट असा आवाज आपल्याला ऐकू येतो. जेव्हा हे घर्षण होते, त्यावेळेस धन आणि ऋण कण प्रभारित होऊन लख्ख प्रकाश पडतो.

21) आकाशातील वीजा आपण एकत्रित करू शकत नाही, कारण आपल्याला ही माहिती नाही, ही वीज केव्हा आणि कोठे पडेल. जरीही माहिती असलं की वीज केव्हा आणि कुठे पडेल तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च येईल. त्यापेक्षा एखादाच सोलर प्लांट उभारून त्याच्यापासून वीज आपल्याला मिळू शकते.

22) वीज प्राणघातक असली तरी, आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती सावधानी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो.

23) पृथ्वीचा पृष्ठभाग हा ऋण प्रभार असतो. तर वातावरण हे धन प्रभारित असते. पृष्ठभागावरून वातावरणा सतत इलेक्ट्रॉन जात असतात. विजा पडल्या नाही तर पृथ्वी आणि वातावरणाचा समतोल बिघडून जाईल.

24) आकाशातील वीज ही घरातील वीज प्रवाहित होणाऱ्या विजय पेक्षा कित्येक पटीने जास्त पावर असल्याचे दिसून आले आहे. वीज दिवसा आघात करू शकते. ती सरळ अंगावर पडू शकते किंवा किंवा ती एखाद्या लांब वर कुठे पडली असल्यास, आपण जिथे उभे आहात तेथे लांब पाईप किंवा लाईटचे तार गेले असल्यास, त्यातून प्रवाह होण्याची शक्यता दाट असते. त्याचा धक्का आपल्याला बसू शकतो.

See also  Cricket Information in Marathi - About Cricket in Hindi

25) आकाशात विजा चमकत असताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागते तर ते आपण पाहूया.
शेतात काम करत असताना जर विजा चमकत असतील, तर लगेच शेतात बांधलेल्या झोपडीचा किंवा घराचा सहारा घेणे गरजेचे असते.

26) शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर, पायाखाली कोरडी लाकूड किंवा प्लास्टिक, गोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.

27) पाया व्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. वीजा चमकत असताना शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे असते.

28) पावसाळ्याच्या दिवसात पोहणारे, मच्छिमार या लोकांनी विजा चमकत असताना पाण्यातून तात्काळ बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जावे.

29) विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये. झाडापासून झाडाच्या उंची पेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.

30) शेतातील मोठे झाड किंवा बैठकीचे झाड असेल तर हे झाड विधान पासून सुरक्षित करण्यासाठी त्यावर त्याच्या एका फांदीला तांब्याची तार बांधून जमिनीत खोलवर गाढून ठेवावे.

31) एखाद्या उंच इमारती ला विजेपासून धोका असल्यास इमारतीवर किंवा घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.

32) आपले घर शेतांच्या जवळ असेल तर किंवा घरांपासून जमली जवळ असतील तर घराच्या आजूबाजूला कमी उंचीची झाडे लावावीत.

33) जर तुम्ही जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरुन विजेमुळे तुम्ही वाचाल.

34) शक्य नसल्यास जमिनीपासून खोलगट भागात गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वर येऊ नका आणि रस्त्याने चार चाकी गाडी जात असाल, तर गाडीच्या बाहेर येऊ नका.

या सर्व उपाययोजना केल्यामुळे तुम्ही विजेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

"तुम्हाला आमचा लेख आकाशातील वीजाविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा".

 

Leave a Comment