Best Elephant Information in Marathi 2021 हत्तीविषयी माहिती

हत्ती Elephant Information in Marathi हा सर्वांच्या परीचयाचा प्राणीआहे. हत्तीची गणना बुद्धिमान पाण्यात केली जाते. हत्तीच्या शरीराच्या मानाने त्याची शेपटी अतिशय लहान आहे. हत्तीला जेव्हा राग येतो, तेव्हा जंगलातील झाडे पाडणे किंवा वृक्ष उपटून फेकणे, अशा अशाप्रकारे जंगलांची नासधूस करतो. तर हत्ती विषयी मनोरंजक तथ्य आपण पाहूया. दिलेल्या wikipedia link वर click करून सुद्धा माहिती वाचू शकता.

Elephant Information in Marathi हत्तीविषयी माहिती

हत्तीच्या आवाजाने जंगलातील प्राणी दूर पडतात. हत्तीचा सर्वात जास्त वेळ खाण्यामध्ये जातो. त्यांना दीडशे किलो हून अधिक खाद्य दररोज लागते. हत्तींची गर्भवस्था 18 ते 22 महिन्यांचे असते.

हत्ती Elephant Information in Marathi हा जगातील असा एकमेव प्राणी आहे, तो उड्या मारू शकत नाही. हत्तीच्या सोंडीत मुंगी घुसले तर त्याचा जीव तळमळतो त्यामुळे हत्ती चालताना, फुंकर मारत असतो असे म्हटले जाते.

प्राण्यांमध्ये हत्ती सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. तसेच हस्तिदंताची सर्वात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.नवजात हत्तीच्या अंगावर विरळ, तपकिरी, काळे किंवा तांबूस तपकिरी केस असतात. वाढत्या वयाबरोबर केस हळूहळू कमी होतात.

खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे दात वेगळे Elephant Information in Marathi

हत्तींचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्याचा एक दात एका विटेएवढा मोठा असतो.हत्तीला अंतर्गत भागात चार दाढा आणि बाहेरून दोन सुळे असतात. माणसांप्रमाणेच हत्तींच्याही भावभावना असतात.

नक्की वाचा – माझी बहिण मराठी निबंध

माणसांचे अनेक गुण हत्तींमध्ये आढळून येतात. हत्तींची Elephant Information in Marathi स्मरणशक्ती तीक्ष्ण असून त्यांच्या मागील पिढ्यांमधील आठवणी अनुवांशिकतेने पुढील पिढीत परावर्तित होतात.

गेल्या हजारो वर्षांपासून राजे-महाराजे हत्तींना आपल्या सैन्यात एक उच्च स्थान देत आलेले आहेत. त्याकाळात किल्ल्याचा अभेद्य दरवाजा उघडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी हत्तीचा उपयोग केला जात होता.

See also  Dog Information in Marathi कुत्रा

हत्ती वय?

हत्ती Elephant Information in Marathi हे शंभर वर्षाहून अधिक जगू शकतात एका मिनिटात दोन ते तीन वेळा श्वास घेतात पाण्याचा वासही हत्ती बर्‍याच दूर आवरून घेऊ शकतो तसेच त्यांची स्मरणशक्ती सुद्धा जास्त असते. एकांतात डुलणारा तसेच झुलणारा हत्ती हा आनंदी नसून तो हत्तींचा मानसिक आजार असतो.

केरळमधील एलिफंट सेंटरमध्ये आनंद यांच्या मराठमोळ्या कमांड घेणारा हत्तीही असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये आनंद उठला.दहा हजार वर्षांपूर्वी हत्तींच्या 11 जाती जगभरात होत्या. आजमितीस केवळ तीन जाती शिल्लक आहेत. हत्ती 24 तासांत केवळ चार तास झोपतो.

जगात हत्तींची संख्या झपाट्याने कमी होत असून सध्याच्या गतीने त्यांची शिकार होत राहिल्यास 2025 नंतर भूतलावर हत्ती शिल्लक राहणार नाहीत.

