Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळक

Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळक

भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक lokmanya tilak information in marathi आहेत. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत यामुळेच त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली होती. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे आहे. ते एक भारतीय क्रांतीकारी शिक्षक सामाजिक कार्यकर्ता वकील तसेच भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते.

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीतील एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मुळगाव हे कोकणातील चिखली होते. टिळकांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते व संस्कृतीचे चांगले ज्ञान सुद्धा होते. टिळक 16 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात त्यांनी पदवी मिळवली व महाविद्यालयीन शिक्षणात पदवी प्राप्त केली. सोळाव्या वर्षी म्हणजेच 1871 साली त्यांचा विवाह तापीबाई सोबत झाला. त्या केवळ सोळा वर्षाच्या होत्या आणि तापीबाई ह्या त्यांच्याहुन खूप लहान होत्या.

Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळकLokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळकLokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळकप्राथमिक जीवन lokmanya tilak information in marathi

एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणून ते कार्यरत झाले. पत्रकार म्हणून कार्य करत असताना सगळ्या सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होत असत व म्हणायचे, “धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही, फक्त संन्यास घेणे, जीवनाचा मुख्य हेतू नाही, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे आहे.

प्रथम मानव मानवतेची पूजा करण्यास शिकायला पाहिजे; तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यालायक बनू शकेल.” महाविद्यालयीन मित्र महादेव बल्लाळ, नामजोशी गोपाल, गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा केली आहे. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश या भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणा देणे हा होता.

See also  top 5 Best Mahabaleshwar Points in Marathi - महाबळेश्वर हिल स्टेशन

सन 1893 मध्ये हिंदू-मुसलमानांचे अनेक ठिकाणी दंगे झाले. या दंग्यामध्ये केवळ हिंदू आणि मुस्लीम हे दोनच पक्ष नसून सरकार हा आणखीन एक तिसरा पक्ष आहे. असे त्यांचे ठाम मत होते आणि सरकारचा निर्णय फोडा व झोडा या निर्णयामुळे दंग्यांची उपपत्ती लागणार नाही. फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत.

गणपती व शिवजयंती

या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. 18 सप्टेंबर, 1894 आणि 15 एप्रिल, 1896 या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले. राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.

पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव 1895 मध्ये करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळनिवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. 1896 च्या दुष्काळात शेतकऱ्‍यांना त्यांनी सांगितले की, पीक कमी असेल तर सारामाफी हा तुमचा हक्क आहे, तो मागून घ्या. सरकारच्या धोरणानुसार लोकांनी हक्काने मदत मागावी.

दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला. त्या वेळी प्लेगप्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्‍या अधिकाऱ्‍यांनी धुमाकूळ घातला, तेव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठविली. आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली व सार्वजनिक रुग्णालये उघडली. 22जून 1897 रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला.

इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविला

टिळकांनी lokmanya tilak information in marathi ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले. त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली.

See also  National Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क

इ.वी.सन 1896 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार दुष्काळ विमा निधी अंतर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे.

त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले तसेच सरकारच्या नुसार दुष्काळ पडला असता शेतकर्‍यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांच्या केसरी द्वारे केल्या गेले.

भारतीय असंतोषाचे जनक lokmanya tilak information in marath

तसेच तत्कालीन भारतीय नेतृत्व भारतास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा करावा किंवा कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेऊन भारतात स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो. तर इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास करावयास आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो.

लाल-बाल-पाल म्हणजेच लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल राजकीय मते, एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे म्हटले जाते. 8 जून 1914 रोजी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले. त्यांनी पूर्ववत आपली कामे चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते.

त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. त्यालाच होमरूल लीग असेही म्हणतात. स्वराज्य क्रांती हेच या लीगचे ध्येय होते, मांडल्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

टिळकांचे कार्य

टिळकांच्या  lokmanya tilak information in marathi बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे लिहितात, की बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात, “दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विजवावी, या लायकीचे कोणी राहिली नाही.” तसेच चिपळूणकर टिळक व आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना काढला.

See also  Nyaymurti Ranade न्यायमूर्ती रानडे

टिळकांनी  lokmanya tilak information in marathi इतर सहकाऱ्यांच्या मदतीने, 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनासाठी जागृती जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले होते. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत.

मराठा वृत्तपत्र हे प्रामुख्याने शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली व 1882 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

lokmanya tilak information in marath

टिळकांच्या खऱ्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला 1899 नंतरच अधिक वेग आला. त्या वेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक परत आले होते व त्यांची लोकप्रियता वाढली होती. शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत कोणताही बदल झाला नाही, हे त्यांच्या 4 जुलै 1899 रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते.

त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षण संस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

टिळकांनी आपल्या गीतारहस्य तून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार केला, तूच कर्मयोग प्रत्यक्ष त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनात आचरून दाखविले. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे.

गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावे लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा काळ मानल्या जातो.

“तुम्हाला आमची माहिती टिळकांविषयी lokmanya tilak information in marathi कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment