Top Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती

watwaghul Information in Marathi वटवाघूळ माहिती निसर्गातील एक आगळावेगळा प्राणी म्हणजे वटवाघुळ होय. वटवाघुळ म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. दिसायला जरी वटवाघुळ सुंदर नसली, तरीही कर्माने ती निश्चितच सुंदर आहे. आपणास अधिकाची माहिती wikipedia वर बघू शकता.

Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती

वटवाघूळास हिंदीत चमदागड म्हणतात. वटवाघूळ घरात आल्यावर काय होते, वटवाघूळ watwaghul Information in Marathi शुभ की अशुभ, स्वप्नात वटवाघूळ दिसणे म्हणजे वटवाघूळ शुभ की अशुभ आहे. वटवाघूळ दिसणे, असे एक ना अनेक प्रश्न आपले असतील.

नक्की वाचा – माझे गाव मराठी निबंध

वटवाघुळ उडते म्हणून बऱ्याच जणांना वाटते, वटवाघूळ हा एक पक्षी आहे. परंतु वटवाघुळ हा एक संस्थन प्राणी आहे. तिच्या विषयी विविध गैरसमज आपल्याला दिसून येतात. तर वटवाघुळ विषयी आपण मनोरंजक तथ्य पाहूया.

वटवाघुळ हे निसर्गाचा समतोल राखण्यास उपयोगी असतात. काही पक्षी दिवसा किडे खाऊन किड्यांचा समतोल राखतात, त्याच प्रमाणे वटवाघुळ रात्री किडे व डास खाऊन निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्वाचे काम करतात.

काही वटवाघुळ हे शाकाहारी तर काही वटवाघुळ कीटक भक्षी आहेत. जे शाकाहरी आहेत ते झाडांची फळे फुलांचा रस खाऊन आपला उदरनिर्वाह भागवतात. तर कीटक भक्षी वटवाघूळ ह्या घरातील पाली कीटक किडे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात.

वटवाघूळ आपल्या पिल्लांना दूध पाजते. वटवाघूळ दिवसभर अंधाऱ्या गुहेत किंवा एखाद्या दुर्लक्षित घरात किंवा जुने वाडे तसेच एखाद्या वसान पडलेल्या विहिरीत किंवा एखाद्या झाडावर उलटे लटकून विश्रांती घेतात.

 

वटवाघूळ वास्तव्य Watwaghul Information in Marathi

वटवाघुळ हे शहरात उंच वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडावर लटकून दिसतात. ती वटवाघुळ मात्र शाकाहारी असतात. त्यांना मोठी फळभक्षी वटवाघुळ असे म्हणतात.

See also  39 Facts About Garuda in Marathi गरुड बद्दल माहिती

अंधार पडला की ही उडून जाऊन पेरू, उंबर, वड, पिंपळ, केळी, पपई इत्यादी झाडांवर जाऊन लटकतात आणि त्या झाडांची फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या झाडांच्या बीजांचा प्रसार होतो.

गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ही वटवाघूळं द्राक्ष बागांना नुकसान करीत आहेत. वटवाघुळ तोंडावाटे एका विशिष्ट प्रकाराच्या ध्वनिलहरी म्हणजेच कंपने निर्माण करतात. ही कंपनी आपल्याला ऐकू येत नाही. ही अत्यंत जास्त वारंवारतेची व श्राव्यातील कंपन असतात. ही कंपने समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूवरआढळून परत येतात.

वटवाघुळ watwaghul यांचे कान मोठ्या आणि त्याद्वारा ही परावर्तित कंपने वटवाघुळ हेरतात आणि हवेत उडणाऱ्या किड्यांचा आकार वेग, अंतर आणि उडण्याची दिशा जाणतात. अत्यंत कमी वेळात स्वतःची दिशा बदलून किड्यांचा निशाणा साधतात. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत इको लोकेशन म्हणतात.

वैशिष्ट्ये Watwaghul

इको लोकेशन या तंत्राचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अंधारातही विमानांचा शोध घेणाऱ्या रडार यंत्राचा शोध लावला. ज्याप्रमाणे मनुष्य, माकड, हत्ती हे संस्थन प्राणी आहे. त्याच प्रमाणे वटवाघुळ सुद्धा आपल्या पिल्लांना दूध पाजते. वटवाघुळचा चेहरा कोल्हा किंवा कुत्र्यासारखा दिसतो.

