जलचर प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे डॉल्फिन. डॉल्फिनला मासे या वर्गात विभाजित न करता तो एक संस्थन प्राणी आहे. तर चला मग आपण डॉल्फिन बद्दल काही मनोरंजक तथ्य पाहूया. त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असेल.
1) आकाराने सर्वात लहान डॉल्फिन हे चार फूट तर सर्वात मोठी लांबीला असलेले डॉल्फिन हे 32 फूट असते.
2) डॉल्फिन मानवा पेक्षा 10 पटीने जास्त ऐकू शकते परंतु त्यांना सुगंध आणि दुर्गंध येत नाही.
3) डॉल्फिनचे वय जास्तीत जास्त पंधरा वर्ष असते परंतु डॉल्फिनच्या काही प्रजाती 50 वर्षापर्यंत जिवंत राहतात.
4) डॉल्फिनला दात असतात परंतु अन्न चावून न खाता गिळून घेतात. डॉल्फिन स्वतःला आरशामध्ये ओळखू शकते.
5) डॉल्फिन एक डोळा बंद करून झोपते. अमेरिकी सेना च्या जवळ 75 प्रशिक्षित डॉल्फिन आहेत. ती पाण्याच्या आत दुश्मनांना शोधण्यास मदत करतात. तसंच सेनेतील हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी डॉल्फिन मदत करत असतात.
6) डॉल्फिनचा वेग प्रतितास 36 किलोमीटर या स्पीडने धावू शकतात. त्यांच्या तुलनेत माणूस 8.6 किलोमीटर प्रति तास धावू शकतो.
7) डॉल्फिन आणि व्हेल मासा जेव्हा जास्त आनंदी असतो, तेव्हा ते जोराने ओरडू लागतात आणि आपला आनंद व्यक्त करतात.
8) ब्रिटिश च्या समुद्रात डॉल्फिन आढळतात. त्या सर्व डॉल्फिन वर इंग्लंडच्या महाराणीचा हक्क आहे.
9) डॉल्फिन समुद्राचे पाणी पीत नाही. कारण समुद्राचे पाणी त्यांना आजारी करू शकते आणि मारू सुद्धा शकते. डॉल्फिन जे अन्न खाते, त्यातूनच तिला पाण्याची पूर्तता होत असते.
10) डॉल्फिन समुद्रामध्ये 990 फूट खोलीमध्ये जाऊ शकतो आणि पाण्यात वीस फुटापर्यंत वर उंच उडी मारू शकतो.
11) जर तुम्हाला एखादी डॉल्फिन समुद्राच्या बाहेर किनाऱ्यावर पडलेली दिसली तर तिला पाण्यात ढकलू नका. कारण असे ती तेव्हाच करते जेव्हा ती बिमार असते. आणि बिमारीच्या स्थितित पाण्यात बुडून मरू शकते म्हणून ती समुद्र किनार्यावर येऊन आराम करते.
12) पृथ्वीवर डॉल्फिनच्या 41 जीवित प्रजाती आहेत. त्यापैकी 37 समुद्रामध्ये आणि चार नद्यांमध्ये आढळतात.
13) डॉल्फिन टेलिफोन वर एक दुसऱ्या सोबत गप्पा करू शकतात आणि त्यांना माहिती पडू शकते, की समोरचा फोन वर कोण बोलत आहे.
14) डॉल्फिनाचे शरीर पाण्यात वेगाने पोहण्यासाठी अनुकूलित झालेले असून दोन्ही टोके निमुळती असतात. पुढे सरकण्यासाठी शेपटी पराचा उपयोग होतो.
15) डॉल्फिनचे वक्षीय पर होडीच्या वल्ह्यांसारखे काम करतात. त्यांचा दिशा बदलण्यासाठी वापर होतो. पोहताना पृष्ठ परामुळे शरीर स्थिर राहते. जातींनुसार त्यांच्या रंगामध्ये विविधता आढळते. बहुतेक डॉल्फिन राखाडी रंगाच्या छटा असते.
16) डॉल्फिनच्या पोटाकडची बाजू अधिक फिकट असते. डोक्यावर एक गोलाकार ध्वनिग्राहक इंद्रिय असते. जबडा लांब असून तो चोचीसारखा वाटतो. तोंड बाटलीसारखे असून त्याची जिवणी वाकडी असल्याने त्याचा हसल्यासारखा भास होतो.
17) डॉल्फिन डोक्यावर असलेल्या वायुछिद्रातून तो श्वसन क्रीया करतो. श्वासनलिका मेंदूच्या पुढच्या भागात असते. डॉल्फिनाचा मेंदू आकाराने मोठा असून त्याची संरचना गुंतागुंतीची असते. व्हेलप्रमाणेच डॉल्फिनच्या त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो.
18) डॉल्फिन मध्ये स्पर्शशक्ती आणि स्वादक्षमता प्रगत असते. मासे आणि म्हाकूळ हे डॉल्फिनाचे मुख्य भक्ष्य आहे. भक्ष्य पकडण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लहान माशांचा कळप हेरून ते सर्व बाजूंनी त्यांना घेरतात. एकदा घेरले गेले म्हणजे मासे गोल आकारात गोळा होतात. एकत्र आलेल्या माशांच्या समूहावर एकेक करीत डॉल्फिन हवे तेवढे भक्ष्य गिळतात. डॉल्फिन एकटे किंवा जोडीने असतात. ते उथळ पाण्यात माशांचा पाठलाग करून मासे पकडतात.
19) गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, बियास व सतलज या नद्यांमध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिन सापडतात. प्लॅटिनिस्टा गँजेटिका आणि प्लॅटिनिस्टा गँजेटिका मायनर या त्यांच्या गोड्या पाण्यातील जाती आहेत.