हत्तीचे पाय Elephant Information in Marathi

हत्ती हा जैविक साखळीतील अविभाज्य घटक आहे. हत्तींच्या कळपाच्या चालण्याने जमिनीवरील गवतातील बहुतांश किडे वर येतात. पक्षी हत्तींच्या कळपाचा पाठलाग करत गवतातून बाहेर आलेल्या किड्यांवर त्यांची उपजीविका करतात.

हत्तींचा Elephant Information in Marathi कळप नदीवरून अंघोळ करून येताना त्यांच्या ओल्या पायांचे वजनदार ठसे मातीत उमटतात. ठशांमुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचून त्याठिकाणी कीटक, फुलपाखरे जमा होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक आणि त्यांच्या मागावर साप तेथे येतात. सापांना फस्त करण्यासाठी गरुड, घार आदी पक्षी घिरट्या घालतात.

चंदन तस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या वीरप्पनने दक्षिणेतील तब्बल 900 हत्ती मारून अपरिमित नुकसान केले होते. हत्तींच्या दोन पिल्लांमधील जन्माचे अंतर सहा वर्षे असून त्यांच्या मृत्यूने जैवसाखळीचे नुकसान होते. हत्तींना मारणाऱ्या आरोपींना देहदंडाची शिक्षा देणे, तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर हत्तींसाठी स्वतंत्र अधिवास निर्माण करण्याबाबत सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत.

आफ्रिकी व आशियायी हत्ती

आफ्रिकी हत्तींचा रंग गडद करडा व कपाळ बाकदारअसते. त्यांचे कान 1.2 मी. रुंद असून ते खांदे झाकण्याइतपत मोठे असतात. नर आणि मादी दोघांनाही सुळे असतात. नराचे सुळे 1.8-4.2 मीटर. लांब असून त्यांचे वजन प्रत्येकी 23-45 किलो असते. बहुतेक माद्यांच्या सुळ्यांचे वजन प्रत्येकी 7-9 किलो असते. सर्वांत लांब सुळा 3.5 मी आणि सर्वांत वजनदार सुळा 33 किलो वजनाचा होता.

See also  अस्वल बद्दल रोचक माहिती 30 Amazing Fact about Bear Aswal in Marathi

आफ्रिकी हत्ती Elephant Information in Marathi मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, झाडाची पाने व मुळ्या खातात ते क्वचितच गवत खातात. ते मुकेन झाडाची फळे खातात. त्यांतून त्यांना आवश्यक औषधी द्रव्ये मिळतात. बहुतेक वेळा ते उभ्याने झोप घेतात.

आशियाई हत्तींची सोंड आफ्रिकी हत्तींपेक्षा अधिक मऊ त्वचेची असून तिच्या टोकावर बोटासारखी एकच संरचना असते. बहुतेक हत्तीच्या पुढील पायांना प्रत्येकी पाच, तर मागील पायांना चार बोटे असतात.

हत्तीचे तळवे स्पंजसारखे मऊ असतात. त्यामुळे हत्ती चालताना त्याचा आवाज होत नाही. हत्ती दिवसाला साधारणता 20 किलोमीटर चालतो. तर 50-100 लीटर पाणी हत्तीला दिवसाला प्यायला लागते.

हत्तीला रोग होत नाही?

हत्तीला सहसा कुठला रोग होत नाही. परंतु संपर्कातून त्याला इतर पाळीव प्राण्यांचे किंवा मनुष्यांचे रोग होऊ शकतात. वन्य हत्तीची जखम व आजार लवकर बरे होतात. त्याच्या त्वचेत सोंड खुपसून रक्त शोषणाऱ्या जंगलातील हॉर्स फ्लाय माश्या, बारीक पिसवा व अन्य कीटक यांचा हत्तीला फार त्रास होतो. हा त्रास चुकविण्यासाठी तो सोंडेने माती अंगावर वरचेवर फवारतो.

बगळ्यासारखे पक्षी हे कीटक खाऊन त्याचा हा त्रास पुष्कळ कमी करतात. हत्ती पोटातील पाणी सोंडेनेकाढून ते अंगावर फवारूनही आपला त्रास कमी करतो, अशी योजना इतर कोणत्याही प्राण्यांत नाही. हत्तीचे अवयव इतर सस्तन प्राण्यांच्या अवयवांसारखे असले, तरी अधिक मोठे असतात.

