अस्वल बद्दल रोचक माहिती 30 Amazing Fact about Bear Aswal in Marathi

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi हा एक हिंस्र प्राणी आहे. अस्वला मध खूप आवडते. तसेच त्याची वास घेण्याची क्षमता सर्वात जास्त असते. तर अशाच अस्वल विषयी काही मनोरंजन गोष्टी आपण पाहूया.

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi

सर्व जातीतील अस्वलांच्या तुलनेत पांढरे अस्वल हे आकाराने मोठे असून त्याचा रंग पांढराशुभ्र असतो. हे अस्वल बर्फ बर्फाळ प्रदेशात आढळतात तसेच त्यांच्या अंगावर दाट केस असतात व त्यांच्या पावलांच्या तळव्यांवर देखील दाट केस असतात.

दाट केस असल्यामुळे बर्फावर चालताना पांढऱ्या अस्वलांना फारसा त्रास होत नाही. त्यांना उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात वनस्पतिजन्य पदार्थ खायला मिळत नसल्यामुळे ते मांसाहारी आहेत.

सील आणि वॉलरस यांची पिल्ले त्याचे मुख्य भक्ष्य आहे. परंतु कॅरिबू, खेकडा, पक्षी आणि इतर प्राणीही ते खातात. तसेच ते समुद्रात किंवा पाण्यात पोहू शकतात. दक्षिण अमेरिकेत चष्मेवाली अस्वल आढळतात असे म्हटले जाते. कारण त्या अस्वलांच्या डोळ्याभोवती पांढरे वलय असते.

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi

अस्वलांची वैशिष्ट्ये (Amazing Fact about Bear Aswal in Marathi)

हिमालयातील काळे अस्वल अलास्कातील तपकिरी अस्वल उत्तर अमेरिकेतील काळे अस्वल उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल आणि मलेशियातील छोटी असल्यास मुलांच्या काही प्रसिद्ध प्रजाती आहेत.  इतिहासपूर्व काळापासून माणसाने असल्याचे मांस, हाडे, चामडी आणि चरबी मिळवण्यासाठी त्यांची हत्या केली आहे.

प्राचीन काळात अस्वलांची नखे आणि सुडे या पासून दागिने तयार केली जात होते. अस्वलांचे काही जाती नामशेष झाल्या आहेत. अस्वल हा प्राणी जागतिक वन्य जीव निधी या जगनमान्य संस्थेचे बोधचिन्ह आहे. अस्वले कळपाने न राहता एकटी राहतात. त्यांच्या समागमाचा काळ उन्हाळा असतो.

See also  माकडांविषयी 44 सत्य Monkey in Marathi

सात ते नऊ महिन्याच्या गर्भवधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. ती दोन- तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात.  अस्वलांची पिल्ल तीन वर्षापर्यंत तिच्या सोबत असतात व ती पिल्लांचे रक्षण करते. या जातीत नर व मादी सारखेच असतात.

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi

अस्वलांची वास  घेण्याची क्षमता

अस्वलांचे(Amazing Fact about Bear Aswal in Marathi) आयुष्य 25-40 वर्ष असते. सर्व अस्वले चटकन चिडतात आणि धोकादायक असतात. पंचाच्या एका फटक्यात ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकतात. अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात. ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात. मात्र इतर मांसाहारी प्राणी टाचावर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर बसू शकतात किंवा उभे राहू शकतात.

जेव्हा त्यांना धोका जाणवतो, तेव्हा हवेतील वास घेण्यासाठी ते मागच्या पायावर उभी राहतात. अस्वलांची दृष्टी कमकुवत असल्याने देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात.  अस्वलाचे नाक खूप तीक्ष्ण असते व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावर अवलंबून असतात.

भारतातील तपकिरी अस्वल जवळ जवळ एक ते दीड किलोमीटर वरून वास घेऊ शकतात. अस्वलाचा खेळ हा भारतातून दहा वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आला.  भारतात अस्वलाचा खेळ करणारी दरवेशी जमात आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. भारतातील अस्वलांचा ग्रुप खेळ डान्सिंग बियर म्हणून जगभरात कुख्यात होता. दहा वर्षापूर्वी रस्त्यावर अस्वलाचा खेळ करणाऱ्या दरवेश्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती.

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi

अस्वलांचा खेळाकरीता वापर

भारतात खेळाच्या नावाखाली अस्वलांचा (Amazing Fact about Bear Aswal in Marathi) प्रचंड छळ केला जात होता. आता मात्र त्यांवर गंभीर दखल घेऊन सरकारने या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय संवर्धन परिषदातही यासाठी आवाज उठवण्यात आला होता.  आंतरराष्ट्रीय पाणी बचाव संस्थेच्या मुख्य कार्याधिकारी अ‍ॅलन नाईट यांनी यासाठी पुढाकार घेतला.

See also  मनोविज्ञानाचे मनोरंजक तथ्य Fact about our Psychodram, Morology

भारतात 2009 साली अस्वलांचा शेवटचा खेळ झाला. राजू नावाच्या अस्वलाला त्याच्या कलंदर जमातीच्या दरवेशी मालकाने बंगलोरच्या बाणेरघट्टा अस्वल बचाव केंद्राच्या हवाली केले. त्यानंतर अस्वलांचे रस्त्यावरील खेळ संपूर्णपणे बंद झाल्याचे जाहीर करण्यात आले.