20) गंगा नदीपात्रातील डॉल्फिन बंद आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे त्यांच्या डोळ्यात नेत्रभिंग नाही. त्यांना प्रकाशाची दिशा व तीव्रतेचे ज्ञान होते. हालचाल व शिकारीसाठी ते फक्त प्रतिध्वनी स्थान निर्धारण तंत्राचा वापर करतात.
21) डॉल्फिन कुत्रा पेक्षा जास्त बुद्धिमान सत्याला शिकविले तर तो बरेच गोष्टी शिकतो. म्हणून सागरी जल जीवन मध्ये डॉल्फिन हा सर्कस मध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.
22) डॉल्फिन हे समुद्रात किंवा नदीत तलावात अधून मधून उसळी मारून पाण्याबाहेर येतात कसरती करतात आणि पुन्हा पाण्यात शिरतात. डॉल्फिन ची चरबी औषधी असल्याच्या समजुतीमुळे डॉल्फिनची शिकार केल्या जाते. ह्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण की त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते.
23) गंगा नदीतील डॉल्फिन राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केलेला आहे. डॉल्फिनाच्या संरक्षणासाठी भारत सरकारने चंबळ जल अभयारण्य स्थापन केले आहे.
24) डॉल्फिन जगातील फायमल कॉडेर्टा क्लास मांमलिया या वर्गात मोडतो. हा समुद्रातील संस्थन प्राणी आहे. डॉल्फिनचे वजन 50 किलो ग्रॅम पासून ते दहा टनांपर्यंत होते. डॉल्फिन 49 मिलीयन वर्षापासून अस्तित्वात आहे आणि ते नदी तलाव समुद्रामध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाने राहतात.
25) डॉल्फिन ऑक्सिजन शरीराच्या पेशी मध्ये साठवून ठेवतात. जेव्हा समुद्रातील खोल पाण्यात उडी मारतात, त्यावेळेस हृदयाचे ठोके थांबून ऑक्सिजन परत पाठवू शकतात.
26) डॉल्फिनच्या काही प्रजाती आहेत. किलर व्हेल, मेलंन हेडड व्हेल, पिग्मी किलर व्हेल, पायलट व्हेल, हायब्रीड डॉल्फिन
डॉल्फिनच्या नराला बुल असे म्हणतात तर डॉल्फिन मादाला काऊ असे म्हणतात आणि डॉल्फिनच्या पिल्लाला काफ असे म्हणतात.
27) किलर व्हेल या डॉल्फिन चा मेंदू सर्व प्राण्यात सर्वात मोठा आहे. डॉल्फिन सस्तन प्राणी असल्यामुळे नर आणि मादी यांच्यातील एकाच पिल्लाला जन्म देतो आणि डॉल्फिन मादा त्या पिल्लाचा सहा वर्ष सांभाळ करते.
28) डॉल्फिन हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याचे मानवासारखे मादा आपल्या पिल्लांना दहा महिने पोटात ठेवते म्हणजे डॉल्फिनचा गर्भधारणेचा कालावधी दहा महिन्यांचा आहे. आणि गर्भवती डॉल्फिन च्या भोवती पाच-सहा डॉल्फिन तिचे संरक्षण करत असतात.
29) दोन हजारांच्या झुंडी मध्ये एक असतो त्याला पॉट असे म्हणतात. त्याला माणसासारखे इतरांचे मदत करण्याची भावना आहे. झुंडीतील कमकुवत व दुबळ्या पिल्लाचा सांभाळ करून त्याच्या भोवती गोल गोल फिरून किंवा त्यांच्या पिल्लांचे शारक माशापासून संरक्षण करतात असे सुद्धा आढळून आले आहे की शहर डॉल्फिन हे इतर प्राण्यांना समुद्रात मार्गदर्शनाचे काम करतात कोड्यांना मासेमारीसाठी मदत करतात आणि बऱ्याच कथांमध्ये असे आहे की, डॉल्फिन समुद्रामधून नायाला आपल्या पाठीवर बसून समुद्रातून बाहेर आणून दिलेला आहे.
30) डॉल्फिन वेगळे आवाज काढू शकते किंवा शीळ सुद्धा मारू शकते. त्यामुळे प्राणिसंग्रहालय जिथे डॉल्फिन ठेवले जातात, तिथे मुलांचे मनोरंजन देखील होत असते. वेगवेगळे खेळ करून दाखवतात किंवा उड्या मारून दाखवतात त्यामुळे मुलांचे मनोरंजन होते आणि त्यांचं सुद्धा त्रास कमी होतो. ह्या गोष्टी मादा डॉल्फिन किंवा नर डॉल्फिन सुद्धा त्यांच्या पिल्लाला शिकवितो. डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे.
31) लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत डॉल्फिन हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलेला आहे. या उत्सुकतेची एक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचे उत्तर समुद्रकिनाऱ्या -जवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसला होता. परंतु ती डॉल्फिन आहे किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही.
32) डॉल्फिनने तिच्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर डॉल्फिनचा झुंड मानवाप्रमाणे आनंदाने भारावून उठतो.
33) डॉल्फिनचं पिल्लू मोठ झाल्यानंतर त्यांच्या झुंडी मध्ये इकडून तिकडून फिरुन त्याच्या आईच्या सिटीचा आवाजाने तिच्याजवळ परत येते.
34) पावसाळ्याच्या दिवसात डॉल्फिन खुशीत असते. वीजा चमकल्यानंतर किंवा आभाळाचा गडगडाट झाल्यानंतर ती समुद्रात उंच उंच उड्या मारून आपला आनंद व्यक्त करत असते.
“तुम्हाला आमचा लेख डॉल्फिन विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.
आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका.
हे आपल्याला माहिती आहे का?