39 Facts About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

39 Facts About Garuda in Marathi पक्ष्यांचा राजा गरुडाला म्हटले जाते. गरुड हा पक्षी भारतासह इतर देशातही आढळून येतो. हिंदू धर्मात गरुड पक्षाला उच्च स्थान आहे. तसेच हिंदूंच्या अठरा पुराणांमध्ये गरुड पुराण देखील आहे. या पक्षाचा उडण्याचा वेग खूप जास्त असतो. डोळ्यांची नजर तीक्ष्ण असते. तसेच या पक्षांचे काही वैशिष्ट्ये देखील आहेत. तर चला आपण पाहुया आज गरुड पक्षा विषयी मनोरंजन तथ्य. तुम्ही गरुड पुराणा विषयी wikipedia वर माहिती अभ्यासू शकता.

39 Fact About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

1) गरुडाचा Garuda in Marathi आकार इतर पक्षापेक्षा मोठा, उडण्याचा प्रचंड वेग, तीक्ष्ण आणि मजबूत चोच, मोठ्या अणकुचीदार नख्या, सर्पभक्षण आणि मोठे प्राणीसुद्धा भक्ष्य म्हणून उचलून नेण्याची शक्ती यांच्यामध्ये असते.

2) बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येते की, गरूडाचे वर्णन बऱ्याच प्रमाणात ईगल पक्ष्यांच्या वर्णनाची जुळणारे असल्यामुळे पक्षी विज्ञानात त्याला इगल असे म्हटले जाते.

3) जगभरातील गरूडाच्या प्रजाती चार भागात विभागल्या जातात. सर्पगरूड, मत्स्य गरूड, हर्पी गरूड आणि बुटेड गरूड.

4) भारतीय उपखंडात गरूडाच्या 18 प्रजाती पहायला मिळतात. सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, पहाडी, कृपण, ठिपक्यांचा, शाहाबाज, सर्प, टकल्या, बादशाही असे गरूडांचे प्रकार आहेत.

5) शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो.

6) डोळे हे अतिशय मोठे मोठे असून पापण्याचा उपयोग डोळे ओलसर ठेवण्यासाठी तसेच डोळ्याच्या रक्षणासाठी होतो.

7) शिकारी पक्ष्यांची घरटे बनवण्याची पद्धत आणि घरट्याचे प्रकार वेगवेगळे असतात. या सर्व पक्षांत नर, मादी दिसायला सारखेच असतात.

8) काही प्रजातीत मादी आकाराने मोठी असते. यातील गिधाडे घर न बनवता इतरांचे घरटे, दगडाच्या कपारी, खळगे इत्यादींमध्ये अंडी घालतात.

See also  Top Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती

9) गरूडाचे Garuda in Marathi घरे उंच झाडाच्या वरच्या फांदीवर काड्या, पाने, पाचोळा, नारळा -च्या शेंड्या, कीटकांना पळवून लावणाऱ्या वनस्पती यांनी आच्छादलेली असतात. गरूड बरेचदा दरवेळी नवीन घरटे न बांधता जुनेच घर डागडुजी करून वापरतो.

10) नर, मादी दिसायला सारखेच असतात. काही प्रजातीत मादी आकाराने मोठी असते. या शिकारी पक्ष्यामध्ये मादी अंडी घालते, त्या दोन अंड्यामध्ये साधारण दोन ते तीन दिवसांचा गॅप असतो.

Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

11) सर्व अंडी घालून झाली की मादी अंडी उबवायला बसते. तर घुबडामध्ये पहिले अंडे घातले की लगेच मादी उबवायला बसते.

12) सर्व शिकारी पक्ष्यांत 20-25 दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर येतात. या काळात मादी आणि नर पिलांसाठी थोडे फार अन्न जमवून ठेवतात. शिकारी पक्ष्यांची पिले भराभर वाढतात. ते पिल्ले लहान असताना रंग बदलतात व गडद होतात. पंखातील शेपटीमुळे उड्डाण करताना तोल सावरता येतो व उडताना शेपटी दिशा बदलायला मदत करतात.