आपण ज्याला वटवाघुळचे पंख समजतो ते त्यांच्या हाताच्या बोटामध्ये पडदे असतात. त्याचे पाय आखूड असून अशक्त असतात आणि त्याचा उपयोग झाडावर उलटे लटकण्यासाठी होतो.

वटवाघुळच्या watwaghul Information in Marathi नाकाचा आणि चेहऱ्याचा आकार कुरूप असल्यामुळे त्यांच्या बद्दल आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील केवळ पिसाच्च प्रकारातील वॅम्पायर बॅट वटवाघुळ जखमी प्राण्यांचे रक्त पितात, असे आढळून आले आहे. जगात इतर कोणतेही वटवाघुळ रक्त पिपासू नाही.

वटवाघूळ दिवसभर का लटकलेले असतात?

दिवसभर वटवाघुळ लटकलेली असताना खूप खेळ करतात. तसेच दिवसभर भांडकुदळपणा, आरडाओरड देखील करत राहतात. एकमेकांना चावा घेतात व ओरडतात. ज्या ठिकाणी वटवाघुळ उंची वसाहत असते त्याठिकाणी त्यांना दुर्बिणीतून पाहण्याची मजाच खूप वेगळी असते.

वटवाघुळ watwaghul Information in Marathi यांच्याबद्दल खूप अंधश्रद्धा देखील आहेत. सर्वच वटवाघूळ रक्तपिपासू असतात असा गैरसमज आपल्याकडे आहे. वटवाघुळ जाणून-बुजून आपल्याकडे धडक मारतात असा गैरसमज सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळतो.

See also  Crow in Marathi कावळा

काहीजनांणा तर वाटते कि, वटवाघुळ तोंडावाटे विष्टा बाहेर टाकतात असा सुद्धा दावा करतात. वटवाघुळ यांना भूत प्रेताचे पिसाच्चाचे प्रतिनिधी मानले जाते.

हिंदी तसेच इंग्रजी सिनेमा आणि पडक्या पुरातन हवेलीत खरोखरी वटवाघळांचे राहणे या कारणांमुळे अशा अंधश्रद्धा पसरल्या. शेतातील पिकांचे नुकसान करणारी टोळधाड दिवसा केवळ पक्षी आणि रात्री वटवाघूळं नियंत्रणात आणतात हे आपण विसरू नये.

घरात वटवाघुळ watwaghul Information in Marathi शिरल्यावर किंवा तिचा प्रवेश झाल्यावर होणाऱ्या मृत्यूचे, म्हणजेच घर रिकाम होण्याचे संकेत ते देत असते. असे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काहीचे म्हणणे आहे की, वटवागुळ हे रोग पसरविते. ज्याचा प्राचीन किंवा मध्य काळात उपचार संभाव्य नव्हता. म्हणून वटवाघुळ हा मृत्यूचा दूत मानला जात होता.

वटवाघूळ शुभ अशुभ watwaghul Information in Marathi 

चीनमध्ये वटवाघळांना watwaghul Information in Marathi दीर्घायुष्य आणि आनंदाचे प्रतीक समजतात. पोलंडमध्ये वटवाघुळाना शुभ मानले जाते. एका पुराणकथेनुसार वटवाघुळांना माणसाच्या केसामध्ये घुसायला आवडते. पण त्यामागचे खरे कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्याभोवती घोंगावत असताना त्यांना खाण्यासाठी वटवाघुळ येतात. आणि ती चुकून माणसाच्या केसामध्ये घुसतात.

इंग्लंडमध्ये वटवाघळांचे खूप काळजी घेतली जाते. त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसलीही इजा होईल, अशी कृती केली तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.

अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ऑस्टिनम मध्ये तर 15,00,000 वटवाघळांचे एक अभयारण्य आहे. सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघुळे आपल्या घरट्यामधून बाहेर पडतात. हे पाहण्यासाठी कित्येक पर्यटक तिथे गोळा होतात.

पुण्याजवळच्या चिंचवड निगडी येथे रोज संध्याकाळी हजाराच्या संख्येने वटवाघुळे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाताना दिसतात. पहाटे उलट्या दिशेने हा कार्यक्रम चालतो.

महाराष्ट्राच्या फारशी वर्दळ नसलेल्या लेणी आणि गुहांमध्ये वटवाघुळे हटकून सापडतात. तसेच किल्ल्यांमध्ये देखील त्यांचं वास्तव्य आढळून येते.

