माकडांविषयी 44 सत्य Monkey in Marathi

आज आपण माकडा विषयी Monkey in Marathi काही मनोरंजक तथ्य जाणून घेऊया. तुम्हाला याविषयी क्वचितच माहिती असेल.

माकडांविषयी 44 सत्य Monkey in Marathi

1) माकडाला मानवाचे पूर्वज म्हटले जाते. वानर आणि मानवांच्या DNA मध्ये 98 % समान आढळतात.

2) जपानमधील हॉटेल मध्ये माकडांचा वेटर म्हणून वापर केला जातो.

3) 2011 मध्ये एका वानराला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती, कारण त्याने पाकिस्तान मध्ये प्रवेश केला होता. असे म्हणतात की त्याने भारत सीमा ओलांडली होती.

4) ‘बोनोबो’ हा माकडातील मानवांचा सर्वात जवळचा नातेवाईक आहे, खरं तर ते आमले उभयलिंगी जात आहे.

5) माकडे 134 ते 137 दिवस, म्हणजेच आठ महिने बाळाला त्यांच्या पोटात ठेवतात. माकडांचे वय 10 ते 50 वर्षे आहे, आतापर्यंत सर्वात जास्त जगणाऱ्या वानरांपैकी एकाचे वय 53 वर्षे आहे.

6) मानवांव्यतिरिक्त फक्त माकडे केळीची साले काढून खाणारे प्राणी आहेत आणि कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, की ते केळी उलट्या दिशेने सोलतात.

7)  “कापुचिन ” माकड सर्वात हुशार आहे, तो दगडांने अक्रोड फोडतो, भेगांमध्ये काठी घुसवू शकतो, सापाला देखील लांब काठीनेही मारहाण करू शकतो.

8) लंगूर जातीच्या माकडात इतकी क्षमता आहे, की जर तो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उडी मारून पोहोचु शकला नाही, तर जमिनीवर पाय न ठेवता तो त्याच ठिकाणी आपल्या शेपटीच्या सहाय्याने परत येऊ शकतो.

9) माणसा प्रमाणेच माकडांना देखील 32 दात असतात, तसेच माकड आणि माणसाचा डीएनए मध्ये 98 टक्के इतके साम्य आढळते.

10) संशोधनानुसार सगळ्यात जास्त माकडांच्या प्रजाती ब्राझील या देशात आढळुन येतात. आतापर्यंत माकडाच्या 264 प्रजातींचा शोध लागला आहे.

40 Hindu religion information in marathi हिंदू धर्म मराठी

Monkey in Marathi

11) ज्या प्रमाणे माणसाला कावीळ, टीबी यांसारखे आजार होतात, तसेच माकडाला देखील हे आजार होतात.

12) माणसा प्रमाणेच माकड हा देखील समुहात राहणारा प्राणी आहे. आपल्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला करु नये म्हणून संरक्षणासाठी माकड समुहात राहते.

See also  हरीण माहिती मराठी Harin in Marathi

13) अंतराळात सगळ्यात आधी जाणारा प्राणी हा माकडच आहे. 1949 साला अंतराळात सोडण्यात आलेल्या यानात माकडाला बसवण्यात आले होते. यावेळी पृथ्वी पासून 133 किलोमिटरचा प्रवास माकडाने केला.

14) माकडाचे आयुष्य हे साधारण 20 ते 30 वर्षे इतके असते.

15) जगातील सर्वात मोठे माकडांची जात mandrill ही आहे. ज्याचं वजन 35 किलो आणि उंची 3.3 फूट आहे

16) 14 डिसेंबर हा दिवस जागतिक माकड दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2000 साला मध्ये झाली.

17) वानरांची दोन प्रकारात विभागणी केल्या जाते. एक म्हणजे दक्षिण आफ्रिका, आशिया मध्ये राहणारे माकड, ही जुनी जात आणि जी दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, ती नवीन माकडाची जात समजली जाते.

18) माणसांप्रमाणे प्रत्येक वानराच्या आपापल्या अंगठ्याचा ठसा हा वेगळावेगळा असतो.