13) या पक्ष्यांच्या बोटाला बाकदार नखे असून ती फायब्रेस प्रोटीनने बनलेले असतात. त्यामुळे त्यात खूप शक्ती असते आणि हे गरुड हरणाचे छोटे पिल्लू सहज उचलून आकाशात घेऊन जाऊ शकते.

14) समुद्री गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी असून त्याचा रंग वरून करडा असतो. डोके, मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो.

15) उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराची यांनी या पक्ष्याची ओळख पटते. हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी अक्षर V सारखा दिसतो.

16) नर-मादी दिसायला सारखे असतात. हे समुद्रकिनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात.

गरुडाचे जीवन Garuda in Marathi

17) स्टेलरचे समुद्री गरुड हे दुर्मिळ पक्षी रशियाच्या सीमेबाहेर फारच क्वचित आढळतात. ते हिवाळ्यासाठी कधीकधी उडतात. स्टेलरचे समुद्री गरुड हे गरुडांच्या सर्वात वजनदार आणि सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक आहे. त्याचे वजन नऊ किलोग्रॅम आहे. आपल्या देशात तो ओखोटस्क समुद्राच्या किनाऱ्यावर तसेच कामचटका द्वीपकल्पात राहतो.

See also  Kabutar Information in Marathi कबुतर

18) मत्स्याहारी गरुड हा माशांवर उदरनिर्वाह करणारा एक गरुड भारतात आढळतो. तो उत्तर भारत, बंगाल व आसाम या प्रदेशांत राहतो. हा घारीपेक्षा मोठा असतो. गडद तपकिरी रंगाच्या या गरूडाचे डोके फिक्कट सोनेरी तपकिरी असते. शेपटीवर आडवा, रुंद पांढरा पट्टा असतो.

19) गरूड Garuda in Marathi एकेकटे किंवा जोडीने राहतात. मनुष्यवस्तीपासून दूर राहणे पसंत करतात.

20) आकाशात घिरट्या घालीत ते भक्ष्याची शोध घेतात व झाडाझुडपात डोकावतात. ते उडताना पंखांची टोके पसरलेल्या हाताच्या पंजांसारखी दिसतात. पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो.

21) आपल्याकडे सर्प गरूड तसा सहज दिसतो. काळसर तपकिरी अंगावर ठिपके, भेदक नजर आणि टोकदार पिवळी चोच पानगळीच्या, कोरड्या सर्व प्रकारच्या जंगलात दिसतो.

22) आफ्रिकन मत्स्य गरूड हा पांढरे पोट आणि ब्रॉंझ तपकिरी पंख असणारा आकाराने मोठा पक्षी आहे. याची मादी नरापेक्षा वजनाने मोठी असते. तिचा विंग्स स्पॅन हा अडीच मीटरचा असून नामिबिया बोत्सवाना येथे आढळते. प्रामुख्याने मासे हाच मुख्य आहार आहे.

23) स्वतःच्या वजनाएवढी शिकार उचलणारी ही प्रजाती असून याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नरमादी कायम एकत्र राहतात. जोडीदार बदलत नाहीत.

जगातील गरुडाचे महत्व Garuda in Marathi

24) अमेरिकेतील अलास्का येथे त्यांचे राष्ट्रीय चिन्ह असलेला बाल्ड टकला गरूड Garuda in Marathi पाहण्यात आला.

25) बाल्ड टकला हा अतिशय घनदाट झाडीत याचे वास्तव्य असून हा गरूड शंभर फूटवरून पाण्यातील मासा पाहू शकतो. इतकी तेज नजर असते. याच्या डोळ्यावर अर्धपारदर्शक पडदा असतो. त्यामुळे हा डोळ्याच्या वर पाहू शकतो.

26) मार्शल ईगल हा आफ्रिकेच्या गवताळ कुराणात आढळणारा गरूडपक्षी आहे. ही बुटेड गरूडाची प्रजाती आहे. काळा, करडा भेदक नजरेचा पक्षी पाहतच नजर खेळून ठेवतो. साप, सरडे, जंगली मांजरे हे त्यांचे खाणे.