वटवाघुळाला उलटे लोंबायला आवडते. विजेच्या तारेला लोंबताना एखाद्या वटवाघळाचा खाली असलेल्या दुसऱ्या तारेशी संपर्क होते आणि ते वटवाघूळ तिथेच चिकटून राहते आणि मृत्युमुखी पडते.

See also  Kabutar Information in Marathi कबुतर

पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात. नखे एवढी वाकडी झालेली असतात की, एकदा वटवाघुळ एखाद्या फांदीला किंवा खडकाच्या खडबडीत पृष्ठभागाला चिकटून बसले की, स्नायूंचे अधिक आकुंचन होण्याची गरज नसते आणि गाढ झोपेत, हिवाळ्यातील सुस्तीच्या अवस्थेत सुद्धा निश्चितपणे सुरक्षितपणे टांगलेली असतात. मृत्यूनंतरही अशीच टांगलेले राहतात.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेक जातीच्या माझ्या योग्य जागी जमा होऊन पिल्लांना जन्म देतात व ती मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेतात. उन्हाळ्याच्या अखेरीस वटवाघुळे हळूहळू जागा सोडून जातात.

वटवाघूळ शरीररचना

वटवाघुळ watwaghul Information in Marathi रंग, पांढरा, लाल तपकिरी, करडा किंवा काळा असतो. तोंडात दात असतात हृदय चार कप्प्यांचे पासून बनलेले असते. तसेच फुप्फुसे वल इतर अवयवांना स्वतंत्रपणे रक्त पुरविते. वटवाघुळ विश्रांती घेत असताना त्यांच्या शरीराचे तापमान ताबडतोब सभोवतालच्या तापमाना एवढे कमी होते. व ती झोपी जातात तेव्हा हे असेच घडते.

वटवाघुळच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास शरीरातील ऊर्जेचा व्यय ही शरीराचे तापमान कमी झालेले असताना कमीच होतात, त्यामुळे ते आपल्याला कमी अधिक प्रमाणात सुस्त वाटतात. उपद्रव दिला, तरी जोराचा प्रतिसाद देत नाहीत किंवा उडून जात नाहीत.

वटवाघळां मध्ये पचन क्रिया अगदी जलद होते. ते अन्नाची अगदी बारीक तुकडे करतात. त्यामुळे फार मोठ्या पृष्ठ भागावर पचन क्रिया होते. खायला सुरवात केल्यानंतर अवघ्या 30 ते 60 मिनिटात ती मलविसर्जन करतात. त्यामुळे उड्डाणाच्या वेळी वजन कमी राहते.

दिवसा पाणी न पिता काही वटवाघुळे तळपत्या उन्हात विश्रांती घेतात. उब मिळवण्यासाठी ते अशी जागा निवडत असतात. अशा तऱ्हेने शरीराच्या तापमानाचे नियमन करीत असावेत. वटवाघुळ पाण्याचा वापर न करता ही आपल्या शरीराचे तापमान कसे कमी करतात हे अजूनही समजलेले नाही.

फुलांच्या फरागणाचे महत्वाचे कार्य वटवाघुळ करतात. शिकारी पक्षी, वटवाघळासहित इतर प्राणी व साप हे वटवाघूळ यांवर आपली उपजीविका भागवितात.

“तुम्हाला आमचा लेख वटवाघुळ watwaghul Information in Marathi यांविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.” तुम्हाला वटवाघूळ बद्दल आणखी काही माहिती असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा

आपण आमचे खालील लेख वाचलेत का?

इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य, Facts of Rainbow

क्रिकेट व फुटबॉल विषयी अद्भुत तथ्य Fact of Cricket & Football

 

4 thoughts on “Top Watwaghul Information in Marathi 2021 वटवाघूळ माहिती”

  1. वटवाघुळ घरात शिरणे हे खरोखर अशुभ आहे का त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे. दर दोन दिवसाआड आमच्या फ्लॅटमध्ये वटवाघुळ दोन-तीन फेऱ्या मारून परत आल्या त्या दिशेने निघून जाते याचा काय संकेत असू शकतो

    Reply
  2. माझा घरात आली होती वटवाघूळ सगळी म्हणात कि अशुभ आहे घरी काही तरी वाईट होते

    Reply

Leave a Comment