हत्तीचे Elephant Information in Marathi हृदय माणसाच्या हृदयाच्या पाचपट मोठे आणि पन्नासपटींहून अधिक जड असते. हत्ती सोंडेचा वापर हाताप्रमाणे करतो. वस्तू धरणे व पकडणे, सोंडेच्या टोकावरील झडपेसारख्या संरचनेमार्फत नाण्याएवढी लहान वस्तू उचलणे, 275 किलोपर्यंत वजनाचे ओंडके उचलून वाहून नेणे, तसेच इतर हत्तींशी संपर्क साधणे, पिलांना थोपटणे या कामांतही त्याला सोंडेची मदत होते.

दोन हत्ती परस्परांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना प्रत्येक हत्ती आपल्या सोंडेचे टोक दुसऱ्या हत्तीच्या मुखात ठेवतो. तरुणनर सोंडेद्वारे कुस्ती खेळून लुटुपुटूची लढाई करतात.

See also  कासव Kasav Tortoise 39 Information in Marathi

हत्तीची दृष्टीही अंधू असते. त्याच्या मोठ्या डोक्याच्या तुले त्याचे डोळे बारीक असतात. त्यामुळे तो आपले डोके पूर्णपणे वळवू शकत नाही. त्याला समोरचे व आजूबाजूचे दृश्य तेवढे दिसू शकते. मागील बाजूची कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी त्याला मागे वळावे लागते. थोड्याशा आवाजाने किंवा गडद रंगाने तो बुचकतो.

हत्ती आणि हत्तींनी Elephant Information in Marathi

प्रौढ नर व माद्या बहुतेक काळ वेगळ्या राहतात. कुटुंबात माद्या व पिले असून कुटुंब सरासरी दहा हत्तींचे असते. यात तीन-चार प्रकारचे नातेसंबंध असणाऱ्या माद्या व त्यांची संतती असते. यांमध्ये नवजात ते 12 वर्षां पर्यंतची पिले असतात.

प्रत्येक कुटुंबाचे नेतृत्व सत्ताधारी मादी करते. नर प्रौढ झाल्यावर कुटुंबातूनबाहेर पडतात. प्रौढ नरांचे इतर नरांशी घट्ट बंध नसतात. प्रौढ नर फक्त विशिष्ट प्रसंगी कुटुंबाला भेट देतात.

दुष्काळात हत्तींना नाले, ओढे, नदी यांच्या पात्रांतील पाण्याच्या जागा कळतात. तेथे ते पायाने किंवा सोंडेने 1 मीटर पर्यंत जमीन उकरून पाणी मिळवितात. हे पाणी इतर प्राण्यांनाही उपलब्ध होते.

वयस्कर हत्ती मरण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जातात ते ठिकाण म्हणजे एक हत्तीची स्मशानभूमी आहे असे म्हटले जाते. परंतु या घटनेला कोणताही पुरावा किंवा आधार नाही. श्रीलंकेतील हत्ती 170 वर्ष जगले याची नोंद आहे तसेच प्रिन्सेस ॲलिस या हत्तीणीचा मेलबर्न येथे एकशे बावनव्या वर्षी मृत्यू झाल्याचा उल्लेख आढळतो.

दुष्काळात किंवा रोग होऊनही हत्तीचा मृत्यू होत नाही किंवा मनुष्याने जर त्याची शिकार केली नाही, तर त्याचे मृत्यूचे कारण त्याच्या दातांचा शेवटचा म्हणजेच सहावा संच नष्ट झाल्यामुळे त्याची उपासमार होते व त्यामुळे कुपोषण होऊन तो मृत्यू मार्गाला लागतो.

मित्रांनो आपणास आणखी काही प्राण्यांबद्दल माहिती हवी असल्यास आपण आम्हाला comment करून आपण मत सांगू शकता, आपले अमुल्य विचार आमच्याकरिता नेहमी मार्ग दाखवणारे असतील यात कुठलीही शंका नाही.

“तुम्हाला आमचा लेख हत्ती विषयी Elephant Information in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

आपण हे वाचले का?

इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य, Facts of Rainbow

 

 

Leave a Comment