न्यायमूर्ती रानडे Nyaymurti Ranade हे एक असं व्यक्तिमत्व आहे की, त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हायला सुरूवात झाली. यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. आपण न्यायमूर्ती रानडे विषयी माहिती अभ्यासुया तुम्ही wikipedia वर सुद्धा माहिती घेऊ शकता
Table of Contents
Nyaymurti Ranade न्यायमूर्ती रानडे
स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा व स्त्रियांनी शिक्षण घ्यावे. यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केले आहेत. त्यांनी शिक्षण समाजसेवा राजकारण तसेच आर्थिक बाबतीत मूल्य कार्य केलेले आहे. रानडे Nyaymurti Ranade यांचे पूर्ण नाव महादेव गोविंद रानडे असून त्यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी 18 जानेवारी 1842 साली झाला.
रानडे यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. ते प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना जनार्धन कीर्तने हा मित्र भेटला आणि त्यांची मैत्री पुढे वाढत गेली. रानडे हे त्यांच्या लहानपणी अबोल आणि संथ वृत्तीचे होते. परंतु त्यांची स्मरणशक्ती खूपच तीव्र होती त्यामुळे इतरांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.
1856 रानडे आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, आणि दोघेही एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. रानडे Nyaymurti Ranade यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला होता.
मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी ‘मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला. त्यानंतरच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले.
त्यांनी खूप वाचन केले त्यामुळे त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली आणि त्यांना विविध विषयात शिष्यवृत्ती आणि बक्षिसे सुद्धा मिळत गेले. 1862 समिती मॅट्रिक तर 1864 साली ते एम. ए. झाले त्यावेळी अलेक्झांडर ग्रॅण्ड यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले.
शिक्षण Nyaymurti Ranade
रानडे यांचे इतिहास आणि अर्थशास्त्र हे आवडीचे विषय होते त्या विषयात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली होती.
त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. 1866 साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. रानडे यांचा पहिला विवाह 1851 साली वयाच्या 11-12 व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे 1873 साली निधन झाले.
रानडे Nyaymurti Ranade यांचा विधवांच्या पुनर्विवाह संबंधी विचार आणि त्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या वडिलांना वाटले रानडे एखाद्या विधवेशी लग्न करतील त्यामुळे, त्यांच्या वडिलांनी यांना विरोध केला होता. आणि त्याच वर्षी नोव्हेंबरच्या तीस तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या 11 वर्षाच्या कन्येशी त्यांचा विवाह करून दिला.
त्यांच्या बालविवाह नंतर त्यांनी त्यांच्या पत्नीचे नाव सुद्धा रमा असेच ठेवले. विधवेशी विवाह न केल्यामुळे न्यायमूर्तीना ‘बोलके सुधारक’ म्हणून सनातन्यांकडून बोलले गेले.
बालविवाहा मुळे दुखी तर होतेच. परंतु त्यांनी रमाबाईंना शिकविण्याचा निर्णय घेतला आणि त्या सुद्धा शिकल्या. पुढे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी मदत केली. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून स्त्रियांना प्रोत्साहित केले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाणीव करून दिली.
कार्य Nyaymurti Ranade
रानडे Nyaymurti Ranade यांनी काही काळ शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.
रानडे जरी न्यायाधीश असले तरी त्यांनी समाजकार्य केल्याचे दिसून येते. त्यांनी ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्थांची स्थापना आणि विस्तार करण्यात त्यांचा सहभाग होता.
न्यायमूर्ती रानडे हे स्वातंत्र्यपूर्व काळात मवाळ प्रवर्गाचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणां -साठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. त्यांनी अनेक संस्था स्थापन करून संस्थात्मक जीवनाचा पाया रचला.
ते अर्थशास्त्र मध्ये प्रावीण्य असल्यामुळे त्यांनी लोकसंख्यावाढ ही दारिद्र्याची कारणे आहे. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे त्यांनी भारतात स्वदेशी कल्पनेला शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. तसेच दारिद्र्य दूर करण्याचे उपाय सुद्धा त्यांनी शोधले.
रानडे हे गावोगावी फिरून लोकांच्या समस्या जाणून घेत होते व त्यावर रात्री विचार विमर्श करत होते. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत होते.
त्यांना समजले भारतीय समाजात संकुचित वृत्ती जातीभेदाचे पालन भौतिक सुखे व्यावसायिकता व व्यावहारिकता या विषयाचे गैरसमज असल्यामुळे येथे दोष निर्माण झालेले आहे. या दोषामुळे समाजाची मोठी हानी होत आहे. हे दोष दूर केल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही हे त्यांना माहिती होते आणि समाजातील हे दोष दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना भारतीय उदारमतवादाचे उद्गाते असे म्हटले जाते.