27) बॅटेलीअर ईगल ही मध्यम आकाराची गरुडाची प्रजाती आहे. हा झिम्बावेच्या राष्ट्रीय चिन्हावर असून अतिशय लालजर्द चोच काळ शरीर आणि वर चमकदार पंख असून हा गवताळ कुरणात दिसतो. याची पिले मात्र पूर्ण वाढ होईपर्यत तपकिरी रंगाची असतात. हा शिकार करून खातो. पण कधी कधी मेलेल्या प्राण्याचे मांस खातो.

See also  Crow in Marathi कावळा

28) पांढऱ्या पोटाचा समुद्री मत्स्य गरूड ही भारताचे किनारे, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया येथे सापडणारी आकाराने मोठी अशी देखणी प्रजाती श्रीलंकेत सापडतात.

29) देशोदेशींच्या पुराणकथांमध्ये गरुडाला उच्च स्थान मिळाले आहे. भारतीय पुराणकथांच्या परंपरेनुसार हा पक्षिश्रेष्ठ कश्यप व विनता यांचा अंडज-पुत्रआहे.

30) सूर्य-सारथी अरुणाचा हा धाकटा भाऊ आहे. सर्पाची माता कद्रू आणि विनता या सवती होत्या. कद्रूचे पुत्र सर्प यांच्याशी गरुडाचे वैर होते.

31) गरुडाने Garuda in Marathi स्वर्गातून अमृतकलश आणला व तो मातेला दिला. त्याच्या मातृभक्तीने विष्णू प्रसन्न होऊन त्यास अमरत्वाचा व स्वत:हूनही उंच जागी विराजमान होण्याचा असे दोन वर दिले.

32) विष्णूची सेवा म्हणून विष्णुवाहन होण्याचे आणि त्याच्या ध्वजावर बसण्याचे गरुडाने मान्य केले. पुराणांत गरुडाविषयी अनेक कथा आहेत.

33) गरूडाच्या Garuda in Marathi पौराणिक प्रतिमेचे एक बॉंझ शिल्प, 17 व्या शतकात भारतात दोन, चार व आठ हात असलेल्या अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपातील गरुडमूर्ती अनेक ठिकाणी सापडल्या.

34) मानवी शरीर, पंख व चोच असलेल्या पक्ष्यांची अश्या नमस्कार मुद्रित गरुडमूर्ति अनेक मंदिरात आहेत.

35) वैष्णव पंथ गरूडाचे महत्त्व फार मोठे आहे. जसा महादेवापुढे नंदी असतो, तसाच विष्णू पुढे गरुड असतो. काही मंदिरात आपल्या गरुड खांब पाहायला मिळतो. चतुर्भुज गरुडाला वैनतेय असे म्हणतात.

36) चेन्नई पासून काही अंतरावर बॉर्डर आई नावाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थस्थान देवगिरी पर्वताच्या शिखरावर आहे कित्येक शतकापासून एक गरुडाची जोडी दुपारच्या वेळी आकाशातून खाली येते व पूजाऱ्याने दिलेला प्रसाद घेऊन आकाशात उडून जातात.

37) गरुड Garuda in Marathi व नाग यांच्यामध्ये खूप वैर असलेल्या पाताळातील दोन जमाती होत्या असा उल्लेख महाभारतात आहे.

39) 18 महापुरानापैकी गरुड पुराण हे एक विष्णूच्या आज्ञेवरून रचलेली कथा हे असे म्हटले जाते.

मित्रांनो आपल्या आजूबाजूस खूप साऱ्या गोष्टी गरुडाबाद्दल आढळतील, त्या आम्हास नक्की comment करून सांगा.

“तुम्हाला आमचा लेख गरुडा विषयी 39 Fact About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे आपण वाचले का?

या ठिकाणांविषयी तुम्हाला माहिती नाही? बघा ! काय आहे या ठिकाणी? Unseen, Unknown Places in India

 

 

 

Leave a Comment