19) भारतात माकडांच्या 11 जाती आढळतात. त्यांपैकी सर्कोपिथेसिडी कुलातील माकडाचे शास्त्रीय नाव मॅकाका, रेडीयेटा आहे. त्याला लाल तोंडाचे माकड किंवा टोपी माकड असे म्हणतात.

20) मॅकाका प्रजातीतील माकडे भारत, चीन, जपान, म्यानमार, मलेशिया इ. देशांत आढळतात.

21) लाल तोंडाची माकडे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, सांगली इ. जिल्ह्यांत मोठ्या संख्येने आढळतात.

22) लाल तोंडाच्या माकडांची शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा मोठी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 6-9 किग्रॅ., तर मादीचे वजन 5-7 किग्रॅ. असते. त्यांचा रंग हिवाळ्यात वरच्या बाजूला काळपट भुरा व खालच्या बाजूला मळकट पांढरा असतो, तर उन्हाळ्यात रंग उदी असतो.

23) डोक्यावर काळसर रंगाचे केस असतात. हे केस लांब असून त्यांची ठेवण डोक्यावर एखादी टोपी घातल्यासारखी दिसते. तोंड बरेचसे लालसर रंगाचे असते.

24) माकडे नेहमी कळपाने राहतात. त्यांच्या एका कळपात 30-40 माकडे असून त्यांपैकी 7-8 नर, 10-15 माद्या व बाकीची लहान पिले असतात.

Heart Attack Symptoms in Marathi हृदयासंबंधी माहिती

माकडांविषयी 44 सत्य

25) कळपाचा प्रमुख एखादा बलवान व दणकट नर असतो. कळपाच्या विशिष्ट जागा आणि मर्यादा ठरलेल्या असतात. तसेच कळपाने कोठे जायचे,हे सुद्धा कळप प्रमुख ठरवतो.

See also  Heart Attack Symptoms in Marathi हृदयासंबंधी माहिती

26) माकडे वेगवेगळे आवाज काढून आनंद, राग, भीती व प्रेमभावना व्यक्त करतात.

27) वाघ व बिबट्या हे माकडांचे शत्रू आहेत. शत्रूची चाहूल लागताच माकडे झाडाच्या शेंड्याकडील फांद्यांवर जातात.

28) माकडे माणसाळली जातात. माणसाने शिकविलेल्या गोष्टी ते चटकन शिकतात.

29) माकडांमध्ये विणीचा हंगाम ठराविक नसतो. त्यांच्यात वर्षभर प्रजनन होत असते. मादीचा गर्भावधी ६ महिन्यांचा असतो. ती एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते.

30) पिलू जन्मल्यानंतर मादीला चिकटून दूध पिते. ते आपल्या हातापायांच्या पंज्यांनी  मादीला पकडून ठेवते. त्या वेळी मादीही हातांच्या आणि पायांच्या पंज्यांनी पिलाला घट्ट धरून ठेवते.

31) पिलू थोडे मोठे झाले की खेळायला लागले, ते मादीच्या पाठीवर बसू लागते. पिलू 4-5 वर्षांत प्रौढ होते आणि माकडांना स्वतःची अशी एक भाषा असते.

32)माकड पृथ्वीवर जवळजवळ 50 मिलियन वर्षांपासून वास्तव्य करत आहे. पृथ्वीवर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका सोडून सर्व प्रदेशात वानरांची संख्या दिसून येते .

33) वानर झाडावर चढण्यासाठी त्यांच्या हातांचा व पायांचा उपयोग पकडण्यासाठी करतात. वानरांना प्रशिक्षण दिल्यास ते स्वतःला आरशामध्ये ओळखू शकतात.

34) सर्वात मोठा आवाज काढणारे माकडांची जात Howler Monkeys मलेशिया आणि थायलंड मध्ये माकडांना नारळ फोडण्याचा प्रशिक्षण देऊन कामावर ठेवले जाते. एका महिलेचा दावा आहे की, ती चार वर्षांची असताना तिचं अपहरण करून कोलंबियाच्या जंगलांमध्ये तिला सोडून देण्यात आलं. नंतर तिचं पालन कॅपुचीन नावाच्या माकडाच्या प्रजाती पैकी एका समूहानं केलं.