समाज जागृती
ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही, असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी मांडले. 1870 ते 1887 ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे. यासाठी रानडे यांनी खूप प्रयत्न केले.
त्यांनी विद्यापीठ आणि देशी भाषा आणि या विषयावर श्री गो. त्र. जोशी यांना निबंध लिहिण्यास प्रवृत्त करून त्या निबंधाचे सार्वजनिक सभेत वाचन करणे व चर्चा करणे तसेच चंद्रलोप रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेच्या नियतकालिकातून या विषयावर लेखन करणे. मुंबईच्या टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून या विषयांवर लेखन करणे
हे कार्य सुरू केले.
देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या शासनाने नेमलेल्या रजिस्टर ऑफ पब्लिकेशन हे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या वर्षीच्या अहवालात देशीभाषा पुस्तके प्रकाशित करण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या विद्यापीठात या भाषांना स्थान नाही असे रानडेंनी नोंदवून घेतले.
ह्यावर तत्कालीन भारतमंत्र्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांना ह्या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केल्याने विद्यापीठाच्या कार्यकारी सभेत सिंडिकेट ह्या विषयावर चर्चा झाली. रानडे ह्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
1897 ह्या वर्षी रानडे यांनी मराठी आणि देशी भाषा यांच्या पुरस्कर्त्यांच्या सह्यांसह पुन्हा एक अर्ज कार्यकारी सभेपुढे मांडला. पण त्यावर चर्चा होऊन ती अनिर्णित राहिली. रानडे Nyaymurti Ranade ह्यांनी विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ आर्ट ह्या मंडळापुढे तो ठराव मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही पाठिंबा मिळाला नाही.
1900 ह्या वर्षी मुंबई प्रांताच्या शिक्षण संचालकांनी ह्या प्रश्नी विद्यापीठाला पत्र लिहून विचार करण्याची सूचना केली असता, बी. ए. आणि एम. ए. ह्या परीक्षांना नेमण्यासाठी देशी भाषांतील पुस्तके सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली.
समितीने मराठीतील अशा पुस्तकांची यादी सादर केल्यावर 29 जानेवारी, 1901 ह्या दिवशी रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या 13 व्या दिवशी सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षांत देशी भाषांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
हा प्रस्ताव मांडणारे सदस्य चिमणलाल सेटलवाड ह्यांनी रानडे ह्यांच्या निधनाने झालेल्या हानीचा उल्लेख करून सदर प्रस्तावासंदर्भात रानडे आणि आपण ह्यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेखही केला.
ह्या सभेत हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. त्यायोगे मॅट्रिक -प्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती आणि उत्तरे ही इंग्लिशमध्येच देण्याची अट होती.
महादेव गोविंद रानडे यांची अध्यक्षीय दंडाधिकारीपदी निवड झाली.
सन 1871 मध्ये त्यांना बॉम्बे स्मॉल काजेज कोर्टाचा चौथे न्यायाधीश, सन 1873 मध्ये पुण्याचे प्रथम श्रेणी सह-न्यायाधीश, 1884 मध्ये पूना स्मॉल काजेज कोर्टाचे न्यायाधीश आणि अखेर सन 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. सन 1885 पासून ते मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होईपर्यंत ते मुंबई विधानपरिष -देवर राहिले.
सन 1897 मध्ये रानडे यांना शासनाने एका वित्त समितीचे सदस्य बनविले. या सेवेसाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कम्पैनियन ऑफ़ द आर्डर ऑफ़ द इंडियन एम्पायर’ दिले.
‘डेक्कन एग्रीकल्चरिस्ट्स अॅक्ट’ अंतर्गत त्यांनी विशेष न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये ते आर्ट्सचे डीनही होते आणि विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण समजून घेत असे. मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून त्यांनी उपयुक्त पुस्तके आणि इंग्रजी भाषेच्या कामांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा आग्रह धरला.
रानडे यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि मराठा इतिहासावर पुस्तके लिहिली. त्यांचा असा विश्वास होता की मोठ्या उद्योगांची स्थापना करूनच देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो आणि आधुनिक भारताच्या विकासात पाश्चात्य शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
न्यायमूर्ती रानडे यांचा असा विश्वास होता की भारतीय व ब्रिटिशांच्या समस्या समजल्यानंतरच सर्वांच्या हितासाठी सुधारणा व स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांचे म्हणणे होते कि, भारतीय आणि पाश्चात्य सभ्यतेच्या चांगल्या बाबींचा अवलंब करून देश अधिक मजबूत होऊ शकतो.
“तुम्हाला आमचा लेख न्यायमूर्ती रानडे विषय मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
आपण हे वाचले का?
हृदयासंबंधी जाणून घ्या ह्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत Amazing Fact About Heart