देशातील 26 राज्यांमध्ये अस्वलांचे अस्तित्व आहे. भारतात 2002 साली पहिले अस्वल बचाव केंद्र आग्रा येथे सुरू करण्यात आले. या केंद्रात 270 अस्वले असून जगात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते.

अस्वलने बर्फ आणि मोकळ्या पाण्यावर चालण्यासाठी आणि शील मासे, शिकार पकडण्यासाठी अनेक शारीरिक वैशिष्ट्य प्राप्त केले आहे. जे त्याच्या आहाराचा मुख्य स्रोत आहे. ध्रुवीय अस्वल जमिनीवर जन्माला आले असले, तरी ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ समुद्रावर घालवतात. म्हणून त्यांना समुद्री अस्वल असे सुद्धा म्हटले जाते.

समुद्री अस्वल समुद्री बर्फापासून सतत शिकार करू शकतात आणि त्यासाठी ते वर्ष सुद्धा वाया घालवू शकतात. त्यांचा जास्त वेळ गोठलेल्या समुद्रावर घालवितात.  अस्वलला मराठीत भालू, रिस, भिल्ल, तीसळ अशा विविध नावांनी ओळखले जाते. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल.

अस्वल बद्दल रोचक माहिती Amazing Fact about Bear Aswal in Marathi

अस्वलाचे केस

अस्वल (Amazing Fact about Bear Aswal in Marathi) चालताना मागे वळून पाहते म्हणून पृष्ठदृष्टीक चिडली कि भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष, अस्वलचे केस लांब व दाट असतात म्हणून त्याला दीर्घकेस अशा विविध नावांनी ओळखले जाते.  अस्वल हा गलिच्छ ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. अस्वल सस्थन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागात आढळतो.

अस्वल लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दांमध्ये फरक आढळतो. याचा अर्थ उत्तरेकडील असा आहे.अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरम प्राणी असून तो नंतर दक्षिणेच्या उष्णकटिबंधात पर्यंत पोहोचला.

शरीरावरील दाट केसांमुळे तो थंड प्रदेशात रहाण्याची सवय असल्यामुळे तरीही त्याने उष्णकटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले.आपल्याकडे आढळणारे अस्वल काळ्या लांब केसाचे छातीवर घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा पांढरा पट्टा असणारी असते. त्याला इंग्रजीत स्लोथ बिअर किंवा आळशी अस्वल असे म्हणतात.

See also  Cat Meaning Information in Marathi मांजर

अस्वलच्या केसांमुळे लहान मुलाचे आजार बरे होतात. त्यांना बाहेरची बाधा होत नाही. असा ही समज प्रचलित आहे.
त्यामुळे खेड्या गावातील बाया अस्वलचा केस ताईतमध्ये ठेवून ताईत पोरांच्या गळ्यात बांधतात.

पांडा सोडून सर्व असलेली तपकिरी किंवा काळे रंगाचे असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखील काळे रंगाचे असते फक्त त्यांच्या केसांचा रंग पांढरा असतो.  पांडाचे गुणधर्म अस्वले व रकुन या दोघांशी मिळते-जुळते असल्यामुळे त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट करण्यामध्ये
वादविवाद होते परंतु दशकभराच्या मिळाल्यानंतर व जनुकांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट करून घेतले. त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण आठ प्रजाती आहेत.

अस्वलांची खाद्य वैविध्यपूर्ण असली तरी ते फळे, मुळे, किडे व मास खातात.  उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील प्राणी खातो. तर चीनमधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो.

भारतातील अस्वल हे प्रामुख्याने वाळवे मुंग्या व इतर किडे खातात. अस्वल एका भोजनाच्या वेळी 10 ते 15 हजार वाळव्या खाऊ शकते.

अस्वल गुदगुल्या

अस्वल(Amazing Fact about Bear Aswal in Marathi) आपल्या हाताच्या वेढ्यात प्राण्याला घट्ट पकडून गुदगुल्या करून ठार मारते अशी समजूत आहे. पण ती समजूत खरी नाही. अस्वले आपल्या पंजांनी आणि लांब मजबूत नखांनी भक्ष फाडून मारतात.

अस्वलला त्याचे मोठे पोट भरण्यासाठी कधीकधी फार पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात त्यांची आपल्या इतक्या जंगलातून चंगळ असते.उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वड, पिंपळ, उंबर, आंबा, जांभूळ, बेल इत्यादींच्या फळावर ताव मनसोक्त मारता येतो.

उन्हाळ्यात कित्येक झाडांवरची मधमाशांची पोळी देखील मधाने भरलेले असतात. अस्वल झाडावर फळे खाण्यास चढले असतात. तिच्या दृष्टीस एखादे मधमाशांचे पोळे पडले की, त्यावर आपला पंजा मारून ते पोळे खाली पाडते. व पटकन झाडावरून खाली उतरते.
पोळ्यातून निघणारा रस पिऊन घेते. अस्वलच्या अंगावर असलेल्या दाट केसांमुळे मधमाशी त्यांच्या शरीरा पर्यंत पोहोचू शकत नाही.

अस्वलच्या अंगावर दाट केस असल्यामुळे त्यांचे ज्ञान स्पर्शही कमी असते. त्यामुळे अस्वल यांची गणना हुशार, चपळ प्राण्यांमध्ये केली जाऊ शकत नाही.

“तुम्हाला आमचा लेख अस्वल विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment