सशाविषयी या गोष्टी तुम्हाला क्वचितच माहिती असतील? 36 Amazing Fact about Rabbit

आपण सशाला नेहमी टीव्हीमध्ये गाजर खातांना पाहतो किंवा मग पुस्तकांमध्ये कासवा सोबतची शर्यत आपण सशाची पहात असतो त्यामध्ये ससा हारतो आणि कासव जिंकतो ही तर फक्त कल्पना करून सांगितलेली गोष्ट आहे आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते तुम्हाला कुठं पुस्तकांमध्ये मिळणार ना टीव्हीवर पाहायला मिळणार. कारण आपणास सश्याविषयी कमी माहिती असेल ती आता या लेखात अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सांगणार आहोत.

ससा हा सर्वांना आवडणारा प्राणी आहे, मोठ्यांपेक्षा तो लहान मुलांना खूप आवडतो त्याला स्पर्श केला तर मऊ लागतो तो घाबरतो सुद्धा खूप म्हणजे भित्रा असतो आणि चंचल सुद्धा चला मग जाणून घेऊ या छान दिसणाऱ्या प्राण्याबद्दल.

1) ससा खूपच सुंदर आणि आकाराने लहान प्राणी आहे. त्याची लांबी 40 ते 50 सेंटिमीटर आणि वजन 1.5 ते 2.5 किलो ग्राम असते.

2) सर्व जगभरामध्ये युरोपियन सशाला वागवले जाते, जी पांढऱ्या रंगाचे असते. 2 किलोचा ससा 9 किलोच्या कुत्र्या एवढं पाणी पिऊ शकतो.

3) पृथ्वीवर वागवण्यात येणाऱ्या सशांची तीनशे पाच प्रजाती आहेत. आणि रानटी सशांची तेरा प्रजाती आहेत.

4) 1912 पर्यंत सशाला रोटेट्स म्हणजेच उंदराच्या किंवा खारीच्या जातींमध्ये गणल्या जात असे.

5) सशाच्या तोंडात 28 दात आणि हे दात  जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वाढत असतात. दर महिन्याला एक सेमी एवढे वाढतात.

6)जंगली सशाची आयु एक ते दोन वर्ष तसेच पाळल्या जाणाऱ्या सशाची वय दहा वर्ष आणि ऑस्ट्रेलियन सशाची वय 18 वर्ष आणि यामध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे.

7) सशाचा प्रजनन काळ हा जवळजवळ 30 ते 32 दिवसांचा असतो. मादा ससा एका वर्षात चार वेळा आणि एका वेळेत तीन ते सात पिल्लांना जन्म देते. ज्यावेळेस हे पिल्ले जन्माला येतात, त्यावेळेस त्यांच्या अंगावर एकही केस नसतो आणि त्यांचे डोळे सुद्धा कमीत कमी दोन हप्त्यात पर्यंत उघडत नाहीत.

8) 6-8 महिन्या नंतर त्याच्या आईचे दूध प्यायला लागतात. सशाच्या लहान जातीच्या चार महिन्यांत तर मोठया जातीच्या फ्लेमिश मादया ९ ते १२ महिन्यांत प्रजोत्पादनास योग्य ठरतात.

See also  Heart Attack Symptoms in Marathi हृदयासंबंधी माहिती

9) वयाच्या ६ ते ६.५ वर्षांपर्यंत त्या पैदाशीसाठी योग्य असतात. मादीचे ऋतुचक १५ ते १६ दिवसांचे असून गर्भावधी ३१ दिवसांचा असतो. मादीला प्रत्येक वेतात ८-१० पिले होतात. विण्यापूर्वी एक-दोन दिवस मादी बेचैन असते, ती खाणे-पिणे बंद करते, अंगावरील केस उपटून पिलांसाठी मऊ गादी तयार करते.

10) विण्याच्या वेळी मादीला पिण्यास पाणी कमी पडले, तर ती पिले खाऊन टाकते.

11) जगातील सर्वात जास्त सशांचा उपयोग माणसे खाण्यासाठी करतात. सर्व जगामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त सशाचं मासे खातात. त्यामध्ये चीन एक नंबर वर आहे.

12) ससा आपला एक कान खाली आणि दुसरा कान वर असं हलवू शकतो आणि थंडी मध्ये स्वतःला वाचण्यासाठी त्याच्या उजव्या कानाला खाली झुकवतो. त्यामुळे थंडीपासून त्याचं रक्षण होते.

13) ससा उन्हाळ्यामध्ये चांगल्याप्रकारे सूर ऐकू शकतो.

14) ससा एका दिवसात 18 वेळा डुलक्या मारतो व आठ तास झोपतो. ससा डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपू शकतो.

15) यूरोपियन ससा हा वैशिष्टयपूर्ण ससा आहे. त्यांची असंख्य बिळे एकमेकांस जोडलेली असतात. बाहेर जाण्याच्या मार्गाव्दारे ते रात्री बाहेर पडतात. ते गवत व वनस्पतिज अन्न खातात. ते शांत व भित्र्या स्वभावाचे असतात.

16) ससा हे सामान्य नाम रॅबिट व हेअर या दोन्हींसाठी वापरलेले आहे. प्राचीन काळी ससा हा दिखाऊ व शोभेचा प्राणी समजला जात होता.

17) आधुनिक काळात मात्र अन्न, वस्त्र, संशोधन, छंद व पाळीव प्राणी ह्या दृष्टीने ससे पाळले व जोपासले जातात. सशाच्या मांसात २०.८% प्रथिने असतात व त्याचे मांस पचनास हलके असते.

18) अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका इ. देशांत सशांची मोठमोठी पैदासगृहे आहेत.

19) ऑस्ट्रेलियात एकोणिसाव्या शतकात सशांची संख्या एवढी वाढली की, ससे नष्ट करण्याची मोहीम सरकारला हाती घ्यावी लागली. तेथील चराऊ कुरणे, शेती व जंगलाचा मोठया प्रमाणावर सशांनी नाश केला.

See also  डॉल्फिन एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारतात, माहिती आहे का? Dolphin Facts

20) एका लशीव्दारे त्यांचे प्रजोत्पादन थांबविले. अशीच समस्या टाँगा बेटसमूहावर, अलास्कामधील मिडलटन बेट समूहावर, हवाई सान इ. अनेक बेटांवर निर्माण झाली. त्यावेळी गोळ्या घालून, विषारी वायू व लशीचा वापर करून सशाची संख्या नियंत्रित करावी लागली.

21) सशांना रक्त हगवण, निमोनिया, सर्दी यासारखे आजार होतात.

22) सशाच्या कानांची लांबी 4 इंची असते. त्यांची स्मरण शक्ती चांगली असते. युरोपमध्ये लोक सशाच्या पायाचा उपयोग गळ्यात बांधण्यासाठी करतात. हे बांधल्याने नशीब पलटते असे त्यांना वाटते.

23) ससा त्याचा आनंद व्यक्त करत असतो. जेव्हा आनंद व्यक्त करतो तेव्हा तो जोरजोरात उड्या मारत असतो. ससा 99.5 सेमी उंचीच्या उड्या मारू शकतो. आणि लांब उडी मध्ये 3 मीटर पर्यंत सशाचे रेकॉर्ड आहे आणि ही रेकॉर्ड डेनमार्क मधील yobo सशाच्या प्रजातीतील एका सशाने 12 जुन 1999 रेकॉर्ड बनवले होते.

24) संपूर्ण जगात सस्यांच्या जवळपास 305 जाती आहेत. सास्याची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे. तर सर्वात लहान जात आहे नेदरलँड द्वार्फ आहे.