35)माकडांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात परंतु त्यांना सर्दी मात्र कधी होत नाही. माकडा मुळे मानवामध्ये वेगवेगळे आजार होण्याची भीती असते जसे इबोला रेस्टन, बी वायरस, पीतज्वर एचडी इत्यादी.

36) एका संशोधनानंतर असे माहित पडले की HIV व्हायरस एका चिंपाजी च्या माध्यमातून स्थानांतरित झाला व दुसऱ्या चिंपाजी मध्ये हा व्हायरस संकरित होऊन मानवांमध्ये प्रसारित झाला तेव्हा त्याला HIV 1 नाव दिले.

37) माकडांचे अशी एक नवीन जात शोधण्यात आली. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते माकड शिंकायला लागते. लघु स्पायडर नावाच्या जातीच्या माकडाच्या शेपटी मध्ये खूपच ताकद असते. त्यांच्या शेपटीवर स्वतःचा पूर्ण भार सांभाळू शकतात.

See also  Cow Information in Marathi 2021 गायची माहिती

38) गोरिला ही एकच जाती सामान्यतः मानण्यात येते. हे आफ्रिकेतील कॅमेरून, गाबाँ व काँगो येथील दाट जंगलात आढळतात.

39) नरवानर गणात गोरिला हा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. यांच्या नराची उंची 1.8 मीटर व वजन 200 किलोग्राम असते. बर्लिन प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या गोरिलाचे वजन २८८ किग्रॅ होते.

40) गोरिला हे प्राणी दिसण्यात क्रूर आहेत. यांचे कान लहान व मानवासारखे आहेत. डोळे खोल व जबड्याचे स्नायू बळकट असतात. यांच्या कवटीची धारणक्षमता ओरँगउटान किंवा चिंपॅंझी यांच्यापेक्षा कमी असते. जबडे बळकट व सुळे विषाच्या दातांसारखे असतात.

41) हात व पाय यांचे प्रमाण ओरँगउटानपेक्षा अधिक मानवासारखे असले, तरी हात पायांपेक्षा बरेच लांब असतात. गोरिला ला सरळ छाती काढून उभे राहता येत नाही किंवा चालता येत नाही. पायाच्या तळव्यांच्या बाहेरील बाजूवर व हाताच्या बोटांच्या सांध्यांवर हा उभा राहतो.

42) शारीर दृष्ट्या चिंपाझीची रचना पुष्कळशी मानवासारखी आहे. मेंदू, दंत्यसूत्र व हातापायांची सापेक्ष लांबी यांत साम्य आढळते. याचा मेंदू नरवानरांमध्ये सर्वांत जास्त विकसित झालेला असून त्यातील संवेलके मानवापेक्षा फारशी निराळी नाहीत.

43) चिंपाजीच्या वर्तनावरून असे दिसते की, याची बुद्धी इतर नरवानरांपेक्षा सरस आहे. शरीरक्रियावैज्ञानिक दृष्ट्या रक्ताचे गुणधर्म व ऊतकांची रोपणक्षमता यांवरूनही इतर कपींपेक्षा मानवाशी याचा निकटचा संबंध असावा, असे दिसते.

44) मानवाप्रमाणे चिंपाझीतही शरीराचा रंग, कवटीचा आकार, उंची वगैरे लक्षणांत भिन्नता आढळते . चिंपाझीचे कान लांब, डोळे वैशिष्ट्यपूर्ण व रंग काळा असतो.

“तुम्हाला आमचा लेख माकडाविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

आमच्या अन्य post आपण जरूर वाचा व share करायला विसरू नका. तुमचे आमच्या वेगवेगळ्या लेखांबद्दल काही मत असल्यास किंवा आमच्याकडून काही माहिती कमी किंवा चुकीची वाटत असल्यास आम्हाला comment करून जरूर सांगा.

हे आपल्याला माहिती आहे का?

आरोग्याविषयी माहितीकरिता येथी click करा

Leave a Comment