25) ससे शक्यतो समूहाने राहातात. सस्यांच्या मिशा या त्याच्या रुंदी एवढ्या असतात. त्यामुळे त्याला हे समजण्यास मदद होते, की एखाद्या बिळात तो जाऊ शकतो की नाही.

26) सशांना घाम येत नाही. ते त्यांच्या कानाद्वारे आणि त्वचेद्वारे उष्णता बाहेर फेकतात.

27) ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. पांढरी ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात.

28) ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असते.

29) स्तनी वर्गाच्या लॅगोमॉर्फा गणाच्या लेपोरिडी कुलात सशाचा समावेश होतो. सशामध्ये रॅबिट व हेअर अशा दोन प्रमुख जाती आढळतात.

30) कॉटनटेल रॅबिट हे उत्तर अमेरिकेत आढळणारे रॅबिट आहेत. त्यांची शेपटी खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाची असते. ते सर्वसामान्य जंगली रॅबिट आहेत. ते खेळ व खाद्यासाठी प्रसिद्घ प्राणी आहेत. ते बिळात राहतात व अन्नाच्या शोधासाठी मोकळ्या जागेत जातात. त्यांच्या १३ जाती असून त्यांपैकी सिल्व्हिलॅगस फ्लोरिडॅनस ही जाती अमेरिकेत सर्वत्र आढळते.

See also  हत्ती चिखलात लोळला इन हिंदी Elephant Information in Marathi

31) ब्लॅकनेक्ड हेअर दक्षिण भारतात पूर्वेला गोदावरीपर्यंत आणि पश्चिमेला खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशापर्यंत आढळतात. रेड हेअर हिमालयापासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत आढळतात. राणससे वाळवंटी प्रदेश, नैऋत्य प्रदेश, पंजाब, सौराष्ट्र या भागांत निगिकोलीस, सिमकॉक्सी , निगिकोलीस, महादेवा या प्रजाती मध्य प्रदेशात आढळतात.

32) ससा 360 डिग्री मध्ये बघू शकतो परंतु नाका जवळील पाहू शकत नाही. त्याच्या पाठीमागून बेसावध हल्ला करणे शक्य नसते.

33) सशांची नजर तेज असते, तसेच ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता त्याहूनही चांगली असते. सशांना विशेष आहाराची गरज नसते. त्यांना मिळालेल्या साध्या आहारामुळेही त्यांच्या मटणातील प्रथिनांचे प्रमाण भरपूर वाढते.

34) ससे सामान्‍य आहार घेतात आणि त्‍याचे रूपांतर उच्‍च गुणवत्तायुक्‍त मांसामध्‍ये करतात.

35) मांस उत्‍पादनाव्यतिरिक्त कातडी व लोकर मिळविण्यासाठी ही ससेपालन केले जाऊ शकते. ससेपालन व्यवसाय करण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. भूमिहीन शेतकरी, अशिक्षित युवक व स्त्रिया ससेपालन करून अर्धवेळ कामाच्‍या स्‍वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

36) ससेपालन करून कुटुंबासाठी प्रथिनयुक्त मांसाचे उत्‍पादन करता येते. व्यवसायासाठी ससे पालन हा व्यवसाय उत्कृष्ट ठरु शकतो. इतर मांसाशी तुलना करता सशाच्या मटणात जास्त प्रथिने 21% व कमी चरबी 8%असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे मटण खाऊ शकतात.

“तुम्हाला आमचा लेख सस्या याविषयी रोचक तथ्य कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की पाठवा”.

आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका.

हे आपल्याला माहिती आहे का?

या ठिकाणांविषयी तुम्हाला माहिती नाही? बघा ! काय आहे या ठिकाणी? Unseen, Unknown Places in India

इंद्रधनुष्याबाबत काही मनोरंजन तथ्य, Facts of Rainbow

हत्तीविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत की नाही जरूर बघा

जगातील आश्चर्यकारक घटना, जगातील सत्य घटना Amazing Fact

 

Leave a Comment